मराठी बातम्या /बातम्या /religion /

हनुमानाचे चित्र घरात लावण्याचे हे नियम ध्यानात ठेवा; दिशा आणि या गोष्टी महत्त्वाच्या

हनुमानाचे चित्र घरात लावण्याचे हे नियम ध्यानात ठेवा; दिशा आणि या गोष्टी महत्त्वाच्या

हनुमानाचे चित्र घरात लावण्यापूर्वी वास्तुशास्त्राचे काही नियम जाणून घेणे आवश्यक आहे. त्याविषयी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी माहिती दिली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India
  • Published by:  News18 Desk

मुंबई, 04 ऑक्टोबर : कलियुगातील देवता म्हटला जाणारा राम भक्त हनुमान प्रत्येक भक्ताचे संकट दूर करतो. हनुमान आजही कोणत्या ना कोणत्या रूपात पृथ्वीवर फिरत आहे, असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरात हनुमानाची पूजा केली जाते त्या घरात मंगळ, शनी, पितृदोष आणि नकारात्मक शक्ती राहु शकत नाही. याशिवाय त्या घरात सुख-शांती राहते.

हनुमानाचे चित्र घरात लावण्यापूर्वी वास्तुशास्त्राचे काही नियम जाणून घेणे आवश्यक आहे. त्याविषयी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी माहिती दिली आहे.

बजरंगबलीची पूजा करण्यासाठी शनिवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी हनुमानाची मंदिरात पूजा करून त्यांचे आशीर्वाद मिळवू शकता आणि आपले जीवन सार्थक करू शकता.

हनुमानाचे चित्र लावण्यासाठी योग्य दिशा -

जर तुम्हाला तुमच्या घरात बजरंगबलीचे चित्र लावायचे असेल तर वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला तोंड करून लावा. हनुमानाचे हे चित्र लाल रंगाचे आणि बसलेल्या स्थितीत असावे. हनुमानजींचे असे चित्र या दिशेला लावल्याने नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करू शकत नाहीत.

या ठिकाणी बजरंगबलीचे चित्र लावू नका -

वास्तुशास्त्रानुसार बजरंगबलीचे चित्र बेडरूममध्ये कधीही लावू नये. धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान ब्रह्मचारी आहे. त्यामुळेच बेडरूममध्ये त्याचे चित्र लावणे टाळावे.

हे वाचा - मंदिरात दिवा लावताना या छोट्या गोष्टी कायम लक्षात ठेवा, मनोकामना होतात पूर्ण

घरामध्ये बजरंगबलीचे चित्र कसे लावावे -

जर तुम्हाला तुमच्या कुटुंबात सुख, समृद्धी आणि प्रेम आणायचे असेल तर हनुमानाचे असे चित्र लावा, ज्यामध्ये ते भगवान रामाच्या चरणांजवळ बसलेले आहेत. याशिवाय पवनपुत्र हनुमानाचे पंचमुखी हनुमान, हनुमान भजन गाताना किंवा पर्वत उचलतानाचे चित्र लावू शकता.

First published:

Tags: Lifestyle, Religion, Vastu