मराठी बातम्या /बातम्या /religion /

घर-परिसरात केळीचे झाड कोणत्या दिशेला लावावे, जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं

घर-परिसरात केळीचे झाड कोणत्या दिशेला लावावे, जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं

वास्तुशास्त्रानुसार केळी लावण्यासाठी एक विशिष्ट दिशा आणि नियम सांगण्यात आले आहेत, त्याचे पालन न केल्यास व्यक्तीचे नुकसान होऊ शकते. इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा केळीच्या झाडाशी संबंधित काही गोष्टी सांगत आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk
मुंबई, 22 सप्टेंबर : हिंदू धर्मातील प्रत्येक पूजेमध्ये केळीच्या पानांचा वापर केला जातो. केळीचे झाड अतिशय पवित्र मानले जाते. केळीच्या झाडावर भगवान विष्णू आणि गुरू ग्रह वास करतात, असे मानले जाते. केळीचे झाड घराच्या परिसरात लावल्याने सुख-समृद्धी येते. परंतु, वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की, केळीचे झाड घर-परिसरात चुकीच्या दिशेला लावल्यास घरातील अडचणी वाढू शकतात. वास्तुशास्त्रानुसार केळी लावण्यासाठी एक विशिष्ट दिशा आणि नियम सांगण्यात आले आहेत, त्याचे पालन न केल्यास व्यक्तीचे नुकसान होऊ शकते. इंदूरचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित कृष्णकांत शर्मा केळीच्या झाडाशी संबंधित काही गोष्टी सांगत आहेत. या दिशेला केळीचे झाड लावू नका - वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही तुमच्या घराच्या बागेत केळीचे झाड लावणार असाल तर ते कधीही पूर्व किंवा दक्षिण दिशेच्या आग्नेय कोनात म्हणजेच बागेच्या मध्यभागी लावू नका. याशिवाय पश्चिम दिशेला केळीचे झाड लावणे योग्य नाही, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजासमोर केळीचे झाड लावू नये. असे मानले जाते की यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही. याशिवाय घरामध्ये सुख-समृद्धी येण्याच्या मार्गातही ते अडथळा ठरते. जर तुम्ही तुमच्या घराच्या बागेत केळीचे झाड लावत असाल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की त्याभोवती कधीही काटेरी झाडे लावू नका. केळीच्या झाडाजवळ कधीही गुलाबाची रोपे लावू नयेत. त्यामुळे घरात भांडणे आणि कलहाचे वातावरण निर्माण होऊन घरातील सदस्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो, असे मानले जाते. हे वाचा -  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं हिंदू धर्मग्रंथानुसार केळीच्या झाडावर भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि गुरूग्रह वास करतात. जर तुम्ही केळीचे झाड कधीही सुखू दिले नाही, तर ते तुमच्यासाठी सुख आणि समृद्धीचे दरवाजे उघडू शकते. याशिवाय एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, केळीच्या झाडावर चुकूनही घाण पाणी टाकू नये. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Religion, Vastu

पुढील बातम्या