मुंबई, 8 जानेवारी: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (8 जानेवारी 2023) राशिभविष्य
मेष (Aries) : नोकरीच्या ठिकाणी प्रगतीसाठी प्रयत्न अधिक तीव्र करावे लागतील. पदाच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. व्यावसायिक कामात, व्यवसायात सहकार्य मिळेल. सक्रिय राहाल. वातावरण सकारात्मक राहील. सर्वांचं सहकार्य मिळेल. मोठा विचार करा. तुमच्यासमोरील अडथळे आपोआप दूर होतील.
उपाय : देवी सरस्वतीला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करा.
वृषभ (Taurus) : ऑफिसमध्ये अपेक्षित परिणाम मिळतील. वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करा, तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. सर्वांचं सहकार्य मिळेल. करिअर, व्यवसायात स्पर्धा कायम ठेवाल. महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीगाठी होतील. व्यावसायिक उद्दिष्टे पूर्ण होतील. सर्व जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाल. व्यवसाय क्षेत्रात मजबूत कामगिरी होईल.
उपाय : भगवान श्रीरामाच्या मंदिरात ध्वज लावा.
मिथुन (Gemini) : कर्ज घेणं आणि देणं टाळा, अन्यथा नुकसान होईल. कामाच्या ठिकाणी जास्त बडबड करणं टाळा. नोकरीत व्यावसायिकता ठेवा. जुने मुद्दे समोर येऊ शकतात. गुंतवणुकीच्या बाबतीत रस घ्याल. व्यावसायिक कामात जागरूकता राखली जाईल. व्यवसाय विस्तारावर भर द्याल.
उपाय : भगवान श्री हनुमान मंदिरात तुपाचा दिवा लावा.
कर्क (Cancer) : व्यावसायिक क्षेत्रातील उपलब्धता वाढेल. करिअर, व्यवसायात शुभ योग आहे. सिस्टिम मॅनेजमेंट मजबूत राहील. आर्थिक प्रश्न सुटतील. योग्य दिशेनं पुढं जा. धैर्य वाढेल. ध्येयाभिमुख राहाल. नवीन कामात रस घ्याल. उद्योग व्यवसायात सुधारणा होईल.
उपाय : भगवान शंकराला जल अर्पण करा.
सिंह (Leo) : पैशांशी संबंधित व्यवहार उत्तम होतील, बचत होईल. करिअर व्यवसायात केलेले प्रयत्न कामी येतील. संपत्तीत वाढ होईल. व्यवसाय चांगला राहील. कामकाजात सकारात्मकता वाढेल. नफ्याची टक्केवारी चांगली राहील. अनुकूलता वाढेल.
उपाय : श्री भैरव मंदिरात नारळ अर्पण करा.
कन्या (Virgo) : करिअर, व्यवसायात संकोच वाटणार नाही. अपेक्षित यश मिळेल. व्यावसायिक कामांना गती येईल. वस्तू आणि विचारांची देवाण-घेवाण वाढेल. व्यवसायाच्या दृष्टीनं आवश्यक प्रवास करू शकतात. कामात निष्काळजीपणा टाळा.
उपाय : गाईला हिरवा चारा खाऊ घाला.
तूळ (Libra) : ऑफिसमधील कामं गांभीर्यानं करा, जवळचे आणि सहकारी मदत करतील. गुंतवणुकीच्या कोणत्याही मोहात पडणं टाळा. करिअर, व्यवसाय सकारात्मक राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. सक्रियपणे काम कराल. वडिलोपार्जित व्यवसायात चांगले परिणाम दिसतील.
उपाय : पिवळे पदार्थ दान करा.
वृश्चिक (Scorpio) : जीवनातील अत्यावश्यक कामे वेगानं पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. चांगल्या ऑफर्स मिळतील. विविध प्रश्न मार्गी लागतील. करिअर, व्यवसायावर लक्ष केंद्रित करा. लाभाची टक्केवारी चांगली राहील.
उपाय : भगवान श्री कृष्ण मंदिरात बासरी अर्पण करा.
धनू (Sagittarius) : गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीला बळी पडणं टाळा. अनोळखी व्यक्तींवर पटकन विश्वास ठेवू नका, मीटिंगमध्ये सावधगिरी बाळगा. महत्त्वाचे सौदे करताना संयम ठेवा. गोंधळून जाऊ नका आणि दिशाभूल करू नका. निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. व्यवस्थेवर विश्वास ठेवा. सहकाऱ्यांचा विश्वास जिंकाल. परिस्थिती सामान्य राहील.
उपाय : श्री हनुमान चालिसाचा पाठ करा.
मकर (Capricorn) : व्यवसायातील भागीदारी प्रकरणं तुमच्या बाजूनं असतील. व्यावसायिक यशात वाढ होईल. अधिकारीपदावर नोकरी करणारा वर्ग आनंदी राहील. मोठेमोठ्या उद्योगधंदे व्यवसायासोबत जोडले जावेत, असे वाटेल. नेतृत्वाची भावना निर्माण होईल. जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल. आर्थिक लाभ अधिक चांगला होईल. कामात स्पष्टता राहील.
उपाय : भगवान शंकराला पंचामृताने अभिषेक करा.
कुंभ (Aquarius) : गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक बाबींमध्ये सहजता राहील. आर्थिक बाबी संमिश्र राहतील. दूरदृष्टी ठेवा. कर्जाचे व्यवहार टाळा. संशोधनात सहभागी व्हा. कामात संयम वाढेल. करिअर, व्यवसाय संमिश्र राहील. आवश्यक निर्णय घेण्यास विलंब करू नका.
उपाय : भगवान श्रीकृष्ण मंदिरात बासरी अर्पण करा.
मीन (Pisces) : आर्थिक प्रगतीच्या संधी वाढतील. विविध क्षेत्रात चांगली कामगिरी कराल. व्यावसायिकता राखाल. नवीन काम सुरू करू शकाल. आत्मविश्वास वाढेल. स्पर्धेत प्रभावी ठराल. वाणिज्य विषयात रुची राहील. करिअर, व्यवसायात गती राहील.
उपाय : वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेऊन घरातून बाहेर पडा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Rashichark, Religion