मराठी बातम्या /बातम्या /religion /

Shrawan: नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला आहे विशेष महत्व; म्हणून असं जगातील एकमेव शिवलिंग

Shrawan: नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला आहे विशेष महत्व; म्हणून असं जगातील एकमेव शिवलिंग

भगवान शिवाचे पवित्र निवासस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जाण्यासाठी आपण देशाच्या कोणत्याही भागातून रेल्वेने किंवा रस्त्याने नाशिकपर्यंत आणि नंतर तेथून सुमारे 30 किमी प्रवास करून त्र्यंबकेश्वरला पोहोचू शकता.

भगवान शिवाचे पवित्र निवासस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जाण्यासाठी आपण देशाच्या कोणत्याही भागातून रेल्वेने किंवा रस्त्याने नाशिकपर्यंत आणि नंतर तेथून सुमारे 30 किमी प्रवास करून त्र्यंबकेश्वरला पोहोचू शकता.

भगवान शिवाचे पवित्र निवासस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जाण्यासाठी आपण देशाच्या कोणत्याही भागातून रेल्वेने किंवा रस्त्याने नाशिकपर्यंत आणि नंतर तेथून सुमारे 30 किमी प्रवास करून त्र्यंबकेश्वरला पोहोचू शकता.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 08 ऑगस्ट : हिंदू धर्मात भगवान शिवाची उपासना अत्यंत साधी आणि सोपी मानली जाते. देवांचे देव म्हटल्या जाणार्‍या महादेवाची देशात अशी अनेक पवित्र धाम आहेत, जिथे केवळ दर्शनाने शिवभक्तांचे सर्व दुःख, वेदना दूर होतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात. देशातील प्रमुख शिवमंदिरांमध्ये द्वादश ज्योतिर्लिंगाला विशेष स्थान आहे. यापैकी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असलेल्या भगवान त्र्यंबकेश्वरला खूप धार्मिक महत्त्व आहे. कारण हे जगातील एकमेव शिवलिंग आहे, जिथे पूजा केल्यास ब्रह्मा आणि भगवान विष्णूसह भगवान शिवाचा आशीर्वाद मिळतो. श्रावण महिन्यात शिवाची पूजा करण्यापूर्वी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया. टीव्ही 9 ने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 12 ज्योतिर्लिंगांमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिराला खूप महत्त्व आहे, कारण देशातील उर्वरित ज्योतिर्लिंगांमध्ये भगवान शिव हे एकमेव प्रमुख देवता म्हणून पूजले जातात, या मंदिरात मात्र भगवान विष्णू आणि ब्रह्माजी देखील शिवासोबत असतात असे मानले जाते. भगवान शिवाचे पवित्र निवासस्थान असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जाण्यासाठी आपण देशाच्या कोणत्याही भागातून रेल्वेने किंवा रस्त्याने नाशिकपर्यंत आणि नंतर तेथून सुमारे 30 किमी प्रवास करून त्र्यंबकेश्वरला पोहोचू शकता. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या आतील गाभाऱ्यात पोचल्यावर डोळ्यांसारखे येथे असलेले ज्योतिर्लिंग पाण्याने भरलेले दिसते. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या आत प्रत्येकी एक इंचाची तीन लिंगे दिसतात. ज्यांची ब्रह्मा, विष्णू आणि महेश म्हणून पूजा केली जाते. श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची आराधना केल्याने साधकाला त्रिदेव म्हणजेच भगवान शिव यांच्यासह ब्रह्मा आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद प्राप्त होतात. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाविषयी असे मानले जाते की, गौतम ऋषी आणि गोदावरी नदीच्या विनंतीवरून भगवान शिवाला येथे बसावे लागले होते. काळ्या दगडांनी बनवलेले त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिकमध्ये ब्रह्मगिरी पर्वत आणि गोदावरी नदीजवळ आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराची रचना अतिशय सुंदर आहे, प्रत्येक भक्त त्याकडे आकर्षित होतो. असे मानले जाते की जेव्हा गुरू ग्रह सिंह राशीत येतो, तेव्हा भगवान शिवाच्या या पवित्र निवासस्थानी कुंभ महापर्व होते. यासाठी सर्व तीर्थक्षेत्रे आणि देवता येतात. कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी, देश-विदेशातील भाविक गोदावरीत पवित्र स्नानासाठी आणि भगवान त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी आणि पूजेसाठी पोहोचतात. हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर जन्मकुंडलीशी संबंधित कालसर्प दोष दूर करण्यासाठी देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिराचेही मोठे नाव आहे. या पवित्र निवासस्थानी शिवाची पूजा केल्याने काल सर्प दोषापासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात काल सर्प दोष दूर करण्याच्या पूजेबरोबरच त्रिपिंडी पद्धतीचे आणि नारायण नागबलीची विशेष पूजा करण्याचे खूप महत्त्व आहे. हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा असे मानले जाते की त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची पूजा केल्याने व्यक्तीची केवळ या जन्माचीच नाही तर मागील जन्माची पापेही दूर होतात आणि त्याला सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ती सादर केली आहे.)
First published:

Tags: Religion

पुढील बातम्या