मुंबई, 09 डिसेंबर : वास्तुशास्त्रामध्ये जीवन सुलभ आणि आनंददायी बनवण्यासाठी अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रातील उपायांचा अवलंब करून जीवनातील समस्या कमी केल्या जाऊ शकतात. जाणूनबुजून किंवा नकळत आपण अनेकदा वास्तू नियमांकडे दुर्लक्ष करतो, त्याचा परिणाम येणाऱ्या काळात दिसून येतो. अनेकदा काही लोक रात्रीही कपडे धुतात आणि वाळवतात. वास्तुशास्त्रात कपडे धुण्याचे नियम सांगण्यात आले आहेत, त्यानुसार रात्री कपडे धुणे आणि वाळवणे अशुभ मानले जाते. पंडित इंद्रमणी घनश्याल सांगतात की, रात्री कपडे धुणे आणि वाळायला घातल्याने जीवनात समस्या निर्माण होतात. जाणून घेऊया कपडे धुण्याचे आणि वाळवण्याचे वास्तू नियम.
सर्व वेळ तणावाचे वातावरण -
वास्तुशास्त्रानुसार, रात्री कपडे धुण्याने घरात तणावपूर्ण वातावरण निर्माण होते, कारण रात्री कपडे धुण्याने त्या कपड्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा येते, असे मानले जाते. जेव्हा आपण सकाळी ते कपडे घालतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा आपल्या जीवनावर परिणाम करते. त्यामुळे कामात व्यत्यय येणे किंवा सतत तणावाखाली राहणे यासारख्या समस्या येतात.
दिवसा कपडे धुण्याचे फायदे -
वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर उघड्या आकाशात कपडे धुवू नयेत. रात्रीच्या वेळी कपडे सुकायला वेळ तर लागतोच, त्यामुळे त्यावर अनेक प्रकारचे जंतू-किटाणू येतात, जे नंतर अंगावर चिकटतात. त्यामुळे अनेक प्रकारचे आजारही होऊ लागतात. दिवसा कपडे धुऊन वाळवल्याने सूर्यप्रकाशामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यासोबत कपड्यांवर असलेले हानिकारक जंतूही नष्ट होतात, त्यामुळे कपडे नेहमी दिवसा धुवून वाळवावेत.
हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.