मुंबई, 31 डिसेंबर : आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (31 डिसेंबर 2022) राशिभविष्य
मेष (Aries) : आज तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला नव्या संधी मिळतील. कामाच्या पॅशनमुळे तुम्हाला यश मिळेल. स्टॉक मार्केटमध्ये रस घेऊ नका. या वेळी तोट्याची शक्यता आहे. ऑफिशियल उपक्रम इच्छेनुसार होतील.
उपाय : छोट्या मुलींना गोड खाऊ घाला.
वृषभ (Taurus) : बिझनेसमध्ये नवे प्लॅन्स केले जातील. त्यांची चांगल्या रीतीने अंमलबजावणीही होईल; मात्र अतिरिक्त कष्ट करावे लागतील आणि व्यग्र राहाल. नोकरीत महत्त्वाची जबाबदारी मिळेल. ती तुमच्या प्रगतीसाठी उपयुक्त ठरेल.
उपाय : गुरूंचा आदर करा.
मिथुन (Gemini) : बिझनेस सेक्टरमध्ये तुमची उपस्थिती नक्की राखा. कर्मचाऱ्यांच्या सजेशन्स मोकळ्या मनाने स्वीकारा. त्यामुळे तुमच्या बिझनेसच्या विस्ताराची शक्यता निर्माण होईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत टीमवर्क करणं योग्य ठरेल.
उपाय : पर्समध्ये चांदीचं नाणं ठेवा.
कर्क (Cancer) : ईप्सित काम झाल्यानंतर तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप रिलॅक्स वाटेल. वाहन किंवा जमिनीची खरेदी होणं शक्य आहे. मुलांना आई-वडिलांकडून पूर्ण सहकार्य आणि पाठबळ मिळेल. नातेसंबंध मजबूत करण्यासाठी तुमचं महत्त्वाचं योगदान राहील.
उपाय : श्री यंत्राचं पूजन करा आणि ते तुमच्यासोबत ठेवा.
सिंह (Leo) : रखडलेल्या कामांना गती प्राप्त होईल. त्यासोबत काही नव्या योजनांनाही सुरुवात होईल. तुमच्या महत्त्वाकांक्षा आणि स्वप्नांसाठी कष्ट करण्याकरिता हा योग्य काळ आहे. नोकरीत समस्या कायम राहतील. अधिक वेळही द्यावा लागू शकेल.
उपाय : कामाच्या ठिकाणी भगवान श्री गणेशाचं पूजन करा.
कन्या (Virgo) : बिझनेस प्लॅन्सवर काम करण्यासाठी योग्य वेळ आहे. तुम्हाला योग्य सल्ला आणि सजेशन्स मिळतील. मीडिया, कम्प्युटर आदी बिझनेसमध्ये उत्तम यश मिळेल. सरकारी नोकरीतल्या व्यक्तींना ऑफिशियल प्रवास घडेल.
उपाय : वाहत्या पाण्यात नारळ अर्पण करा.
तूळ (Libra) : बिझनेसमध्ये उद्दिष्टपूर्तीसाठी अविश्रांत कष्टांची गरज आहे. आत्ता, या वेळी तुमच्या मनात बिझनेसविषयी जी काही स्वप्नं आहेत ती खरी करण्यासाठी योग्य वेळ आहे. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना चांगली बातमी मिळू शकेल.
उपाय : अनाथाश्रमात अन्नदान करा.
वृश्चिक (Scorpio) : बिझनेसमध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं ठरतं. सध्या विस्तारीकरणासाठी योग्य शक्यता निर्माण होत आहेत. त्यामुळे तुमच्या उद्दिष्टाप्रति समर्पित भावनेने काम करत राहा. अति विचार केल्यामुळे अचीव्हमेंट्स हाताबाहेरही जाऊ शकतात.
उपाय : मोहरीचं तेल लावलेला ब्रेड काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.
धनू (Sagittarius) : बिझनेसमध्ये समस्या असतील. तुमचे कर्मचारी, तसंच हाताखालच्या व्यक्ती यांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या. कामाचा ताण कमी करण्यासाठी तुमचं काम वाटून घेण्याचा प्रयत्न करा. ऑफिशियल टूरसंदर्भात कोणतीही ऑर्डर मिळू शकते.
उपाय : भगवान श्रीकृष्णाला साखर अर्पण करा.
मकर (Capricorn) : बिझनेसशी संबंधित निर्णय तातडीने घेण्याचा प्रयत्न करा. अतिरिक्त उत्पन्न मिळायला सुरुवात होऊ शकेल. तरुण त्यांच्या करिअरबद्दल उत्साही असू शकतील. ऑफिसमध्ये तुमचा डॉमिनन्स असू शकेल. एखाद्या प्रोजेक्टबद्दल मनात सुरू असलेला गोंधळ संपेल.
उपाय : वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद घ्या आणि मगच घराबाहेर पडा.
कुंभ (Aquarius) : इम्पोर्ट-एक्स्पोर्टच्या बिझनेसमध्ये खूप सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुमच्या पद्धतीत बदल करून तुम्हाला बिझनेसमध्ये नव्या संधी मिळू शकतात. ऑफिसमधल्या एखाद्या छोट्याशा चुकीमुळेही समस्या वाढू शकतात. उच्चाधिकाऱ्यांकडून मदत घेणं श्रेयस्कर ठरेल.
उपाय : शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करा.
मीन (Pisces) : बिझनेसमध्ये सध्या अधिक पब्लिसिटीची गरज आहे. कामाची पद्धत बदलून आणि नवं तंत्रज्ञान स्वीकारून चांगले रिझल्ट्स प्राप्त होऊ शकतात. नोकरीत सहकाऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारचा वाद घालू नका.
उपाय : भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Religion