Vastu Tips : तगडा बँक बॅलेन्स कायम राहण्यासाठी आहेत हे 4 उपाय; मेहनतीचं मिळेल फळ

Vastu Tips : तगडा बँक बॅलेन्स कायम राहण्यासाठी आहेत हे 4 उपाय; मेहनतीचं मिळेल फळ

कठोर परिश्रम करूनही काही लोकांना त्यांच्या मेहनतीनुसार पैसा मिळत नाही किंवा कमावलेला पैसा त्यांच्या जवळ राहत नाही. असं होऊ नये म्हणून कोणते उपाय करावेत, याविषयी जाणून घेऊया.

  • Share this:

मुंबई, 01 ऑगस्ट : कोणताही व्यक्ती आपले जीवन सुखकर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतो, परंतु कठोर परिश्रम करूनही काही लोकांना त्यांच्या मेहनतीनुसार पैसा मिळत नाही किंवा कमावलेला पैसा त्यांच्या जवळ राहत नाही. अशा परिस्थितीत मग लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. अशा लोकांसाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय अतिशय सोपे आहेत, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या दूर होऊ शकतात.

ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार कृष्णकांत शर्मा या उपायांबद्दल सांगत आहेत. हे उपाय आपल्या आर्थिक समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी या उपायांचा अवलंब करा

-घरात काटेरी झाडे लावू नका

वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, कोणत्याही व्यक्तीने आपल्या घराच्या अंगणात/परिसरात किंवा घराच्या आत काटेरी किंवा त्यातून पांढरा दुधासारखा द्रव निघणारी रोपे लावू नयेत. याशिवाय घराच्या अंगणात विषारी झाडे किंवा वनस्पती उगवल्या असतील तर त्या लगेच काढून टाका. असे मानले जाते की, घरामध्ये काटेरी किंवा दुधासारखा द्रव निघणारी रोपटी लावल्याने घरातील सदस्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि घराचे आर्थिक नुकसान देखील होते.

- बाथरूम आणि टॉयलेट स्वच्छ ठेवा

वास्तुशास्त्रानुसार, घरातील बहुतेक नकारात्मक ऊर्जा घराच्या बाथरूममधून येते. यासाठी घरातील बाथरूम बेडरूममध्ये नसावे, असा सल्ला वास्तुशास्त्र देते, पण जर तुमचे बाथरूम बेडरूममध्ये असेल तर घरातील बाथरूम नेहमी स्वच्छ ठेवण्याचा सल्ला वास्तुशास्त्र देते.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

- मीठ वापरा

खूप मेहनत करूनही तुमच्या समस्या दूर होत नसतील तर घराच्या ईशान्य दिशेला एका काचेच्या भांड्यात मीठ ठेवा आणि काही काळाने बदलत राहा.

हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

- ईशान्य बाजू स्वच्छ ठेवा

वास्तुशास्त्रामध्ये घराचा ईशान्य कोपरा अत्यंत पवित्र असल्याचे सांगितले आहे. म्हणूनच कोणीही ईशान्येला घरातील देव्हारा बांधून घ्यावा, असा सल्ला दिला जातो. घराच्या ईशान्य दिशेला देव्हारा नसेल तर त्याबाजूची जागा नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवावी.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 1, 2022, 8:09 PM IST

ताज्या बातम्या