मुंबई, 19 मार्च : हिंदू धर्मात देवी-देवतांच्या पूजेदरम्यान अनेक गोष्टी अर्पण केल्या जातात तसेच काही प्रकारचे दिवेदेखील लावले जातात. दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा, शुभ कार्य पूर्ण होत नाही, असे मानले जाते. घरात किंवा मंदिरात कोणतेही धार्मिक कार्य करण्यापूर्वी देवतांच्या समोर दिवा लावला जातो. हिंदू धर्मग्रंथांमध्ये दिवा लावण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. घराच्या मुख्य दारावर आणि घरातील देव्हाऱ्यात रोज दिवा लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे घरातून नकारात्मकता निघून जाते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमाची भावना वाढते. अनेक घरांमध्ये शक्यतो तेलाचा दिवा लावला जातो. पुजेच्या वेळी तुपाचा कि तेलाचा दिवा लावावा, याविषयी काहींच्या मनात शंका येते. भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तूतज्ज्ञ हितेंद्र कुमार शर्मा याबद्दल अधिक माहिती देत आहेत.
तुपाचा दिवा लावणे शुभ -
हिंदू धर्मातील कोणतीही पूजा किंवा धार्मिक कार्य दिवा लावल्याशिवाय पूर्ण होत नाही. घरामध्ये तुपाचा दिवा लावणे सर्वात शुभ मानले जाते, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे. असे मानले जाते की घरात तुपाचा दिवा लावल्यानं देवता प्रसन्न होतात आणि देवी लक्ष्मी घरात वास करते. याशिवाय घरामध्ये तुपाचा दिवा लावल्यानं घरातील वास्तुदोषही संपतात.
दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकतात -
पूजेच्या वेळी घरात कोणता दिवा लावणे योग्य आहे, याबाबत अनेकवेळा आपण गोंधळून जातो. पण, हिंदू धर्मानुसार आपण घरात दोन्ही प्रकारचे दिवे लावू शकतो. फक्त देवाच्या उजव्या बाजूला तुपाचा दिवा आणि डाव्या बाजूला तेलाचा दिवा लावावा. धार्मिक मान्यतेनुसार इच्छा पूर्ण होण्यासाठी तेलाचा दिवा लावणे शुभ असते.
दिशांची काळजी घ्या -
वास्तुशास्त्रात सांगितले आहे की, घरामध्ये दिवा लावताना दिशांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. घाई-गडबडीत कुठेही दिवा ठेवल्याने त्याचा विपरीत परिणामही दिसून येतो. दिवा नेहमी पश्चिम दिशेला ठेवावा. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, असे मानले जाते.
हे वाचा - मिठाचे हे उपाय नकारात्मकतेला काढतात उंबरठ्याबाहेर; घर राहतं हसतं-खेळतं
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.