मुंबई, 01 डिसेंबर : हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रात अशी अनेक कामं आहेत जी ठराविक वेळी करावीत असं मानलं जातं. काही कामं संध्याकाळच्या वेळी किंवा सूर्यास्तानंतर न करण्याचा सल्ला दिला जातो. संध्याकाळी कोणती कामं करू नयेत याविषयी (Vastu Tips) जाणून घेऊया. संध्याकाळच्या वेळेस काही गोष्टी केल्यामुळं घरामध्ये रोगराई, दुःख आणि समस्या निर्माण होऊ शकतात. एवढेच नाही तर ज्योतिष शास्त्रानुसार असे केल्याने लक्ष्मी सुद्धा घरात राहत नाही, असे मानले जाते, जाणून घेऊया संध्याकाळी कोणत्या गोष्टी करू नयेत.
1. नखे आणि केस कापणे
सूर्यास्तानंतर नखे आणि केस कापू नयेत. एवढेच नाही तर दाढी करणे देखील टाळावे. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहते. असे केल्याने घरावरील कर्ज वाढते असे मानले जाते.
2. झाडांना स्पर्श करणे किंवा पाणी देणे
असे मानले जाते की सूर्यास्तानंतर कधीही झाडांना स्पर्श करू नये किंवा त्यांची पाने तोडू नयेत. रात्रीच्या वेळी त्यांना पाणीही देऊ नये. सूर्यास्तानंतर झाडे आणि वृक्षदेखील झोपतात, असे मानले जाते
3. कपडे धुणे आणि वाळवणे
संध्याकाळी कपडे धुणे चांगले मानले जात नाही. एवढेच नाही तर संध्याकाळनंतर कपडे सुकवणे देखील चुकीचे मानले जाते. असे केल्याने आकाशातील सर्व नकारात्मक ऊर्जा कपड्यांमध्ये प्रवेश करते आणि ते परिधान केल्याने माणूस आजारी पडू शकतो, असे मानले जाते.
4. अन्न उघडे ठेवणे
सूर्यास्तानंतर अन्न किंवा पाणी उघडे ठेवू नये. ते नेहमी झाकून ठेवावे. या गोष्टी उघड्याच राहिल्यास नकारात्मक ऊर्जा त्यात शोषली जाते, ज्यामुळे ते खाल्ल्याने आजारी पडू शकते.
5. दही किंवा भात खाणे
पुराणात सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन निषिद्ध मानले गेले आहे. तसेच सूर्यास्तानंतर भात खात नाहीत.
6. झाडू मारणे
असे मानले जाते की सूर्यास्तानंतर घर झाडू नये किंवा साफसफाई करू नये. असे केल्याने धनहानी होऊ शकते.
7. संध्याकाळच्या वेळी झोपणे
सूर्यास्तानंतर लगेच झोपू नये, म्हणजे सूर्यास्तानंतरच्या संधी प्रकाशामध्ये. यावेळी लैंगिक संबंध देखील निषिद्ध मानले जातात. असे केल्याने पती-पत्नीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. यावेळी पूजा-पठण केल्याचा फायदा आहे, असे मानले जाते.
वाचा - 'चोर' ते 'रोग'.. पंचकाचे आहेत इतके प्रकार; अग्नी पंचकात का टाळावीत शुभ कार्ये?
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.