मराठी बातम्या /बातम्या /religion /

Vastu: सतत अभ्यासात मागे राहतंय मुल; वास्तूनुसार अभ्यासाच्या खोलीत करा असे बदल

Vastu: सतत अभ्यासात मागे राहतंय मुल; वास्तूनुसार अभ्यासाच्या खोलीत करा असे बदल

खूप मेहनत करूनही जर तुमचं मूल अभ्यासात सतत मागे पडत असेल किंवा त्याला अभ्यास करावासा वाटत नसेल, तर ती मोठी समस्या आहे. यामुळे त्याचे भविष्य धोक्यात येऊ शकते. त्यासाठी काही वास्तुशास्त्र नियम जाणून घेऊया.

खूप मेहनत करूनही जर तुमचं मूल अभ्यासात सतत मागे पडत असेल किंवा त्याला अभ्यास करावासा वाटत नसेल, तर ती मोठी समस्या आहे. यामुळे त्याचे भविष्य धोक्यात येऊ शकते. त्यासाठी काही वास्तुशास्त्र नियम जाणून घेऊया.

खूप मेहनत करूनही जर तुमचं मूल अभ्यासात सतत मागे पडत असेल किंवा त्याला अभ्यास करावासा वाटत नसेल, तर ती मोठी समस्या आहे. यामुळे त्याचे भविष्य धोक्यात येऊ शकते. त्यासाठी काही वास्तुशास्त्र नियम जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 20 सप्टेंबर : वास्तुशास्त्रामध्ये दिशेला विशेष महत्त्व आहे. चुकीच्या दिशेमुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि त्यामुळे वास्तुदोष होतो. आपल्या पाल्याला अभ्यास करावासा वाटत नाही आणि मूल अभ्यास करण्यापासून दूर पळते, ही प्रत्येक पालकांची तक्रार असते. तथापि, प्रत्येक मुलाची बौद्धिक क्षमता वेगळी असते. काही मुले अभ्यासात सामान्य असतात, तर काही मुले अव्वल गुणांनी उत्तीर्ण होतात. पण, खूप मेहनत करूनही जर तुमचं मूल अभ्यासात सतत मागे पडत असेल किंवा त्याला अभ्यास करावासा वाटत नसेल, तर ती मोठी समस्या आहे. यामुळे त्याचे भविष्य धोक्यात येऊ शकते. वास्तूदोष हे देखील मुलाच्या अभ्यासात रस नसण्याचे कारण असू शकते. कारण, घरात वास्तू दोष असल्याने नकारात्मकता वाढते आणि अशा स्थितीत मुलाचे मन अभ्यासात एकाग्र होऊ शकत नाही. त्यासाठी मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत काही बदल करणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रामध्ये मुलांच्या अभ्यासाच्या खोलीबद्दल सांगण्यात आले आहे की, येथे कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या दिशेला ठेवाव्यात, जेणेकरून मुलांचे मन अभ्यासात गुंतले जाईल. याविषयी दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंह यांच्याकडून अधिक जाणून घेऊया. अभ्यासाचे टेबल कोणत्या दिशेला असावे - अभ्यासासाठी वास्तूमध्ये पूर्व आणि उत्तर दिशा चांगली मानली गेली आहे, म्हणून तुम्ही लक्षात ठेवा की अभ्यासाच्या टेबलाचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशा असावे. तसेच, मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर जास्त पुस्तके ठेवू नका, कारण भरपूर पुस्तके पाहून मुलाला अभ्यासाचे ओझे वाटू शकते. स्टडी टेबलवरून काढून तुम्ही पुस्तकांसाठी वॉर्डरोब किंवा शेल्फ बनवू शकता. तसेच मुलांची वाचनकक्षा (स्टडीरुम) ईशान्य किंवा पूर्वेला असावी हे लक्षात ठेवा. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत वास्तुनुसार हे बदल करा - अभ्यासाच्या टेबलावर देवी सरस्वतीचे चित्र पूर्वेकडे ठेवा. स्टडी टेबलवर क्रिस्टल ग्लोब देखील ठेवता येतो. शूज आणि चप्पल स्टडी रूममध्ये आणू नयेत. अभ्यास कक्षाच्या पूर्व, उत्तर किंवा दक्षिण भागात मेणबत्ती लावल्याने मुलांचे मन अभ्यासात गुंतून राहते आणि त्यांची बौद्धिक क्षमता वाढते. अभ्यासाच्या टेबलासमोर आरसा लावू नका. त्यामुळे मुलांचे अभ्यासातून लक्ष विचलित होते. हे वाचा - येथे अजूनही रात्री सुरू असते श्रीकृष्णाची रासलीला; पाहणारे वेडे होतात, हरपतं भान अभ्यासाची खोलीत का बदल करावा - मुलांना नवीन गोष्टी आवडतात. थोड्या वेळाने त्याला जुन्या गोष्टींचा कंटाळा येतो. यामुळेच मुले हळूहळू त्यांच्या जुन्या खेळण्यांशी कमी खेळू लागतात. एखादे नवीन खेळणे त्याच्याकडे येताच तो मोठ्या आवडीने त्याच्याशी खेळू लागतात. यामुळेच मुलांना वेळोवेळी नवीन गोष्टी मिळायला हव्यात. तसेच मुलांच्या शिक्षणाबाबतही काही बदल केले पाहिजेत. मुलाच्या अभ्यासाच्या खोलीत बदल करून त्याचे मन पुन्हा अभ्यासात गुंतू लागते. हे वाचा -  कोणतंही रत्न धारण करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी, फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतं वास्तुशास्त्रानुसार, मुलाच्या अभ्यास कक्षाची व्यवस्था केल्याने त्यांची मानसिक एकाग्रता वाढते आणि मुलाचा अभ्यासाकडे कल वाढतो. त्यामुळे मूल आपले अभ्यासातील ध्येय साध्य करून यश मिळवते.
First published:

Tags: Religion, Vastu

पुढील बातम्या