मराठी बातम्या /बातम्या /religion /

Vastu Dosh : या वास्तु दोषांमुळे घरात सारखं येतं आजारपण, वेळीच ओळखून करा हे उपाय

Vastu Dosh : या वास्तु दोषांमुळे घरात सारखं येतं आजारपण, वेळीच ओळखून करा हे उपाय

वास्तुदोषाचा प्रभाव घरातील प्रत्येक सदस्याच्या आरोग्यावर दिसून येतो. महागडे डॉक्टर्स आणि त्याग करूनही काही आजार पाठ सोडत नाहीत, असे अनेकवेळा दिसून आले आहे. वास्तुदोषामुळे असे होत असावे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 4 डिसेंबर : वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर त्याचा परिणाम तुमच्या कामावर तर होतोच, पण त्याचा परिणाम कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही होतो. महागडे डॉक्टर आणि अनेक प्रकारचा त्याग करूनही काही रोग पाठलाग सोडत नसल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. हे तुमच्यासोबत किंवा तुमच्या घरातील कोणत्याही सदस्यासोबत होत असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

सारखं आजारपण येणं, कोणाच्यातरी तब्येतीची सतत कुरबुर असणं हे सर्व तुमच्या घरातील वास्तुदोषामुळे असे होत असेल. भोपाळचे रहिवासी ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी या विषयावर अधिक माहिती दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया वास्तूशी संबंधित असे कोणते घटक आहेत, ज्यामुळे घरामध्ये आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात.

Vastu Tips : अशोकाचं झाड पती-पत्नीच्या नात्यातील तणाव करेल दूर, करा हे सोपे उपाय

तुमच्या घरात असू शकतात हे वास्तुदोष

- वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घराच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात जिना किंवा शौचालय असेल तर ते आजच दुरुस्त करा. कारण यामुळे घरातील सदस्यांसह घरातील प्रमुख महिलेला मानसिक तणाव आणि मेंदूशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

- वास्तुशास्त्रात असे मानले जाते की, जर घरातील स्त्रीने अन्न शिजवताना दक्षिणेकडे तोंड केले तर अशा स्थितीत तिला पाठदुखी, ग्रीवा, सांधेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

- वास्तुशास्त्रानुसार, उत्तरेकडे डोके ठेवून झोपल्याने मायग्रेन, सायनस आणि डोकेदुखीचे आजार होऊ शकतात. याशिवाय जर तुमच्या बेडरूममध्ये बेडच्या समोर आरसा असेल तर तो लगेच काढून टाका. वास्तुशास्त्रानुसार, पलंगाच्या समोर आरसा असल्यामुळे झोपेत असताना आरशात त्याची प्रतिमा दिसल्यास माणूस हळूहळू आजारी पडू लागतो.

9 ग्रहांचे आशीर्वाद मिळण्यासाठी कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत? इथं वाचा

- वास्तुशास्त्रात असे मानले जाते की, घराच्या उत्तर आणि उत्तर-पूर्व दिशा बंद करणे, दक्षिण आणि दक्षिण-पश्चिम दिशा उघडल्याने घरासाठी गंभीर वास्तुदोष निर्माण होतो. असे झाल्यावर आजारपण आणि घरातील खर्च दोन्ही खूप वाढतात.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

First published:

Tags: Health, Health Tips, Lifestyle, Religion, Vastu