मराठी बातम्या /बातम्या /religion /

...म्हणून दरवाजा उघडताना-बंद करताना वाजू नये असे म्हणतात, असं आहे वास्तुशास्त्र

...म्हणून दरवाजा उघडताना-बंद करताना वाजू नये असे म्हणतात, असं आहे वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या दारातून कोणत्याही प्रकारचा आवाज येऊ नये. दरवाजा उघडताना किंवा बंद करताना आवाज होणे शुभ मानले जात नाही. यामुळे घरात गरिबी येऊ शकते. तसेच...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 02 ऑक्टोबर : वास्तुशास्त्राचे नियम पाळून जीवनात सुख-समृद्धी मिळवता येते. वास्तुशास्त्रात असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे आपल्या जीवनातील अनेक प्रकारच्या समस्या कमी होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाजा हे घरातील सर्वात महत्त्वाचे स्थान आहे. घरामध्ये देवतांचा आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश मुख्य दरवाजातून होतो, त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजाची वास्तू परिपूर्ण असावी. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराशी संबंधित वास्तूचे नियम पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया.

मुख्य दाराचे वास्तुशास्त्र -

वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा नेहमी उत्तर, ईशान्य किंवा पश्चिम दिशेला असावा. या सर्व दिशा शुभ मानल्या जातात. या दिशांनी सर्व देवतांचे घरी आगमन होते. घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. मुख्य दार हे आतल्या बाजूला उघडत असल्यास ते अधिक शुभ असते. मुख्य गेट दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला नसावे हे लक्षात ठेवा, अन्यथा नकारात्मक ऊर्जा भारी पडू शकते आणि अनेक समस्या येऊ शकतात.

या गोष्टी लक्षात ठेवा -

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या दारातून कोणत्याही प्रकारचा आवाज येऊ नये. दरवाजा उघडताना किंवा बंद करताना आवाज होणे शुभ मानले जात नाही. यामुळे घरात गरिबी येऊ शकते. दार जमिनीला घासून उघडू नये. कोणत्याही झाडाची किंवा खांबाची सावली मुख्य दारावर पडू नये, तसेच मुख्य दाराजवळ डस्टबिन, कचरा टाकू नये.

त्यामुळे घरात गरिबी येते आणि प्रगती थांबते. तसेच घराचा मुख्य दरवाजा कोठूनही तुटलेला नसावा हे लक्षात ठेवा. यामुळे कुटुंबाची आर्थिक स्थिती बिघडू शकते. घराच्या मुख्य दरवाजाजवळ काटेरी झाडे आणि वनस्पती ठेवू नयेत. त्यामुळे यश मिळविण्यात अनेक अडचणी येतात.

हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Vastu