घराच्या देव्हाऱ्यासंबधी वास्तुशास्त्राचे हे नियम ध्यानात ठेवा; जीवनात लाभेल सुख-शांती

घराच्या देव्हाऱ्यासंबधी वास्तुशास्त्राचे हे नियम ध्यानात ठेवा; जीवनात लाभेल सुख-शांती

पूजेचे ठिकाण म्हणजे देव्हारा हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. त्यामुळे देव्हारा बनवताना वास्तुशास्त्राचे नियम नक्कीच पाळा. देव्हारा कोठे असावा आणि देव्हारा बांधताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घेऊया.

  • Share this:

नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : हिंदू धर्मात पूजा-विधींना विशेष महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये सकाळ-संध्याकाळ नियमित पूजा होते. प्रत्येक घरात पूजेसाठी एक विशेष स्थान किंवा देव्हारा असतो. येथे देवतांची नित्य पूजा केली जाते आणि धूप-दिवे लावले जातात. पण कधी-कधी असे घडते की, नियमित पूजा करूनही घरात सुख-शांती कमी राहते आणि नेहमी अडचणी येत राहतात. याचे कारण वास्तुशास्त्रातील दोष असू शकतो. घरात योग्य ठिकाणी देव्हारा बांधला गेला नसेल तर त्यामुळे नकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो आणि पूजेचे योग्य फळ मिळत नाही.

पूजेचे ठिकाण म्हणजे देव्हारा हे घरातील सर्वात पवित्र स्थान मानले जाते. त्यामुळे देव्हारा बनवताना वास्तुशास्त्राचे नियम नक्कीच पाळा. देव्हारा कोठे असावा आणि देव्हारा बांधताना कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, याविषयी आचार्य गुरमीत सिंह यांच्याकडून जाणून घेऊया.

देव्हाऱ्यासाठी योग्य स्थान आणि दिशा -

देव्हारा कधीही बेडरूममध्ये, जिन्याखाली, स्वयंपाकघर किंवा बाथरूमच्या आजूबाजूला बनवू नये. याशिवाय घराच्या नैऋत्य दिशेला देव्हारा बांधू नये. वास्तुशास्त्रानुसार, ईशान्य दिशा देव्हाऱ्यासाठी सर्वोत्तम मानली जाते, कारण या दिशेमध्ये ऊर्जेचे भांडार असते आणि या दिशेला देव दिशाही म्हणतात. जर काही कारणास्तव या दिशेला देव्हारा बांधणे अशक्य असेल तर तुम्ही घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला देखील देव्हारा बांधू शकता.

देव्हाऱ्याची उंची -

घरामध्ये देव्हारा बांधताना लक्षात ठेवा की, ते जमिनीवर असू नये कारण देवाचे स्थान उच्च असावे. त्यामुळे देव्हारा जमिनीपासून किमान चौरंगाच्या उंचीइतका तरी असावा, त्यापेक्षा उंच असणे चांगले पण, साधारण उभ्या व्यक्तीच्या छातीच्या उंचीपेक्षा जास्त नसावे.

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

देव्हाऱ्याचा रंग -

वास्तुशास्त्रानुसार देव्हाऱ्यासाठी पांढरा, पिवळा, हलका निळा आणि केशरी रंग उत्तम असतो. तसेच येथे तुम्ही पांढऱ्या रंगाचे दिवे लावू शकता. देव्हाऱ्यात काळा, तपकिरी किंवा कोणताही गडद रंग वापरू नये.

हे वाचा -  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं

देव्हाऱ्याला स्टोअर रूम बनवू नका -

काही लोकांना असे वाटते की जर देव्हाऱ्यामध्ये जागा असेल तर त्यामध्ये काही गोष्टी देखील ठेवल्या जाऊ शकतात. त्यामुळे घरचे रेशन, पुस्तके, कपडे किंवा इतर वस्तूही काहीजण तिथे ठेवतात. पण असं अजिबात करू नका. असे केल्याने घरात सकारात्मकता येत नाही. तसेच पूजेच्या घरात पूर्वजांचा फोटो लावू नये.

Published by: News18 Desk
First published: September 23, 2022, 9:30 AM IST

ताज्या बातम्या