मुंबई, 25 मे: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (25 मे 2023) राशिभविष्य
मेष (Aries) : व्यावसायिकांच्या कमर्शियल अॅक्टिव्हिटीजमध्ये सक्रियता येईल. नोकरदार व्यक्ती ऑफिसच्या कामांना प्राधान्य देतील. मोठ्या विचारातून उत्तम रिझल्ट्स मिळतील. आर्थिक बाबतीत मनोबल वाढेल. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. गरजेची कामं करण्यापूर्वी गरजेचा सल्ला घ्या.
उपाय : श्री गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखवा.
वृषभ (Taurus) : करिअरमध्ये बिझनेस गोल्सना प्राधान्य द्याल. धनधान्यात वाढ होईल. गुंतवणुकीतून नफा होईल. बराच काळ अडकून पडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींचा दिवस सर्वसाधारण असेल. बिझनेसच्या सकारात्मक रिझल्ट्समुळे उत्साही असाल. मौल्यवान गिफ्ट मिळेल. प्रभावी ऑफर्स मिळतील.
उपाय : घरातून बाहेर पडण्यापूर्वी दही खा.
मिथुन (Gemini) : करिअरमध्ये बिझनेस प्रभावी राहील. वेगवेगळी कामं वेगाने पूर्ण कराल. नोकरीच्या आकर्षक संधी प्राप्त होतील. व्यावसायिकांची संपत्ती वाढेल. ट्रेडर्सना इनोव्हेशनमध्ये रस असेल. वैयक्तिक कामगिरीवर भर असेल. स्वतःचे प्रयत्न उत्तम राहतील. सलोखा वाढवाल.
उपाय : श्री हनुमानाच्या मंदिरात ध्वज अर्पण करा.
कर्क (Cancer) : बिझनेसमधल्या जोखमीच्या कामांमध्ये संयम राखा. व्यवहारांमध्ये घाई-गडबड करू नका. नोकरदार व्यक्ती प्रोफेशनल्सचा विश्वास जिंकतील. परदेशाशी निगडित व्यवहार होतील. उत्पन्न सर्वसाधारणपेक्षा जास्त असेल. कामाच्या विस्तारीकरणासाठी संधी असतील. दिखाऊपणा करू नका. इच्छा असलेली वस्तू घेणं शक्य होईल; मात्र तिची किंमत गरजेपेक्षा जास्त असेल.
उपाय : लक्ष्मीमातेला खिरीचा नैवेद्य दाखवा.
सिंह (Leo) : वर्क बिझनेसमध्ये स्पर्धेची जाणीव ठेवा. नव्या संधी वाढतील. जमीन, प्रॉपर्टी आदींच्या बाबतीत मोह टाळा. ऑफिसच्या कामात उत्साहाने सहभागी व्हाल. युवकांची कार्यक्षमता वाढेल. महत्त्वाची काँट्रॅक्ट्स अनुकूल होतील. महत्त्वाची प्रकरणं हाताळली जातील. पदाच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. पत आणि सन्मानात वाढ होईल.
उपाय : 'ॐ सूर्याय नमः' मंत्राचा 108 वेळा जप करा.
Vastu Tips of Kitchen: आर्थिक समस्येतून सुटकेसाठी करा या मसाल्याचा वापर
कन्या (Virgo) : ऑफिसमधले सहकारी तुम्हाला प्रत्येक बाबतीत मदत करतील. उत्पन्न चांगलं असेल. तुमच्या उत्तम गुणांच्या कामगिरीमुळे प्रत्येक जण प्रभावित होईल. ट्रेडर्सना महत्त्वाच्या कामांमध्ये इच्छा असलेली प्रपोझल्स मिळतील. जबाबदार व्यक्तींशी संपर्क वाढेल. उद्दिष्टावर फोकस कायम राखाल. प्रॉपर्टीशी निगडित समस्या सोडवल्या जातील. चर्चांमध्ये प्रभावी ठराल. सेवेशी संबंधित प्रकरणं अनुकूल ठरतील.
