मराठी बातम्या /बातम्या /religion /Chaitra Navratri 2023: भक्तांना स्वप्नात होते देवीचे दर्शन, आपोआप पावलं वळतात दर्शनासाठी

Chaitra Navratri 2023: भक्तांना स्वप्नात होते देवीचे दर्शन, आपोआप पावलं वळतात दर्शनासाठी

चैत्र नवरात्री स्पेशल

चैत्र नवरात्री स्पेशल

अल्मोडा येथे नंदा देवीचे प्राचीन मंदिर स्थापित आहे. 1670 मध्ये कुमाऊँचे चांद घराण्याचे शासक राजा बाज बहादूर चंद यांनी बदनगढ किल्ल्यावरून नंदा देवीची सुवर्ण मूर्ती अल्मोडा येथे आणली

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

अल्मोडा, 23 मार्च : चैत्र नवरात्रीचा देशभरात उत्साह पाहायला मिळत आहे. आज आपण उत्तराखंडमधील अल्मोडाविषयी बोलायचे झाल्यास, राज्यातील सांस्कृतिक शहरात अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत, जी त्यांच्या ऐतिहासिक आणि पौराणिक श्रद्धांसाठी ओळखली जातात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मंदिराविषयी सांगणार आहोत. अल्मोडाच्या प्राचीन नंदा देवी मंदिराविषयी जाणून घेऊ. माता नंदादेवीला शैलपुत्रीचे रूप मानले जाते.

संपूर्ण उत्तराखंडमध्ये नंदा देवीची पूजा केली जाते. अल्मोडा येथे सुमारे 350 वर्षांपासून नंदा देवीची पूजा केली जाते. अल्मोडा येथील नंदा देवी ही चांद घराण्यातील राजांची कुलदेवी. असे मानले जाते की, आजही ही देवी स्वप्नात दिसते आणि लोकांना दर्शन देते, त्यांच्या मनोकामना पूर्ण करते. या मंदिरात सकाळ, संध्याकाळ आरती केली जाते. यासोबतच लोक संध्याकाळी येथे भजन कीर्तन करतात. या मंदिराच्या भिंतीवर शहराची अनेक चित्रे पाहायला मिळतात.

चांद वंशातील राजांची कुलदेवी -

अल्मोडा येथे नंदा देवीचे प्राचीन मंदिर स्थापित आहे. 1670 मध्ये कुमाऊँचे चांद घराण्याचे शासक राजा बाज बहादूर चंद यांनी बदनगढ किल्ल्यावरून नंदा देवीची सुवर्ण मूर्ती अल्मोडा येथे आणली. त्यांनी ही मूर्ती मल्ल महल (जुने जिल्हाधिकारी कार्यालय) परिसरात अभिषेक केली आणि त्यांची कुलदेवी म्हणून पूजा करण्यास सुरुवात केली.

स्वप्नात दर्शन -

पुजारी तारा दत्त जोशी यांनी सांगितले की, आजही लोक नंदा देवीला राजघराण्यांची कुलदेवी म्हणून पूजतात आणि लोक मोठ्या संख्येने या मंदिरात येतात. भक्त सांगतात की देवी, त्यांना स्वप्नात दिसते, त्यामुळे ते मातेच्या दर्शनासाठी मंदिरात जातात. त्यांनी सांगितले की नुकताच कानपूरचा एक भक्त या मंदिरात पोहोचला होता. त्यांनी स्वप्नात मातेचे दर्शन घेतल्याचे सांगितले होते, त्यानंतर ते या मंदिरात आले.

रजत यात्रा दर 12 वर्षांनी -

भक्त रेखा आर्य यांनी सांगितले की, आपण चैत्र नवरात्रीच्या निमित्ताने मंदिरात आलो आहोत. तसे पहायला गेल्यास संपूर्ण उत्तराखंडची देवी म्हणून देवी नंदाची पूजा केली जाते. दर 12 वर्षांनी मातेची नंदा रज्जत यात्रा काढली जाते, ज्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. भक्त निखिल पंत यांनी सांगितले की, त्यांना या मंदिराची विशेष ओढ आहे. माता साक्षात येथे विराजमान आहे आणि मातेकडून जे काही मागितलं जातं ते ती देते आणि सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करते.

हे वाचा - बापरे..! शुक्र आणि राहू आलेत एकत्र, या राशीच्या लोकांचा ऐन पाडव्याला शिमगा

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Navratri, Religion