मराठी बातम्या /बातम्या /religion /Money Mantra - नफ्याचे विविध मार्ग खुले होतील

Money Mantra - नफ्याचे विविध मार्ग खुले होतील

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (23 मे 2023) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (23 मे 2023) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (23 मे 2023) राशिभविष्य

  मुंबई , 23 मे: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (23 मे 2023) राशिभविष्य

  मेष (Aries) : आर्थिक व्यवहारांत स्पष्टता राखा. ‘स्मार्ट डिले’ हे धोरण स्वीकारा. अतिउत्साह टाळाल. धोरणात्मक नियमांचं पालन कराल. योजनांच्या अंमलबजावणीत वाढ होईल. व्यवस्थापन चांगलं राहील. ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न वाढतील. काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्याल. लोभ आणि मोहाला बळी पडू नका.

  उपाय : लहान मुलींना गोड खाऊ घाला.

  वृषभ (Taurus) : व्यावसायिकांचा नफा आणि प्रभाव वाढेल. लोकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी व्हाल. नोकरदार व्यक्ती अल्पबचत करण्यात यशस्वी होतील. दीर्घकालीन बाबींमध्ये सक्रियता आणाल. मोठा विचार कराल. चांगले परिणाम मिळतील. स्वयंप्रेरित राहाल.

  उपाय : गुरूंचा आदर करा.

  मिथुन (Gemini) : कामाच्या ठिकाणी यशाची टक्केवारी चांगली राहील. आर्थिक व्यावसायिक बाबी साध्य होतील. करिअर, व्यवसायात सकारात्मकता येईल. प्रत्येकाला सोबत घेऊन जाल. कामाच्या ठिकाणी प्रभावी कामगिरी कायम राहील. आर्थिक बचतीच्या संधी मिळतील. धोका पत्कराल.

  उपाय : पर्समध्ये चांदीचं नाणं ठेवा.

  कर्क (Cancer) : ऑफिसमधल्या महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये सक्रियता आणाल. औद्योगिक उत्पादनं उत्तम असतील. व्यावसायिकांना अनपेक्षित नफा मिळेल. बेरोजगारांना चांगल्या ऑफर्स मिळतील. सहकाऱ्यांच्या सहकार्याने प्रोत्साहन मिळेल. नफा वाढवण्यावर भर दिला जाईल.

  उपाय : श्रीयंत्राची पूजा करून ते स्वतःजवळ ठेवा.

  सिंह (Leo) : व्यवसायाच्या कामात स्वार्थ टाळा. ऑफिसमध्ये कामाच्या नियोजनाला वेग येईल. नोकरीत अनुभवाचा लाभ मिळेल. व्यवसायात सुलभता राखा. कामात अनुकूलता असेल. वैयक्तिक विषयांवर लक्ष केंद्रित करा. उद्योजक मोठा विचार कायम राखतील.

  उपाय : कामाच्या ठिकाणी श्री गणेशाची पूजा करा.

  कन्या (Virgo) : आर्थिक क्षेत्रात आधुनिक विचारसरणी घेऊन पुढे जा. उद्दिष्ट जलद गतीने पूर्ण कराल. करिअरच्या संधी वाढतील. नफ्याची टक्केवारी चांगली राहील. नोकरीत नवीन संधी असतील. वर्क बिझनेसमध्ये चांगलं काम कराल. स्पर्धेची भावना वाढेल. दिनचर्या उत्तम राहील.

  उपाय : वाहत्या पाण्यात नारळ अर्पण करा.

  तूळ (Libra) : काम नॉर्मल राहील. वेळेच्या व्यवस्थापनावर भर द्याल. गुंतवणुकीच्या नावाखाली भलती आश्वासनं देणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहा. आर्थिक बाबींवर नियंत्रण वाढेल. व्यवसायात जागरूकता वाढेल. कामाच्या बाबतीत संयम दाखवाल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल.

  उपाय : अनाथाश्रमाला अन्नदान करावं.

  वैवाहिक जीवनात निराश आहात, या वास्तु टिप्सनीही दूर होतील समस्या

  वृश्चिक (Scorpio) : व्यावसायिकांसाठी क्रेडिट, आदर आणि वर्क बिझनेस चांगला राहील. ऑफिसच्या कामात चांगली कामगिरी कराल. व्यावसायिकांसाठी व्यवसायात सुधारणा होईल. व्यवसायातल्या भागीदारीच्या कामात पुढे राहाल. टायमिंग प्रभावी आहे. गंभीर विषयात रस घ्याल. शाश्वततेवर भर दिला जाईल. नफा उत्तम राहील.

  उपाय : मोहरीचं तेल लावलेली चपाती/भाकरी/ब्रेड काळ्या कुत्र्याला खाऊ घालावा.

  धनू (Sagittarius) : ऑफिसमध्ये महत्त्वाच्या कामात घाई करू नका. गुंतवणुकीबाबत सल्लागारांचा सल्ला घ्या. व्यावसायिकांना कामाच्या ठिकाणी चांगले रिझल्ट्स मिळतील. वैयक्तिक खर्चाकडे लक्ष द्याल. शिस्तीने काम कराल. बचतीवर भर द्या.

  उपाय : श्रीकृष्णाला साखरेचा नैवेद्य दाखवा.

  मकर (Capricorn) : ऑफिसमध्ये उत्तम प्रयत्न पुढे घेऊन जाल. वर्क बिझनेसमध्ये संपर्क चांगला राहील. नोकरीत धैर्य आणि पराक्रम वाढेल. कामाच्या क्षेत्रात सकारात्मक वेळेचा जास्तीत जास्त लाभ घ्याल. बिझनेससाठीचे प्रयत्न सुरू राहतील. नफ्याचे विविध मार्ग खुले होतील.

  उपाय : ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊनच घराबाहेर पडा.

  कुंभ (Aquarius) : करिअर व्यवसायाशी संबंधित इंटरव्ह्यूमध्ये यशस्वी व्हाल. ऑफिसमध्ये प्रभाव वाढेल. नवीन उद्दिष्टं गाठण्यासाठी उत्साही राहाल. नवीन व्यवस्था मजबूत करा. कामाच्या ठिकाणी नफा मिळेल. सेवा क्षेत्रात चांगलं काम कराल. हुशारीने गुंतवणूक करा.

  उपाय : शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करा.

  प्रेमात सहसा अयशस्वी होतात या राशी, रिलेशनशिपवरून कायम असतात संभ्रमात

  मीन (Pisces) : उत्पन्नाचे एकापेक्षा अधिक स्रोत खुले होतील. ऑफिसमध्ये मिळणाऱ्या नवीन संधींचा फायदा घ्याल. वरिष्ठ अधिकारी खूश राहतील. व्यावसायिक अधिक चांगली कामगिरी करू शकतील. विजयाची जाणीव असेल. सकारात्मकता कायम राहील. संपत्ती आणि मालमत्तेत वाढ होईल.

  उपाय : श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा.

  First published:
  top videos

   Tags: Astrology and horoscope, Life18, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion