मुंबई, 28 डिसेंबर: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (28 डिसेंबर 2022) राशिभविष्य
मेष (Aries) : तुमची कामाची पद्धत आणि व्यावसायिक अॅक्टिव्हिटीमध्ये लक्ष दिल्यास नक्कीच काही सुधारणा होईल. प्रभावी व्यक्तीच्या मदतीनं योग्य ऑर्डर मिळण्याचीही शक्यता आहे. नोकरीच्या संदर्भात प्रवास दौऱ्यावर जाण्याचं नियोजन कराल.
उपाय : भगवान श्री गणेशाची पूजा करा. हिरव्या वस्तू जवळ ठेवा.
तुम्हालाही मृत व्यक्ती नेहमी स्वप्नात दिसतात का? सावधान; हे असू शकतात यामागचे संकेत
वृषभ (Taurus) : व्यवसायात कोणत्याही विशेष कामासाठी केलेल्या योजना अंमलात येतील. तुमच्या कामासंबंधी महत्त्वाच्या असणाऱ्या फाइल्स आणि कागदपत्रं सुरक्षित ठेवा. अन्यथा एखाद्याकडून त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. प्रवासाची शक्यता असून तो तुमच्या प्रमोशनमध्येही उपयुक्त ठरेल.
उपाय : भगवान श्री गणेशाची पूजा करा. हिरव्या वस्तू जवळ ठेवा.
मिथुन (Gemini) : व्यवसायात काही अडथळे येतील. तथापि, तुमच्या मेहनतीनुसार, योग्य परिणामदेखील मिळतील. एखाद्यानी उसने घेतलेले पैसे मिळाल्यानं आर्थिक स्थिती सामान्य राहील. सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तीनं सार्वजनिक ठिकाणी अत्यंत सावधगिरी बाळगावी.
उपाय : देवी कालीमातेची पूजा करा.
कर्क (Cancer) : तुमच्या व्यवसायासंबंधी असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात राहा, आज नवीन ऑर्डर किंवा डील फायनल होऊ शकते. कोणतीही महत्त्वाची योजना गुप्त ठेवा. इतरांशी ती शेअर केल्यानं तुम्हाला त्रास होईल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांसोबत वेळ मजेत जाईल.
उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळ दान करा.
सिंह (Leo) : मशिनरीसंबंधित व्यवसायात फायदेशीर परिस्थिती निर्माण होईल, आणि तुम्हाला चांगली ऑर्डरदेखील मिळेल. सरकारी नोकरीत कोणत्याही बेकायदेशीर कामात रस घेऊ नका, चौकशी होऊ शकते. यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.
उपाय : लाल रंगाची वस्तू जवळ ठेवा. भगवान श्री हनुमानाची पूजा करा.
कन्या (Virgo) : व्यावसायिक कामात खूप मेहनत घ्यावी लागेल. मात्र त्याचे तुम्हाला नजीकच्या भविष्यात योग्य परिणाम मिळतील. मीडिया, कॉम्प्युटर इत्यादी व्यवसायांत नवीन संधी निर्माण होतील. टॅक्स संबंधित कामांत अडचणी येऊ शकतात.
उपाय : निळ्या वस्तू दान करा.
तूळ (Libra) : व्यवसायात काही आव्हानं कायम राहतील. एकामागून एक समस्या येतील. पण हळूहळू त्यावरही उपाय सापडेल. विस्ताराची कोणतीही योजना आखली जात असेल, तर ती त्वरित अंमलात आणा, परिस्थिती अनुकूल आहे.
उपाय : श्री शनिदेवाची पूजा करा.
वृश्चिक (Scorpio) : आयात-निर्याती संबंधी व्यवसायात उत्तम यश मिळेल. जवळच्या व्यावसायिकांशी सुरू असलेल्या स्पर्धेत तुम्हाला यश मिळेल. नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी संबंध सुधारतील.
उपाय : गाईला भाकरी खायला द्या.
धनू (Sagittarius) : व्यावसायिक अॅक्टिव्हिटींमध्ये खूप स्पर्धेला सामोरं जावं लागेल. सहकाऱ्याची नकारात्मक वृत्ती तुम्हाला त्रास देऊ शकते, ऑफिसमध्ये तुमच्या कामाच्या उत्कृष्ट पद्धतीमुळे तुम्हाला काही महत्त्वाचे अधिकारही मिळू शकतात.
उपाय : भगवान श्री हनुमानाची पूजा करा.
मकर (Capricorn) : विमा पॉलिसीसंबंधी व्यवसायात फायदेशीर परिस्थिती निर्माण होत असली तरी स्पर्धेच्या अतिरेकामुळे तणाव कायम राहील. पण तुमच्या समजुतीतूनही उपाय निघतील. सरकारी नोकरी करणार्यांना काही चुकींमुळे उच्च अधिकार्यांकडून फटकारले जाऊ शकते.
उपाय : देवी कालीमातेची पूजा करा.
कुंभ (Aquarius) : व्यावसायिक अॅक्टिव्हिटींमध्ये इतरांवर विश्वास ठेवल्यानं नुकसान होऊ शकतं, म्हणून स्वतःच्या निर्णयाकडे लक्ष द्या. आर्थिक बाबी सुधारतील. तुमची कामाची पद्धत फायदेशीर परिस्थिती निर्माण करेल. ऑफिसमधील वातावरण सामान्य राहील.
उपाय : भगवान श्री शंकराला जल अर्पण करा.
मीन (Pisces) : व्यवसायात कोणत्याही प्रकारचा उधारीवर व्यवहार करू नका. मालमत्तेशी संबंधित कामात सर्वोत्तम डील अंतिम टप्प्यात येईल. ऑफिसमध्ये छोट्याशा चुकीमुळे तुम्हाला अधिकारी वर्गाची नाराजी सहन करावी लागू शकते, सावध राहा.
उपाय : पिवळ्या वस्तू जवळ ठेवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion