मराठी बातम्या /बातम्या /religion /

Vastu Tips: घर-जमीन वाढवताना या दिशा सांभाळा; सुखी कुटुंबात नसत्या अडचणी वाढतील

Vastu Tips: घर-जमीन वाढवताना या दिशा सांभाळा; सुखी कुटुंबात नसत्या अडचणी वाढतील

घर वाढवण्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम

घर वाढवण्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम

जमीन किंवा घराचा कोणताही भाग कमी किंवा वाढवण्यापूर्वी त्याची दिशा आणि कोन विचारात घेणे आवश्यक आहे. घर वाढवताना किंवा कमी करताना नेहमी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे, याविषयी जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 07 डिसेंबर : वास्तुशास्त्रानुसार आयताकृती आणि चौकोनी जमीन किंवा या आकारातील घर हे मालकासाठी शुभ असते. परंतु, जर त्यातील कोणत्याही भागामध्ये घट किंवा वाढ झाली तर त्याचे परिणाम बदलू शकतात. तो परिणाम अशुभही असू शकतो. अशा परिस्थितीत जमीन किंवा घराचा कोणताही भाग कमी किंवा वाढवण्यापूर्वी त्याची दिशा आणि कोन विचारात घेणे आवश्यक आहे. घर वाढवताना किंवा कमी करताना नेहमी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली गेली पाहिजे, याविषयी जाणून घेऊया.

या दिशांना जमीन आणि घर वाढवणे शुभ

पंडित रामचंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार ईशान्येकडे जमीन किंवा घर वाढवले तर ते घरासाठी उत्तम मानले जाते. त्यात राहणारे कुटुंब नेहमीच आनंदी असते. तसेच पूर्व आणि उत्तर दिशेला प्लॉट वाढवल्याने कुटुंबात सुख-समृद्धी वाढते, तर उत्तर-पूर्व कोनात उत्तर आणि पूर्व दोन्ही बाजूंनी जमीन आणि घर वाढवल्यास ते शुभ असते. घर आणि दुकान दोन्हीसाठी या दिशांना केलेली वाढ लाभदायी ठरू शकते. धार्मिक मान्यतेनुसार, अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीचे सुख आणि समृद्धी हळूहळू वाढत जाते.

या दिशांना जमीन वाढवणे अशुभ -

पंडित जोशी यांच्या मते, आग्नेय दिशेला जमीन वाढवल्याने शासकीय कामात अडचणी, शत्रू आणि चोरीची भीती वाढते. दक्षिण-पश्चिम दिशेचा कोन वाढल्याने जमीन मालकाला सर्व बाजूंनी त्रास होऊ शकतो. प्लॉटच्या दक्षिण-पूर्व कोनात वाढ झाल्यामुळे मालकासाठी सरकारी कामांमधील अडचणी आणि शत्रूंची भीती देखील निर्माण होते. तसेच उत्तर-पश्चिम म्हणजेच वायव्य कोनात वाढ होणे, आर्थिक त्रास व मानसिक त्रास, कौटुंबिक त्रासाचे कारण बनू शकते. याशिवाय नैऋत्य दिशेत वाढ म्हणजेच नैऋत्य दिशा सर्व प्रकारे अशुभ आहे. वायव्य कोनाची वाढ म्हणजे जमीन मालकाची धनहानी होऊ शकते.

तसेच जमिनीच्या पश्चिम आणि उत्तर आणि पश्चिम आणि दक्षिण दिशांच्या कोनांमध्ये एकाच वेळी वाढ झाल्यामुळे जमीन मालकासाठी आर्थिक आणि कौटुंबिक समस्या देखील उद्भवू शकतात. पश्चिम आणि दक्षिण दोन्ही दिशांना आग्नेय कोनात वाढ होणे देखील घरमालकासाठी अशुभ मानले जाते.

हे वाचा - ॐ च्या शक्तीचे रहस्य अगाद! फक्त नामस्मरण करण्याचा असा होतो फायदा

(सूचना : येथे दिलेली माहिती वास्तुशास्त्रावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Religion, Vastu