मुंबई, 6 फेब्रुवारी : आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण-समारंभ साजरा करताना काही प्रतिकांचे महत्त्व जपलेले दिसून येते. मंगल कलश देखील कोणत्याही शुभप्रसंगी ,विवाह, पूजा,उत्सवाप्रसंगी स्थापन करून संस्कृतीचे, सुख-समृद्धीचे प्रतिक म्हणून ओळखला जातो तर काही ठिकाणी घराघरांमध्ये नित्यनेमाने पूजला जातो.
सृष्टी ज्यांच्या बळावर चालते, ते ब्रह्म, विष्णू आणि महेश ही त्रिगुणात्मक शक्ती आहे. हे सारे ब्रह्मांड या कलशात असते. हा कलश म्हणजे पंचतत्वापासून तयार झालेला एक घट आहे आणि मानवी शरीरही पंचतत्वांनी बनलेले आहे. या दोन घटांचे तादात्म्य साधण्यासाठीचे एक साधन आहे.
देवी महालक्ष्मी होईल प्रसन्न घरी आणा फक्त 100 रु.ची ही वस्तू
शास्त्रीय कारण - हिंदू धर्मातील अनेक प्रथा, परंपरांचा विज्ञानाशी फार जवळचा संबंध आहे. कारण तांबे हा धातू उत्तम विद्युतसुवाहक धातू आहे. तांब्याच्या कलशाच्या माध्यमातून विद्युत चुंबकीय ऊर्जा वाहून नेली जाते. त्या कलशावर असलेल्या नारळाची एक बाजू कलशातील पाण्यात असते आणि शेंडी कडील भाग ब्रह्मांडातील ऊर्जा स्वीकारतो त्या उर्जेपासून एक मंडल तयार होते आणि ही सकारात्मक उर्जा मूलभूत तत्त्वाला जागृत करते. अशा प्रकारे ब्रह्मांडातील ऊर्जा कलशाच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचते.
पौराणिक कथेनुसार कलश पात्राची निर्मिती कशी झाली -समुद्र मंथनाची कथा प्रसिद्ध आहे. देव आणि दानवांनी समुद्रमंथनातून अमृत प्राप्ती व्हावी यासाठी केले पण हे मिळवलेले अमृत कोणत्या भांड्यात भरायचं आणि ते
भांडं कसं तयार करायचं असा प्रश्न उपस्थित झाला. तेव्हा सर्व देवांनी विश्वकर्मा या महान कलाकारावर ही जबाबदारी दिली. विश्वकर्मांनी सर्व देवांमध्ये असलेल्या कलेचं ग्रहण करून एक भांडं तयार केलं. त्यालाच ‘कलश’ म्हणतात. मग तो कलश माती, सोने, चांदी,तांबे या पैकी कशाचाही असो त्याचे महत्त्व तेवढेच असते कारण देवांनी अमृत भरण्यासाठी तयार केलेले
पात्र अशी त्याची महती आहे.
लक्ष्मीप्राप्तीसाठी करा तुळशीच्या पाण्याचा अनोखा उपाय; घराची होते प्रगती
कलशात असलेले पाणी म्हणजे जीवन. जलाने भरलेला कलश हा वरुण देव आणि पवित्र गंगाचे रूप समजून त्याची पूजा केली जाते. कलशावर असलेली पाने कलशा वर आंब्याची किंवा नागवेलीची पाने असतात .या पानांचेही धार्मिक दृष्टीने फार महत्त्व तर आहेच पण ती हिरवी पाने निसर्गाचे,चैतन्याचे,सुबत्तेचे प्रतिक आहे.
कलशावर असलेला नारळ -कलशावर ठेवलेला नारळ हा मंदार पर्वताचे प्रतिक आहे. तसेच नारळात पंचतत्व असतात. पृथ्वी, आप, तेज , वायू आणि आकाश ही पाचही तत्व नारळात आहेत म्हणून त्याला श्रीफळ म्हटले जाते.
कलशाची स्थापना कशी करावी - घरातील मंगलकार्यात गणरायाबरोबर कलश पूजाही केली जाते. कलशावर श्रीफळ अर्थात नारळ ठेवताना शेंडीचा भाग वर करावा. नारळाला पाणी लागेल इतके पाणी कलशात घालावे. एक नाणे टाकावे, नारळाच्या कडेने आंब्याची, किंवा विड्याची पाने लावावीत, नारळावरही हळद कुंकू वहावे. कलशावर हळद कुंकवाने स्वस्तिक काढावे. कलश ठेवण्यापूर्वी खाली तांदूळ वा गहू पसरून त्यावर हळद कुंकू वाहून कलश स्थापित करावा. दर पौर्णिमा,अमावस्येला या कलशातील पाणी बदलावे.अशा प्रकारे सुख-समृद्धी, वैभव आणि मांगल्ल्याचे प्रतिक आपल्या प्रत्येकाच्या घरात असावे.
योगिनी डॉ. स्मिता राऊत
ज्योतिषी
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion, Vastu