मराठी बातम्या /बातम्या /religion /

वसंत पंचमीच्या दिवशी लावा हे रोप, देवी सरस्वती आणि लक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद

वसंत पंचमीच्या दिवशी लावा हे रोप, देवी सरस्वती आणि लक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद

vastu tips : वास्तूनुसार काही झाडे आणि वनस्पती अशा असतात ज्यांचा वापर केल्याने देवतांच्या आशीर्वादाचा वर्षाव घरात सुरू होतो.

vastu tips : वास्तूनुसार काही झाडे आणि वनस्पती अशा असतात ज्यांचा वापर केल्याने देवतांच्या आशीर्वादाचा वर्षाव घरात सुरू होतो.

vastu tips : वास्तूनुसार काही झाडे आणि वनस्पती अशा असतात ज्यांचा वापर केल्याने देवतांच्या आशीर्वादाचा वर्षाव घरात सुरू होतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Prachi Dhole

मुंबई, 21 जानेवारी: वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीचे काही ना काही महत्त्व सांगितले आहे. झाडे आणि वनस्पतींचीही तीच स्थिती आहे. वास्तूनुसार काही झाडे आणि वनस्पती अशा असतात ज्यांचा वापर केल्याने देवतांच्या आशीर्वादाचा वर्षाव घरात सुरू होतो. असे मानले जाते की ही झाडे घरात लावल्याने सकारात्मक ऊर्जा घरात राहू लागते.

घराची आर्थिक स्थिती चांगली होते

ज्योतिषशास्त्रानुसार यावर्षी 26 जानेवारी रोजी वसंत पंचमीचा सण साजरा केला जाणार आहे. वसंत पंचमीचा दिवस संगीत आणि कलेची देवी माता सरस्वतीला समर्पित आहे.

या कारणास्तव हिंदू धर्म आणि संस्कृतीशी संबंधित शाळांमध्येही त्या दिवशी पूजा केली जाते. या दिवशी देवी सरस्वतीचा जन्म झाला असे मानले जाते.

विशेष म्हणजे हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशीच साजरा केला जातो. वास्तुशास्त्रानुसार या दिवशी घरामध्ये ज्ञानाचे झाड लावावे. ज्याला मयुरपंखी असेही म्हणतात. घरामध्ये योग्य दिशेने लावल्यास घराची आर्थिक स्थिती चांगली राहते.

विद्याचे रोप नशीब उजळवते

असे म्हणतात की जीवनात त्यांनाच यश मिळते, ज्यांच्यावर लक्ष्मी आणि देवी सरस्वती यांचा आशीर्वाद असतो. ज्योतिष आणि धार्मिक ग्रंथातही याचा उल्लेख आहे.

वास्तुशास्त्रात काही वनस्पती सांगितल्या आहेत ज्या लावल्याने माता सरस्वती प्रसन्न होते. मयुरपंखी ही त्या वनस्पतींपैकीच एक आहे. ज्याला ज्ञानाचे रोप असेही म्हणतात.

पुस्तकात ते ठेवल्याने ज्ञान वाढते, असे मानले जाते. त्याच वेळी, सकारात्मक ऊर्जा राहते. हे रोप घरामध्ये लावल्याने मन रमते आणि माणसाची निर्णयक्षमताही विकसित होते.

योग्य दिशेने लावल्यास मिळते अमाप संपत्ती

वास्तुशास्त्रानुसार ज्ञानाचे रोप योग्य दिशेने लावल्यास त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतात. घरामध्ये ज्ञानवृक्ष लावल्याने आर्थिक स्थिती सुधारते असे म्हणतात. यासोबतच घरामध्ये अपार संपत्ती राहते.

घराच्या उत्तर दिशेला हे रोप ठेवल्याने व्यक्तीचे नशीब उजळते आणि ज्ञान आणि बुद्धिमत्तेत वाढ होते. पण ते लावण्यासोबतच हे लक्षात ठेवा की वेळोवेळी त्याची छाटणी करणे फार महत्त्वाचे आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion, Vastu