उपाय : छोट्या मुलींना अभ्यासाचं साहित्य द्या.
तूळ (Libra) : बिझनेसशी संबंधित प्लॅन्सना गती येईल. अनुरूपता असेल. धोरणात्मक नियम पाळाल. इंडस्ट्रीज बिझनेसवरचा प्रभाव कायम राखतील. सर्वत्र पावित्र्याचा संवाद असेल. महत्त्वाची कामं सहजपणे कराल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल. कमर्शियल प्रकरणं अनुकूल होतील.
उपाय : ज्येष्ठांचा आदर करा.
वृश्चिक (Scorpio) : सिस्टीममध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करा. प्रोफेशनल बाबतींत काळजी घ्या. करिअर बिझनेसमध्ये परिस्थिती संमिश्र राहील. गरजेच्या कामांची यादी करा. वेळेच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करा. नव्या व्यक्तींपासून अंतर राखा. धूर्त व्यक्तींपासून सावध राहा.
उपाय : आई-वडिलांची सेवा करा.
धनू (Sagittarius) : उत्पन्नाचे नवे स्रोत तयार होतील. स्थिरतेला मजबुती मिळेल. वाटाघाटींमध्ये प्रभावी राहाल. इंडस्ट्रीज बिझनेसचं मजबुतीकरण करतील. मोठे प्रयत्न केले जातील. करिअर बिझनेस उत्तम राहील. उद्दिष्टाप्रति समर्पित असाल. जोखीम घेण्याचा विचार कराल. आर्थिक बाबींमध्ये वेग वाढवा. नफा आणि प्रभाव यांमध्ये वाढ होईल.
उपाय : श्री विष्णूला तुळस अर्पण करा.
घरातील कलह, वास्तुदोष दूर करण्यासाठी नक्की करा मोरपिसांचे हे उपाय
मकर (Capricorn) : सेवा व्यवसायात सकारात्मक कामगिरी कायम राखा. व्यवहारांत दक्षता वाढवा. सकारात्मक व्यवस्थापनामुळे उत्साह वाढेल. बिझनेसच्या बाबतीत सुधारणा होईल. उद्दिष्टप्राप्ती कराल. कोणाहीकडून कर्ज घेऊ नका. नोकरदार व्यक्तींच्या कार्यक्षमतेला चालना मिळेल. कामगारांमध्ये वाढ होईल. कष्टांच्या साह्याने स्थान कायम राखाल. कामाचा वेग उत्तम असेल.
उपाय : गरजू मुलांना खाऊ घाला.
कुंभ (Aquarius) : बिझनेसमध्ये सर्व बाजूंनी सकारात्मक राहाल. नव्या बिझनेसमध्ये सक्रियपणे पुढे सरकाल. बराच काळ रखडलेल्या महत्त्वाच्या कामांना गती मिळेल. समजून घेऊन केलेल्या करिअर बिझनेसमध्ये अपेक्षित यश मिळेल. नफा आणि विस्तारीकरणासाठी केलेल्या प्रयत्नांत सुधारणा होईल. ऑफिसमध्ये वेळेच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित कराल. बेरोजगारांना नोकरीच्या नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे.
उपाय : भगवा टिळा लावून घरातून बाहेर पडा.
मीन (Pisces) : छोट्या उद्योजकांनी आर्थिक बाबतींत घाई-गडबड टाळावी. गुंतवणुकीच्या नावाखाली हाव धरू नका. कमर्शियल बाबी सुधारतील. धैर्य वाढेल. विरोधाबद्दल जागरूक असाल. वादविवाद टाळा. नोकरदार व्यक्तींनी स्वार्थीपणा आणि संकुचित मनोवृत्ती सोडून द्यावी. व्यवस्थापनात उत्तम असाल. चर्चा, संवादात तर्कनिष्ठता राखाल. वैयक्तिक बाबींमध्ये सक्रियता दाखवाल. वादविवाद टाळा. कम्फर्टेबल राहा.
उपाय : कामाच्या ठिकाणी श्री गणेशाची पूजा करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Life18, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion