मुंबई, 24 जानेवारी : गुरुवारी 26 जानेवारी रोजी वसंत पंचमी आहे. या दिवशी माता सरस्वतीची पूजा केली जाते. यंदा वसंत पंचमीच्या दिवशी चार शुभ योग बनले आहेत. याशिवाय या दिवशी पंचकही लागले आहे आणि शिववासही असतो. तसेच, वसंत पंचमीच्या दिवशी अबुझ मुहूर्त असल्यानं या दिवशी तुम्ही मुहूर्त न पाहता शुभ कार्य करू शकता. यावेळी वसंत पंचमीला जुळून आलेले चार शुभ योग, राज पंचक आणि शिववास यामुळे सरस्वती पूजनाचा दिवस आणखीनच खास बनला आहे.
वसंत पंचमीला 4 शुभ योग
काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जानेवारीला वसंत पंचमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, शिवयोग आणि सिद्ध योग असे चार शुभ योग तयार झाले आहेत. सोमवार 23 जानेवारीपासून राज पंचक सुरू झाले आहे. या दिवशी वसंत पंचमीला भगवान शिव कैलासावर वास करतात, अशी श्रद्धा आहे.
शिवयोग : सकाळपासून दुपारी 03:29 पर्यंत
सिद्ध योग : 27 जानेवारी रोजी दुपारी 03:29 ते दुपारी 01:22 पर्यंत
सर्वार्थ सिद्धी योग : संध्याकाळी 06:57 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 07:12 पर्यंत
रवि योग : संध्याकाळी 06:57 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 07:12 पर्यंत
वसंत पंचमीला राज पंचक
यंदा वसंत पंचमीला राजपंचकही आहे. राज पंचकचा अशुभ प्रभाव नाही. या पंचकमध्ये मालमत्ता, पैसा किंवा सरकारी कामाशी संबंधित गोष्टी केल्यास यश मिळतं. राज्याभिषेकासारखे महत्त्वाचे विधी राज पंचकादरम्यान केले जातात. ते अत्यंत शुभ मानले जाते.
शिववास देखील वसंत पंचमीच्या दिवशी
वसंत पंचमीचा दिवस अतिशय शुभ आहे. या दिवशी शिवभक्तांनाही आनंद होईल, कारण सरस्वती पूजनाच्या दिवशी भगवान शिव कैलासावर वास करणार आहेत. या दिवशी सकाळी 10.28 मिनिटे कैलासावर शिववास असतो, त्यानंतर नंदीवर शिववास असतो. शिववासात रुद्राभिषेक केला जातो. ज्यांना वसंत पंचमीला रुद्राभिषेक करायचा आहे, त्यांच्यासाठी हा शुभ दिवस आहे.
वसंत पंचमी 2023 पूजा मुहूर्त -
26 जानेवारी रोजी सरस्वती पूजनाचा मुहूर्त सकाळी 07:12 ते दुपारी 12:34 पर्यंत आहे. या काळात देवी सरस्वतीची पूजा करावी.
हे वाचा - माघी गणेशोत्सव: गणपतीला साकडं घालताना राशीनुसार या अचूक मंत्राचा करा जप
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.