मराठी बातम्या /बातम्या /religion /Money Mantra - मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकाल

Money Mantra - मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकाल

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (24 मे 2023) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (24 मे 2023) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (24 मे 2023) राशिभविष्य

  मुंबई, 24 मे: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (24 मे 2023) राशिभविष्य

  मेष (Aries) : कामातले अडथळे आपोआप दूर होतील. धैर्यामुळे शक्ती वाढेल. सक्रियपणे काम कराल. सर्व क्षेत्रांत प्रभावी राहाल. स्थान, प्रतिष्ठा आणि संधी यांमध्ये वाढ होईल. गती राखाल. घाई-गडबड करू नका. ट्रिपला जाऊ शकाल.

  उपाय : दुर्गा चालिसा पठण करा.

  वृषभ (Taurus) : महत्त्वाची प्रपोझल्स प्राप्त होतील. प्रत्येकाचं सहकार्य मिळेल. कृती आराखड्याबरहुकूम सुरळीतपणे जाल. कार्यक्षमता वाढेल. अडथळे दूर केले जातील. संधी घटतील; मात्र आकर्षक ऑफर्स मिळतील. संवाद फायद्याचे ठरतील. आत्मविश्वास वाढेल.

  उपाय : गणेश मंत्राचा 108 वेळा जप करा.

  मिथुन (Gemini) : काम अनुकूल ठरेल. प्लॅन्स पुढे घेऊन जाल. प्रोफेशनल प्रगतीचा मार्ग राखाल. प्रत्येकाकडून सपोर्ट मिळेल. सिस्टीम मजबूत कराल. कमर्शियल कामांना वेग द्याल. काम वेळेवर पूर्ण करण्याचा विचार करत राहाल.

  उपाय : भगवान शिवशंकरांना पाच ड्रायफ्रूट्सचा नैवेद्य दाखवा.

  कर्क (Cancer) : वर्क बिझनेससाठी गरजेच्या नसलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. ऑफिसमध्ये विरोधक सक्रिय असू शकतील. करिअर ट्रेडिंगमध्ये समर्पण भावना वाढवा. काम करताना दक्षता वाढवा. बजेटवर लक्ष केंद्रित करा. फ्रॉडला बळी पडणार नाही, याची काळजी घ्या.

  उपाय : मोहरीचं तेल लावलेला ब्रेड काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.

  सिंह (Leo) : निर्णय घेताना कम्फर्टेबल असाल. आर्थिक बाजू चांगली असेल. काम अपेक्षेपेक्षा उत्तम असेल. प्लॅननुसार पुढे जाल. करिअर बिझनेसमध्ये अपेक्षित रिझल्ट्स मिळतील. कामगिरी उत्तम असेल. करिअरमध्ये प्रगती होत राहील. संवेदनशीलपणे वागाल. व्यवहारांमध्ये सावध राहाल.

  उपाय : बजरंग बाण स्तोत्राचं पठण करा.

  घरातील कलह, वास्तुदोष दूर करण्यासाठी नक्की करा मोरपिसांचे हे उपाय

  कन्या (Virgo) : प्रोफेशनल काँटॅक्ट्स वाढतील. करिअर बिझनेसमध्ये वाढ होईल. वरिष्ठ व्यक्तींसोबत मीटिंग होईल. विपुल संपत्ती असेल. सहन करण्याची क्षमता राखू शकाल. कमर्शियल बाबींमधला रस वाढेल. संधीचा लाभ घ्याल. कौटुंबिक कामं पुढे न्याल. वर्क बिझनेसमध्ये वाढ होईल.

  उपाय : वडाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा.

  तूळ (Libra) : नफावाढ चांगली राहील. अपेक्षित नफा मिळणं शक्य आहे. प्लॅननुसार पुढे जाल. कामाच्या ठिकाणी वेळ द्याल. कामाशी संबंधित नातेसंबंध सुधारतील. प्रत्येकाला जोडून ठेवाल. बिझनेसमध्ये पुढाकार घ्याल. प्रवासाची शक्यता आहे. प्रयत्नांत यशस्वी व्हाल. कमर्शियल कामांना गती मिळेल.

  उपाय : हनुमान चालिसा सात वेळा पठण करा.

  वृश्चिक (Scorpio) : अडेलतट्टूपणा, उर्मटपणा सोडून द्या. भावनांना आवर घाला. गुंतवणूक खर्च करताना बजेटकडे लक्ष द्या. प्लॅनिंग करून काम करा. बिझनेसमध्ये पावित्र्य असेल. पर्यावरणाशी जुळवून घ्याल. वैयक्तिक विषयांत वेग राखाल. पर्सनल अचीव्हमेंट्सवर भर असेल. कामाच्या ठिकाणी उत्तम असाल. व्यवस्थापनात उत्तम असाल.

  उपाय : पिंजऱ्यातल्या पक्ष्यांना मुक्त करा.

  धनू (Sagittarius) : आर्थिक विषयांवर फोकस राहील. करिअर बिझनेसमध्ये संधी वाढतील. आत्मविश्वास कायम राहील. आदेशानुसार आणि समजुतीने पुढे जाल. व्यवस्थापनात सुधारणा होईल. निश्चितपणे पुढे जाल. स्मार्ट वर्किंग अंगीकाराल. कमर्शियल प्रकरणं अनुकूल होतील.

  उपाय : भैरव मंदिरात मिठाई अर्पण करा.

  मकर (Capricorn) : सर्वसाधारण नफ्यासाठी संधी असतील. आर्थिक व्यवहारांमध्ये स्पष्टता राखा. आर्थिक कृतींमध्ये सक्रियता दाखवा. बजेटवर नियंत्रण ठेवा. करिअर बिझनेस वाढेल. अनुभवी व्यक्तींचा सल्ला ऐकाल. गुंतवणुकीत घोटाळा होऊ शकतो. दक्ष राहा. बिझनेसमध्ये सतर्कता आणा. कम्फर्टेबल राहा.

  उपाय : श्री हनुमानासाठी तुपाचा दिवा लावा.

  कुंभ (Aquarius) : आज आर्थिक व्यवहार प्रभावी ठरतील. नव्या काँट्रॅक्ट्सच्या माध्यमातून आर्थिक प्रगती शक्य आहे. मौल्यवान वस्तूंची खरेदी करू शकाल. खर्चांकडे लक्ष द्या. यशाचा मार्ग खुला होईल. सामायिक कृतींवर भर द्याल. जमीन, इमारत यांबद्दलच्या बाबी चांगल्या घडतील.

  उपाय : रामरक्षा स्तोत्राचं पठण करा.

  सौंदर्यासाठी महिलांना का महत्त्वाचे आहेत 16 श्रृंगार, जाणून घ्या धार्मिक कारणे

  मीन (Pisces) : ऑफिसमध्ये काम करताना संयम राखा आणि दक्ष राहा. इतरांच्या कामात विनाकारण ढवळाढवळ करणं टाळा. दुर्लक्ष टाळाल. व्यवहारांमध्ये काळजी घ्याल. जवळच्या व्यक्तींचा सल्ला ऐका. संशोधनाच्या विषयांशी जोडले जा. काम सर्वसाधारण राहील.

  उपाय : 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा 108 वेळा जप करा.

  First published:
  top videos

   Tags: Astrology and horoscope, Life18, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion