मुंबई, 24 जानेवारी: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (24 जानेवारी 2023) राशिभविष्य
मेष (Aries) : ट्रेडिंग बिझनेसमध्ये उद्दिष्टपूर्ती होणं हे खूप कष्टाचं वाटेल. अर्थात, तुम्हाला या कष्टांचे उत्तम परिणामही मिळतील. पार्टनरशिपशी संबंधित बिझनेसमध्ये नफ्याची स्थिती तयार होत आहे. नोकरदार व्यक्तींना ओव्हरटाइम करावा लागण्याची शक्यता आहे.
उपाय : श्री गणेशाची आराधना करा.
वृषभ (Taurus) : पैशांशी निगडित काम खूप विचारपूर्वक करा. अगदी थोडासा निष्काळजीपणाही नुकसान करू शकतो. मशिनरीशी संबंधित कामांमध्ये एखादं काँट्रॅक्ट किंवा ऑर्डर मिळू शकते. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या नोकरीशी संबंधित एखादी चांगली बातमी मिळू शकते.
उपाय : श्री गणेशाची पूजा करा.
स्वप्नात या रंगाचे फूल दिसणे आहेत शुभसंकेत ! घरात येईल पैसा, सुख समृद्धी
मिथुन (Gemini) : आज बिझनेसमध्ये अतिरिक्त काम असेल. त्यामुळे काम इतरांसोबत वाटून घेतल्यास तुमचा भार बऱ्याच प्रमाणात हलका होईल. सोशलायझेशन फायद्याचं ठरेल. नोकरीतल्या कोणत्याही चुकीमुळे तुम्हाला अधिकाऱ्यांची बोलणी खावी लागण्याची शक्यता आहे.
उपाय : श्री गणेशाची आराधना करा.
कर्क (Cancer) : आता बिझनेसमध्ये काही नवी प्रपोझल्स मिळतील. कष्टांचे योग्य रिझल्ट्सही मिळतील. पार्टनरशिप बिझनेसमधल्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. सरकारी नोकरीत असलेल्यांना चांगली बातमी मिळण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे.
उपाय : गरजू व्यक्तींना मदत करा.
सिंह (Leo) : बिझनेस अॅक्टिव्हिटीजमध्ये खूप मोठी सुधारणा होण्याची शक्यता नाही. वैयक्तिक संपर्कांमधून तुमच्यासाठी काही फायद्याची परिस्थिती तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शक्य असेल तितक्या माणसांशी संपर्क ठेवा. प्रॉपर्टीशी संबंधित महत्त्वाचं डील होण्याची शक्यता आहे.
उपाय : भगवान विष्णूची आराधना करा.
कन्या (Virgo) : बिझनेस साइटवरच्या कार्यपद्धतीत काही बदल घडवून आणण्याची गरज आहे. जनसंपर्कातून तुमच्यासाठी बिझनेसचे नवे स्रोत तयार होऊ शकतात. त्यामुळे शक्य असेल तितकं लोकांच्या संपर्कात राहा. नोकरदार व्यक्तींच्या प्रमोशनची शक्यता आहे.
उपाय : शिवलिंगावर जलाभिषेक करा.
तूळ (Libra) : कोणतंही नवं काम सुरू करण्यासाठी आता योग्य वेळ नाही. त्यामुळे केवळ सध्याच्या परिस्थितीवरच लक्ष केंद्रित करणं श्रेयस्कर. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं योग्य ठरेल. ऑफिसमध्ये बॉस आणि ऑफिसर्सशी असलेले नातेसंबंध चांगले असतील.
उपाय : सूर्यदेवाला अर्घ्य द्या.
वृश्चिक (Scorpio) : या वेळी अन्य व्यक्तीचा सल्ला तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतो. त्यामुळे सर्व कामांमध्ये तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतःहून घेणं उत्तम. या वेळी मार्केटिंगचं काम पुढे ढकला. नोकरदार व्यक्तींना विशेषाधिकार मिळाल्यामुळे ते आनंदी असतील.
उपाय : योगासनं, प्राणायाम करा.
धनू (Sagittarius) : प्रोफेशनल फिल्डमध्ये तुम्ही कष्ट आणि क्षमतेच्या जोरावर उद्दिष्टपूर्ती कराल; पण या वेळी काही बदल करण्याची गरज आहे. व्हिडिओ आणि मार्केटिंगशी संबंधित कृतींवर लक्ष केंद्रित करा. नोकरदार व्यक्तींनी त्यांचं कामखूप काळजीपूर्वक करावं. काही चुका घडू शकतात.
उपाय : पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा.
मकर (Capricorn) : बिझनेसमध्ये काही आव्हानं असतील. या वेळी तुमची कार्यक्षमता सिद्ध करण्यासाठी खूप संघर्ष आणि कष्ट करावे लागतील. एखादा मोठा अधिकारी किंवा राजकीय नेत्याची भेट फायद्याची ठरेल. नोकरीत अतिरिक्त कामामुळे ताण असेल.
कुंभ (Aquarius) : कामाच्या ठिकाणी अंतर्गत यंत्रणेमध्ये काही बदल करण्याची गरज आहे. ते केल्यामुळे तुमच्या समस्यांवर निश्चितपणे काही उाय सापडेल.
उपाय : गरजू व्यक्तींना मदत करा.
मीन (Pisces) : बिझनेसमध्ये घेतलेले काही ठोस आणि गंभीर निर्णय फायद्याचे ठरतील; मात्र स्वतःला सिद्ध करण्यासाठी खूप संघर्ष आणि कष्टांची आवश्यकता आहे. नोकरदार व्यक्ती त्यांचं काम सर्वोत्तम पद्धतीने पूर्ण करू शकतील.
उपाय : श्री गणेशाची आराधना करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion