मुंबई, 21 मार्च: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (21 मार्च 2022) राशिभविष्य
मेष (Aries): कोणतंही महत्त्वाचं काम सुरू करण्यापूर्वी आपल्या प्रियजनांचा सल्ला घ्या. कधीही कोणावर जास्त विश्वास ठेवू नका. असं केल्यानं नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक संवादात पारदर्शकता राखणं दीर्घकाळासाठी योग्य ठरेल. तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
उपाय: दुर्गादेवीला क्रिमसन रंगाची ओढणी अर्पण करा.
वृषभ (Taurus): मोठ्या प्रयत्नांमुळे औद्योगिक व्यवसाय सुधारेल. कुटुंबातील सदस्य आणि वरिष्ठांना भेटा. कुटुंबासोबत मिळून काम करा. नवीन जमिनीवरील बांधकामामुळे आर्थिक फायदा होऊ शकतो. उत्पन्नाच्या स्रोतांची संख्या वाढेल.
उपाय: लहान मुलींना खीर खायला द्या.
मिथुन (Gemini): परस्पर संबंध सुधारतील. कामाच्या ठिकाणी नेतृत्वाच्या अधिक संधी मिळतील. आर्थिक प्रगतीची शक्यता वाढेल. दैनंदिन जीवनात शिस्त आणि नियमांचं पालन करा. कुटुंबीयांचं सहकार्य मिळेल. पैसे मिळवण्यासाठी आवश्यक काम करत राहा.
उपाय: केळीच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावा.
कर्क (Cancer): तुम्ही तुमच्या कामाच्या विस्तारामध्ये अंतर्दृष्टी आणि शहाणपणानं निर्णय घेतल्यास निःसंशयपणे यशस्वी व्हाल. खर्च नियंत्रणात ठेवा नाहीतर तुम्हाला कर्ज घ्यावं लागेल. मुलांकडे शेअर करण्यासाठी अनेक आश्चर्यकारक बातम्या असतील. तुम्ही उत्साही असाल. उच्च ध्येय ठेवा.
उपाय: सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्या.
सिंह (Leo): सर्वांशी सुसंवाद वाढवणं करिअर आणि व्यवसायात फायदेशीर ठरेल. संभाषण अधिक चांगलं ठेवल्यास पैसे मिळविण्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील. भावनांवर नियंत्रण ठेवावं लागेल. भावंडांशी जवळीक वाढेल.
उपाय: देवी लक्ष्मीला कमळाचं फूल वाहा.
कन्या (Virgo): आज तुमचं भौतिक गोष्टींकडे लक्ष असेल. जास्त लोभ तुम्हाला कर्जबाजारी बनवू शकतो हे लक्षात ठेवा. कोणतंही काम पूर्ण श्रद्धा आणि विश्वासानं करा. कौटुंबिक बाबींमध्ये प्रतिष्ठा आणि गोपनीयता राखाल.
उपाय: काळ्या श्वानाला तेलात बनवलेली इमरती खाऊ घाला.
तूळ (Libra): तुमचा आत्मविश्वास आज सर्वोच्च पातळीवर असेल. कुटुंबाचं सहकार्य कायम राहील. सर्व ठिकाणांहून आज सकारात्मक बातम्या मिळतील. वैभवात आयुष्यभर वाढ होईल. मालमत्तेतील सुधारणेसाठी पैसे खर्च होतील. प्रत्येकाच्या समानतेची जाणीव ठेवा.
उपाय: दिव्यांग व्यक्तीची सेवा करा.
वृश्चिक (Scorpio): नवीन दृष्टिकोनातून गोष्टींचं निरीक्षण करणं सोपं होईल. जीवनशैली सुधारेल पण, त्यासाठी काही पैसे खर्च होऊ शकतात. नोकरीच्या उत्कृष्ट ऑफर मिळतील. आज आर्थिक घडामोडी वाढतील. प्रियजनांना विशेष प्रसंगांबद्दल कल्पना द्याल.
उपाय: काळ्या श्वानाला खाऊ द्या.
धनू (Sagittarius): आजचा दिवस चांगला आहे. एखाद्या आदरणीय व्यक्तीच्या मार्गदर्शनानं तुमचा मार्ग सुकर होईल. पैसे कमावण्याचे नवीन मार्ग दिसतील. कोणाच्याही मोहात पडू नका. नाहीतर नुकसान होऊ शकतं.
उपाय: माशांना खाद्य टाका.
मकर (Capricorn): पॉलिसी रूल्सचं पालन करा. नातेवाईकांचा आदर करा. मूल्यांना प्रोत्साहन द्याल. पारंपरिक कामात सहभागी व्हाल. जवळच्या लोकांचा सल्ला घ्या. लहानमोठ्या प्रलोभनांपासून दूर राहा, नाहीतर एखाद्या आरोपात अडकू शकता. कुटुंबात वातावरण आनंददायी राहील.
उपाय: पालकांचा आशीर्वाद घ्या.
कुंभ (Aquarius): दिवस अनुकूल राहील. रखडलेली महत्त्वाची कामं आज सहज पूर्ण होतील. परस्पर विश्वासाच्या मदतीने कौटुंबिक नात्यात बळ येईल. उत्पन्न चांगलं राहील, आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. झटपट यश मिळविण्यासाठी चुकीच्या कामांकडे लक्ष देऊ नका.
उपाय: गायीला हिरवा चारा द्या.
मीन (Pisces): घरात प्रेम आणि समजूतदारपणा दिसून येईल. तुम्ही ज्या प्रोजेक्टवर आणि संशोधनावर काम करत आहात त्यात तुम्हाला यश मिळेल आणि नशीब तुम्हाला साथ देईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना पैसे मिळतील. आज तुम्ही तुमची जबाबदारी वेळेवर पूर्ण करू शकाल.
उपाय: देवी लक्ष्मीची पूजा करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion