साखरेचा शुक्रवाराशी आहे असा संबंध, या चुकीमुळे देवी लक्ष्मी कुटुंबावर होऊ शकते नाराज

साखरेचा शुक्रवाराशी आहे असा संबंध, या चुकीमुळे देवी लक्ष्मी कुटुंबावर होऊ शकते नाराज

ज्योतिष शास्त्रानुसार अशी काही कामे आहेत, जी शुक्रवारी करणे शुभ मानले जात नाही. शुक्रवारी काही चुकीच्या कामांमुळे धनाची देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते. यामुळे जीवनात आर्थिक समस्या उद्भवू शकतात.

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : हिंदू धर्मग्रंथांमध्ये आठवड्यातील प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहे. तसेच शुक्रवार हा दिवस लक्ष्मीचा दिवस मानला जातो. शुक्रवारी धनाची देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते. शास्त्रानुसार शुक्र ग्रह हा आपल्या जीवनात धन, भौतिक सुख आणि प्रेमाचा कारक मानला जातो. अशा परिस्थितीत शुक्रवारी लक्ष्मीची पूजा केल्याने जीवनात सुख-शांती येते. त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रानुसार अशी काही कामे आहेत, जी शुक्रवारी करणे शुभ मानले जात नाही. शुक्रवारी काही चुकीच्या कामांमुळे धनाची देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते. यामुळे जीवनात आर्थिक समस्या उद्भवू शकतात. पंडित इंद्रमणी घनश्याल यांच्याकडून जाणून घेऊया शुक्रवारी कोणत्या गोष्टी केल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.

साखर दान करू नये -

शास्त्रानुसार दान करणे खूप शुभ आहे, परंतु शुक्रवारी साखर दान करणे शुभ मानले जात नाही. शुक्रवारी साखर दान केल्याने शुक्राच्या संबंधामुळे आर्थिक समस्या उद्भवू शकतात.

कर्ज देऊ नका -

ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवारी उधारीचा व्यवसाय करणे अशुभ आहे. शुक्रवारी कोणाकडून उधार घेऊ नये किंवा देऊ नये. शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे शुक्रवारी कर्जाचे व्यवहार केल्यास जीवनात आर्थिक समस्या उद्भवू शकतात.

हे वाचा - श्रावणात तुम्हालाही अशी स्वप्ने पडतात का? शिव महादेवाचा आशीर्वाद मिळण्याचे असतात ते संकेत

महिलांचा अपमान करू नका -

हिंदू धर्मात महिलांना देवीचे रूप मानले जाते. महिलांचा सन्मान केला पाहिजे, शुक्रवारी आपल्याकडून कोणत्याही महिलेचा अपमान होऊ नये. असे केल्याने देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो आणि घरात दारिद्र्य येऊ शकते. कौटुंबिक सुख-शांती नाहीशी होऊ शकते आणि आपल्याला आर्थिक अडचणीतून जावे लागू शकते.

हे वाचा - श्रावणात शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना या गोष्टींमध्ये चुकू नका; हे वार आहेत महत्त्वाचे

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

Published by: News18 Desk
First published: August 19, 2022, 10:25 AM IST

ताज्या बातम्या