मराठी बातम्या /बातम्या /religion /आज या राशीने ऑफिसमध्ये काम करताना संयम पाळा !

आज या राशीने ऑफिसमध्ये काम करताना संयम पाळा !

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (9 जानेवारी 2023) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (9 जानेवारी 2023) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (9 जानेवारी 2023) राशिभविष्य

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 9 जानेवारी: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (9 जानेवारी 2023) राशिभविष्य

  मेष (Aries) : ऑफिसमध्ये काम करताना संयम पाळा, आणि सतर्क राहा. इतरांच्या कामात विनाकारण ढवळाढवळ करणं टाळा. निष्काळजीपणा दाखवू नका. व्यवहारात सावध राहाल. जवळच्या व्यक्तींचा सल्ला पाळा. संशोधनासंबंधी विषयांशी कनेक्ट व्हा. नोकरी, व्यवसायातील कामातील प्रगती सामान्य राहील.

  उपाय : ‘ॐ नमः शिवाय’ या मंत्राचा 108 वेळा जप करा.

  वृषभ (Taurus) : आज तुमच्या आर्थिक बाबी प्रभावीपणे पूर्ण होतील. नवीन करारांमुळे आर्थिक प्रगती शक्य आहे. मौल्यवान खरेदी करू शकाल. खर्चाकडे लक्ष द्या. यशाचा मार्ग खुला होईल. सामायिक कृतींवर भर दिला जाईल. जमीन, इमारतीसंबंधी कामं चांगल्याप्रकारे होतील.

  उपाय : भगवान श्रीरामाच्या मंदिरात बसून रामरक्षा स्तोत्राचा पाठ करा.

  मिथुन (Gemini) : लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा. आर्थिक अ‍ॅक्टिव्हिटींमध्ये सक्रियता दर्शवा. बजेटवर नियंत्रण ठेवा. करिअर, व्यवसायात वाढ होईल. अनुभवी व्यक्तींचा सल्ला ऐका. गुंतवणुकीत फसवणूक होऊ शकते, सतर्क राहा. व्यवसायात दक्षता बाळगा. आरामात राहाल.

  उपाय : भगवान श्री हनुमान मंदिरात तुपाचा दिवा लावून हनुमान चालिसेचा पाठ करा.

  कर्क (Cancer) : आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रित कराल. करिअर, व्यवसायात संधी वाढतील. आत्मविश्वास कायम राहील. सुव्यवस्था आणि समजूतदारपणाने पुढे जाल. व्यवस्थापन सुधारेल. स्मार्ट कामाचा अवलंब कराल. व्यावसायिक बाबी अनुकूल होतील.

  उपाय : श्री भैरवनाथ मंदिरात मिठाई अर्पण करा.

  सिंह (Leo) : हट्टीपणा, अहंकार टाळा. गुंतवणूक, खर्च करताना बजेटकडे लक्ष द्या. नियोजन करून काम करा. व्यवसायात शुभसंकेत मिळतील. वातावरणाशी जुळवून घ्याल. वैयक्तिक विषयांना गती मिळेल. वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित कराल. काम उत्तम होईल. व्यवस्थापन उत्तम राहील.

  उपाय : बंदिवान पक्ष्यांना मुक्त करा.

  कन्या (Virgo) : लाभाचा विस्तार उत्तम राहील. इच्छित लाभ संभवतो. योजनेनुसार पुढे जाल. कामाच्या ठिकाणी वेळ द्याल. नोकरीतील संबंध सुधारतील. सर्वांना जोडून ठेवाल. व्यवसायात पुढाकार घ्याल. प्रवासाची शक्यता आहे. प्रयत्नांना यश मिळेल. विश्वास वाढेल. व्यावसायिक कामांना गती मिळेल.

  उपाय : रामायणातील श्री सुंदरकांड किंवा हनुमान चालिसेचा सात वेळा पाठ करा.

  तूळ (Libra) : व्यावसायिक संपर्क वाढेल. करिअर, व्यवसायात वाढ होईल. वरिष्ठांशी भेटी होतील. संपत्तीत वाढ होईल. सहिष्णुता राखण्यास सक्षम असाल. व्यावसायिक बाबींमध्ये रस वाढेल. संधीचा फायदा घ्याल. कौटुंबिक कामं पुढे जातील. नोकरी, व्यवसायात वाढ होईल.

  उपाय : वटवृक्षाखाली तुपाचा दिवा लावावा.

  वृश्चिक (Scorpio) : निर्णय घेण्यास सोयीस्कर वेळ आहे. आर्थिक बाजू चांगली राहील. काम अपेक्षेपेक्षा चांगले होईल. योजनेनुसार पुढे जा. करिअर, व्यवसायात अपेक्षित परिणाम मिळतील. चांगली कामगिरी होईल. करिअरमध्ये चढ-उतार राहील. समंजसपणे वागा. व्यवहार करताना सावध राहा.

  उपाय : श्री हनुमान चालिसाचा पाठ करा.

  धनू (Sagittarius) : नोकरी, व्यवसायात अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करा. अफवांमध्ये पडू नका. विरोधक ऑफीसमध्ये सक्रियता दाखवू शकतात. करिअर, ट्रेडिंगमध्ये समर्पण वाढवा. अ‍ॅक्टिव्हिटींमध्ये सतर्कता ठेवा. बजेटवर लक्ष केंद्रित करा. फसवणुकीचे बळी होऊ नका.

  उपाय : मोहरीचे तेल लावून केलेली भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला.

  मकर (Capricorn) : नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी कामासाठी अनुकूलता राहील. नियोजित योजना पुढे जातील. व्यावसायिक प्रगतीचा मार्ग सांभाळा. सर्वांचे सहकार्य मिळेल. व्यवस्था मजबूत कराल. व्यावसायिक कामांना गती मिळेल. काम वेळेत पूर्ण करण्याचा विचार करत राहाल.

  उपाय : भगवान श्रीकृष्णाला साखरेचा नैवेद्य दाखवा.

  कुंभ (Aquarius) : महत्त्वाचे प्रस्ताव प्राप्त होतील. सर्वांचं सहकार्य मिळेल. अ‍ॅक्शन प्लॅन सुरळीतपणे पार पडतील. नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी कामाची कार्यक्षमता वाढेल. अडथळे दूर होतील. विरोधक कमी होतील. आकर्षक ऑफर्स मिळतील. चर्चा फायदेशीर ठरेल. आत्मविश्वास वाढेल.

  उपाय : भगवान श्री गणेशाला दुर्वा अर्पण करून गणेश मंत्राचा 108 वेळा जप करा.

  मीन (Pisces) : कामातील अडथळे आपोआप दूर होतील. धैर्य वाढेल. सक्रियपणे काम कराल. सर्व क्षेत्रात प्रभाव राहिल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. पद, प्रतिष्ठा आणि संधी वाढतील. कामातील गती वाढेल. घाई करू नका. एखादी ट्रिप घडण्याची शक्यता आहे.

  उपाय : देवी दुर्गा मंदिरात दुर्गा चालिसेचं पठण करा.

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Rashichark, Religion