मराठी बातम्या /बातम्या /religion /Money Mantra : आर्थिक घडामोडींसाठी कसा असेल तुमचा 15 जानेवारीचा दिवस

Money Mantra : आर्थिक घडामोडींसाठी कसा असेल तुमचा 15 जानेवारीचा दिवस

आर्थिक राशिभविष्य

आर्थिक राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (15 जानेवारी 2023) राशिभविष्य पाहुया.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मेष (Aries) : तुमच्या बिझनेसच्या कार्यपद्धतीत आणलेल्या बदलांचे योग्य परिणाम मिळतील. नवं काम सुरू करण्यासाठी प्लॅन्स केले जातील. बिझनेसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा योग्य काळ आहे. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी चांगले नातेसंबंध राखा.

  उपाय : भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.

  वृषभ (Taurus) : बिझनेसशी संबंधित कामांची आउटलाइन निश्चित करा. आज तुमचा कोणताही हेतू साध्य होईल. काही गोंधळ निर्माण होऊ शकतात. कोणाकडून दिशाभूल होऊ देऊ नका. आर्थिक परिस्थिती नॉर्मल राहील. ऑफिशियल कामं/उपक्रम सुसंघटित असतील.

  उपाय : शिवलिंगावर जलाभिषेक करा.

  मिथुन (Gemini) : बिझनेसमधलं थांबलेलं काम पूर्ण होईल. तुमच्या कष्टांच्या अनुषंगाने तुम्हाला रिझल्ट्स मिळणार नाहीत. तरीही आर्थिक परिस्थिती नॉर्मल असेल. कर्ज किंवा कराशी संबंधित काम पुढे ढकलण्याऐवजी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

  उपाय : सूर्यदेवा अर्घ्य द्या.

  कर्क (Cancer) : सध्याचा काळ आव्हानांनी भरलेला आहे. बिझनेसमध्ये रिस्क घेऊ नका. नवं कामही सुरू करू नका. दिवसाच्या सुरुवातीला थोडी धावपळ करावी लागेल; मात्र दुपारी परिस्थिती नॉर्मल होईल.

  उपाय : गरजू व्यक्तींना मदत करा.

  सिंह (Leo) : बिझनेसशी संबंधित कामांमध्ये दक्ष राहिल्याने तुमचं संकटांपासून रक्षण होईल. विरोधक तुमच्यापैकी एखाद्या व्यक्तीला फोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा. कार्यपद्धती गुप्त राखणं चांगलं राहील.

  उपाय : श्री गणेशाची पूजा करा.

  कन्या (Virgo) : बिझनेसमधलं उत्पन्न उत्तम असेल. प्रतिकूल परिस्थितीतही तुम्हाला कुठून तरी मदत नक्की मिळेल. बाजारपेठेत तुमची उत्तम प्रतिमा राहील. पार्टनरशिपशी निगडित काही प्लॅन असल्यास त्याबद्दल पुन्हा एकदा नक्की विचार करा.

  उपाय : पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा.

  तूळ (Libra) : बिझनेसमध्ये अधिक कष्ट करण्याची आणि अधिक वेळ देण्याची गरज आहे. नवं काम सुरू केलं असेल, तर केवळ कष्ट केल्यानंतरच तुम्हाला त्यात यश मिळेल. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. नोकरीत प्रमोशन होणं शक्य आहे; मात्र त्याच वेळी तुमच्यावरचा कामाचा ताणही वाढणार आहे.

  उपाय : मुंग्यांना पीठ खाऊ घाला.

  वृश्चिक (Scorpio) : बिझनेसमध्ये काही चढ-उतार होतील; मात्र तुमची चांगली समज आणि योग्य वागणूक यांच्या साह्याने तुम्ही समस्या सोडवू शकाल. सध्या कुठेही गुंतवणूक करू नये. मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तींना एखादी चांगली बातमी मिळू शकेल.

  उपाय : पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा.

  धनू (Sagittarius) : बिझनेसमध्ये थांबलेलं काम पुन्हा सुरू होऊ शकेल. त्यामुळे तुमच्या कामांची पूर्ण गांभीर्याने अंमलबजावणी करा. सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तींचा गोंधळ उडू शकतो. बिझनेस किंवा ऑफिशियल टूरशी संबंधित कार्यक्रम असू शकेल.

  उपाय : श्री गणेशाला लाडू अर्पण करा.

  मकर (Capricorn) : काळानुसार बिझनेसच्या कार्यपद्धतीत बदल घडवून आणा. मीडिया, कम्प्युटर, ऑनलाइन अशा अ‍ॅक्टिव्हिटीजबद्दल अधिक माहिती घ्या. त्यातून चांगले रिझल्ट्स मिळतील. मल्टिनॅशनल कंपनीत काम करत असलेल्यांना काही परदेशी अचीव्हमेंट साध्य होईल.

  उपाय : श्री हनुमानाची पूजा करा.

  कुंभ (Aquarius) : बिझनेसमध्ये अ‍ॅक्टिव्हिटी असेल. त्यामुळे अ‍ॅक्टिव्हिटीजचं चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन/संघटन केलं जाईल. महत्त्वाची कागदपत्रं आणि फाइल्स सहज हाताला मिळतील अशी ठेवा. ऑफिसमधल्या एखाद्या चुकीमुळे तुम्हाला अपमानित व्हावं लागेल. त्यामुळे सावधगिरी बाळगा.

  हे वाचा - या राशीच्या करिअरच्या मार्गात लवकरच वृद्धी होण्याचे संकेत आहेत !

  उपाय : भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.

  मीन (Pisces) : बिझनेसच्या विस्तारीकरणाचे प्लॅन्स आखले जातील. प्रभावी व्यक्तीकडूव योग्य सल्लाही मिळेल. त्यासोबतच तुमची क्षमता आणि टॅलेंट यांचं कौतुक होईल. ऑफिसमध्ये नव्या प्रकल्पावर काम सुरू होईल आणि सहकाऱ्यांमध्ये योग्य समन्वय असेल.

  उपाय : गोमातेला हिरवा चारा खाऊ घाला.

  First published:
  top videos

   Tags: Money, Money matters