मराठी बातम्या /बातम्या /religion /या राशीचे प्रॉपर्टीशी निगडित बिझनेसमध्ये आज महत्त्वाचं डील होईल !

या राशीचे प्रॉपर्टीशी निगडित बिझनेसमध्ये आज महत्त्वाचं डील होईल !

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून आजच्या दिवसाचं (30 डिसेंबर 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून आजच्या दिवसाचं (30 डिसेंबर 2022) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून आजच्या दिवसाचं (30 डिसेंबर 2022) राशिभविष्य

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई,30 डिसेंबर: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (30 डिसेंबर 2022) राशिभविष्य

    मेष (Aries) : काही समस्या असू शकतात. बिझनेसमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. प्रतिष्ठित व्यक्तींशी भेट होईल. नोकरीत हव्या असलेल्या ठिकाणी बदली होऊ शकेल.

    उपाय : दुर्गामातेच्या मंदिरात तुपाचा दिवा लावावा.

    वृषभ (Taurus) : गुंतवणुकीसारख्या आर्थिक बाबींमध्ये व्यग्र राहाल. बऱ्याच काळापासून सतावत असलेल्या चिंतेपासून दिलासा मिळेल. घरात जवळच्या नातेवाईकांचं आगमन होईल. परस्पर तडजोडीमुळे घरात सुखद वातावरण असेल.

    उपाय : गरीब व्यक्तीला पांढऱ्या वस्तू दान करा.

    मिथुन (Gemini) : स्वार्थी बनणं बिझनेसमध्ये यश मिळण्यासाठी आवश्यक असतं. तरुणांना करिअरशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. दूरवर राहणाऱ्या व्यक्तींशी महत्त्वाचे संपर्क साधले जातील. सध्या बिझनेसमध्ये येणाऱ्या समस्या सोडवल्या जातील.

    उपाय : पक्ष्यांना खाऊ घाला.

     

    कर्क (Cancer) : बिझनेसमध्ये खूप कष्टांची गरज आहे. त्यातून तुम्ही काही तरी साध्य कराल. प्रॉपर्टीशी निगडित बिझनेसमध्ये महत्त्वाचं डील होणं शक्य आहे. नोकरदार व्यक्तींच्या कामामध्ये अचानक समस्या उद्भवू शकतात.

    उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळ खाऊ घाला.

     

    सिंह (Leo) : बिझनेसशी संबंधित कोणतीही कृती करू नका. प्रॉपर्टीशी संबंधित कामामध्ये दक्ष राहून तुम्ही मोठ्या संकटापासून वाचू शकता. नोकरदार व्यक्तींनी लक्ष्य साध्ये केल्यास प्रमोशन होण्याच्या संधीही तयार होतील.

    उपाय : काळ्या कुत्र्याला काही तरी गोड खाऊ घाला.

    कन्या (Virgo) : ग्रहस्थिती बिझनेसला अनुकूल आहे. मोठी ऑर्डर मिळण्याचीही शक्यता आहे; पण हे लक्षात घ्या, की काही महत्त्वाच्या प्लॅन्सची माहिती फुटू शकेल. मार्केटिंगशी संबंधित कामांमध्ये तुमचा काही वेळ व्यतीत करा.

    उपाय : शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तीची सेवा करा.

    तूळ (Libra) : बिझनेसशी संबंधित काम करताना सध्या खूप दक्ष राहण्याची गरज आहे. सध्याच्या कामांवरच लक्ष केंद्रित ठेवणं श्रेयस्कर ठरेल. ऑफिसमध्ये कोणत्याही प्रोजेक्टला अंतिम रूप देण्याआधी त्याच्या सर्व पैलूंवर चर्चा करा.

    उपाय : काळ्या कुत्र्यांना खाऊ घाला.

    वृश्चिक (Scorpio) : सध्याच्या परिस्थितीमुळे बिझनेसच्या फंक्शनिंगमध्ये काही बदल घडवावे लागतील. त्यामुळे तुम्हाला अधिक चांगले परिणाम मिळतील. विरोधकांच्या कृतींकडे दुर्लक्ष करू नका. ऑफिसमध्ये सुरू असलेल्या नकारात्मक कामांपासून स्वतःला दूर ठेवा.

    उपाय : पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.

    धनू (Sagittarius) : फिल्डमधल्या कष्टांच्या अनुषंगाने रिझल्ट्स मिळतील. कमिशन, कन्सल्टन्सी यांसारख्या बिझनेसमधून उत्तम नफा मिळणं अपेक्षित आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण होऊन विद्यार्थ्यांना अपॉइंटमेंट्स मिळतील. नोकरीत एखाद्या महत्त्वाच्या कामाचे अधिकार मिळाल्याने आनंदी राहाल.

    उपाय : सरस्वती देवीला पांढऱ्या फुलांचा हार घाला.

    मकर (Capricorn) : कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या पार पाडाल. आजचा दिवस बिझी असेल. मीटिंगचे सकारात्मक परिणाम साध्य होतील. नोकरदार व्यक्तींनी आर्थिक बाबींशी निगडित कामं अधिक दक्षतेने करावीत.

    उपाय : श्रीराम मंदिरात ध्वज अर्पण करा.

    कुंभ (Aquarius) : एखाद्या अनुभवी किंवा राजकीय व्यक्तीशी भेट होईल आणि तुमची कौटुंबिक समस्या सोडवली जाईल. गुंतवणुकीशी संबंधित प्लॅन्सवर विशेष लक्ष ठेवा. कारण परिस्थिती अनुकूल आहे. कुटुंबीयांसमवेत कुठे तरी जाण्याचा कार्यक्रम आखाल.

    उपाय : श्री हनुमानाच्या मंदिरात तुपाचा दिवा लावावा.

    मीन (Pisces) : कोणत्याही प्रकारचा प्रवास सध्या पुढे ढकला. केवळ कामाच्या ठिकाणी लक्ष द्या. पब्लिक डीलिं आणि माध्यमांशी निगडित कामांवर खूप लक्ष केंद्रित करा. सध्या नफ्याची शक्यता आहे. ऑफिसमधलं वातावरण सकारात्मक असेल. ऑफिसर्सशी दृढ संबंध प्रस्थापित होतील.

    उपाय : भगवान शिवशंकरांना जल अर्पण करा.

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion