मराठी बातम्या /बातम्या /religion /आज या राशीला नफ्याच्या संधी मिळतील !

आज या राशीला नफ्याच्या संधी मिळतील !

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (12 जानेवारी 2023) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (12 जानेवारी 2023) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (12 जानेवारी 2023) राशिभविष्य

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 12 जानेवारी: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (12 जानेवारी 2023) राशिभविष्य

    मेष (Aries) : कामाचा प्रभाव वाढेल. प्रशासकीय कामांना वेग येईल. उद्योग आणि व्यवसायांमध्ये यश मिळेल. नफ्याच्या टक्केवारीत सुधारणा होईल. चांगल्या ऑफर्स मिळतील. कामावरचा फोकस वाढवाल. सकारात्मकता राहील. अनुभवाचा फायदा घ्याल.

    उपाय : भगवान शिवशंकरांना जल अर्पण करा.

    वृषभ (Taurus) :

    नशिबाच्या शक्तीसह तुमचं सारं काम होईल. ऑफिसमध्ये उल्लेखनीय रिझल्ट्स मिळतील. करिअर बिझनेसमध्ये प्रगती होईल. लाभदायक योजना पुढे नेल्या जातील. प्रत्येकाचा सपोर्ट मिळेल. बेरोजगार व्यक्तीला नव्या संधी मिळतील आणि त्यावर काही भांडवलनिर्मिती करू शकाल.

    उपाय : भैरव मंदिरात नारळ अर्पण करा.

    मिथुन (Gemini) : करिअर बिझनेसमध्ये निष्काळजी राहू नका. आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रित करा. तरच नफा मिळणं शक्य आहे. अन्यथा तोटा होईल. ऑफिसमध्ये काउंटरपार्ट्सचं सहकार्य मिळेल. संशोधनकार्यामध्ये रस वाढेल. प्रतिष्ठेची जाणीव ठेवा. कुटुंबाच्या जवळ राहाल.

    उपाय : सूर्याला अर्घ्य द्या.

    कर्क (Cancer) : सर्वसाधारण जीवनातल्या महत्त्वाच्या बाबींमध्ये यश मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये आनंद असेल. औद्योगिक बाबींमध्ये नफा मिळेल. उद्योगातली उद्दिष्टं साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जातील. उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने समर्पित राहा.

    उपाय : गायींची सेवा करा.

    सिंह (Leo) : करिअर बिझनेस सर्वसाधारण राहील. नोकरदार व्यक्तींची चांगली कामगिरी चांगली राहील. सक्रिय विचारांनी काम कराल. सक्रिय राहाल. प्रोफेशनॅलिझम आणि कष्टांमुळे योग्य ते स्थान मिळेल. मोहाला बळी पडू नका. विनाकारण ढवळाढवळ/हस्तक्षेप करू नका.

    उपाय : पिवळ्या रंगाचे खाद्यपदार्थ दान करा.

    कन्या (Virgo) : बौद्धिक प्रयत्न अधिक चांगले असू शकतात. धोरणात्मक नियम पाळाल. आर्थिक बाबी तुम्हाला अनुकूल होतील. जवळच्या व्यक्तींची भेट होईल. करमणुकीसाठी मित्रांसोबत सहलीला जाल. नफ्याच्या संधी मिळतील. महत्त्वाच्या विषयांमध्ये रस दाखवाल. टीचिंगमध्ये अभ्यास प्रभावी असेल.

    उपाय : श्रीकृष्णाच्या मंदिरात बासरी अर्पण करा.

    तूळ (Libra) : रक्ताच्या नात्यांचे बंध दृढ होतील. कुटुंबात पवित्र आणि सुलभ वातावरण असेल. प्रथा-परंपरा पाळल्या जातील. वाहन किंवा इमारतीसंदर्भातल्या समस्या सोडवल्या जातील. अतिउत्साह आणि एक्साइटमेंट टाळा. घाई-गडबडीत निर्णय घेऊ नका. सलोखा राखाल. वैयक्तिक वर्तनावर लक्ष केंद्रित करा.

    उपाय : हनुमान चालिसा पठण करा.

    वृश्चिक (Scorpio) : सामाजिक उपक्रमांमध्ये रस घ्याल. व्यावसायिक विषयांवर भर राहील. सहकार्य वाढेल. संकीर्ण विषय हाताळले जातील. ज्येष्ठांचा आदर राखाल. चांगली बातमी मिळेल. प्रोफेशनल कस्टमायझेशन सुरू राहील.

    उपाय : भगवान शिवशंकरांवर पंचामृताचा अभिषेक करा.

    धनू (Sagittarius) : पवित्र कामात सहभागी होण्याच्या संधी आहेत. ऑफिसमध्ये संपर्क आणि संवाद वाढवण्यात रस घ्याल. रक्ताचे नातेसंबंध दृढ राहतील. चांगली बातमी मिळेल. आर्थिक बाबींना वेग येईल. भव्यता, सजावट आदी बाबी जपल्या जातील. वेग राखाल.

    उपाय : ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊनच घरातून बाहेर पडा.

    मकर (Capricorn) : नवी सुरुवात होऊ शकेल. अनेक क्रिएटिव्ह उपक्रम यशस्वी होतील. विजयाची शक्यता खूप जास्त राहील. सकारात्मकता ओसंडून वाहील. संवेदनशीलता कायम राखा. वैयक्तिक गोष्टी अधिक चांगल्या होतील. संकोच दूर होईल. कामामुळे बिझनेसमध्ये सुधारणा होईल.

    उपाय : 'ॐ नमः शिवाय' मंत्राचा 108 वेळा जप करा.

    कुंभ (Aquarius) : कामाचा वेग संथ असू शकेल. नातेसंबंध उत्तम राखाल. प्रत्येकाशी जोडण्याचा प्रयत्न कराल. त्याग आणि सहकार्याची भावना वाढीला लागेल. प्रत्येकाचा आदर कराल. व्यवस्थापनात कम्फर्टेबल असाल. बजेटनुसार पुढे मार्गक्रमण कराल. परदेशाशी संबंधित कामांना गती मिळेल. धोरणानुसार वागाल.

    उपाय : श्री रामरक्षा स्तोत्राचं पठण करा.

    मीन (Pisces) : यशाचं प्रमाण वाढत राहील. करिअर बिझनेसवर लक्ष केंद्रित कराल. प्रत्येकाला सोबत घेऊन चालाल. स्पर्धेची जाणीव ठेवाल. अष्टपैलू उत्तम कामगिरी कराल. करिअर बिझनेसमध्ये गती राखाल. तातडीचं काम त्वरेने करण्याचा प्रयत्न कराल.

    उपाय : श्री हनुमानाला तुपाचा दिवा लावा.

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Rashichark