मुंबई, 7 जानेवारी: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (7 जानेवारी 2023) राशिभविष्य
मेष (Aries) : आजचा दिवस व्यवसायासाठी उत्तम असेल. बिझनेस करिअरमधल्या प्रयत्नांना अनुरूपता असेल. पेपरवर्क उत्तम कराल. क्षमतेपेक्षा मोठी रिस्क घ्याल; मात्र तोटा होण्याची शक्यता फार कमी आहे. महत्त्वाच्या गोष्टी अनुकूल होतील. आधीची काँट्रॅक्ट्स पुढेही सुरू राहतील. काम करण्यासाठी परिस्थिती अनुकूल राहील.
उपाय : श्री हनुमानाला नारळ अर्पण करा.
वृषभ (Taurus) : कामामध्ये अनिश्चितता राहू शकेल. इंडस्ट्रीजच्या व्यवसायात सातत्य राहील. आर्थिक बाजू सुलभ असेल. जबाबदार व्यक्तींना भेटाल. नव्या व्यक्तींना भेटताना सावध. करिअर ट्रेडिंगमधलं सातत्य वाढवा. कामाची स्मार्ट पद्धत स्वीकारा.
उपाय : उगवत्या सूर्याला अर्घ्य द्या.
मिथुन (Gemini) : बिझनेसमधल्या कमर्शियल कामांमध्ये वेगाने कृती कराल. क्षमतेपेक्षा मोठं काम करण्यासाठी प्रयत्न केले जातील; मात्र सावध राहा. काउंटरपार्ट्सचं सहकार्य मिळेल. तुम्हाला आदर आणि श्रेय मिळेल. आर्थिक विकासासाठीच्या संधी हातच्या जाऊ देऊ नका.
उपाय : श्री गणेशाला दूर्वा अर्पण करा.
कर्क (Cancer) : आर्थिक व्यवहारांमध्ये घाई-गडबड टाळा. ऑफिसमध्ये विरोधकांच्या कृत्यांमुळे अडचणीत याल. खर्चांवर नियंत्रण ठेवा. महत्त्वाच्या कामांमध्ये सातत्य ठेवा. शिस्तीने वाटचाल करा. काम सक्रियपणे होईल. सिस्टीमवर भर दिला जाईल.
उपाय : तेल लावलेली चपाती कुत्र्याला खाऊ घाला.
सिंह (Leo) : ऑफिसमध्ये प्रोफेशनल सहकाऱ्यांवर विश्वास कायम राहील. जबाबदाऱ्या आणि तुमचे वरिष्ठ यांच्याशी सलोखा राहील. तुम्ही लोभाला बळी पडणार नाही. संयम आणि धार्मिकतेने पुढे जाल. समान सहकार्य कराल. सेवा क्षेत्रात कामावर लक्ष केंद्रित कराल. सकारात्मक परिस्थितीचा फायदा घ्या.
उपाय : शिवचालिसा स्तोत्राचं पठण करा.
कन्या (Virgo) : आर्थिक प्रकरणं नेहमीपेक्षा चांगली असतील. बिझनेसच्या दृष्टीने चांगलं काम कराल. महत्त्वाचे प्लॅन्स शेअर करताना भावविवशतेने करू नका. वर्किंग सिस्टीम मजबूत कराल. पारंपरिक बिझनेस सुरू करण्याचा विचार कराल. धैर्य कायम राहील.
उपाय : श्री सरस्वती देवीची पूजा करा.
तूळ (Libra) : कामाच्या ठिकाणी तुम्ही अगदी सहजतेने पुढे वाटचाल कराल. बिझनेस उत्तम असेल. व्यावसायिक प्रयत्न अनुकूल ठरतील. प्रवास घडण्याची शक्यता खूप जास्त आहे. चांगली बातमी मिळेल. सुविधांमध्ये वाढ होईल. सर्जनशील विषयांना वेळ द्याल. व्यावसायिक उपक्रमांमध्ये सक्रिय राहाल.
उपाय : पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा.
वृश्चिक (Scorpio) : बिझनेसमध्ये प्रगती होईल. आर्थिक प्रगतीमुळे आनंदी, उत्साही व्हाल. स्पर्धेची जाणीव असू द्या. प्रोफेशनल्स अधिक यशस्वी होतील. बिझनेससाठी काम कराल. पूर्वजांच्या कृती तुम्हीही सुरू ठेवाल. तुमच्या टॅलेंटचं दर्शन परफॉर्मन्समधून घडवाल आणि ते अधिक मजबूत होईल. आर्थिक बचत होईल.
उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळ दान करा.
धनू (Sagittarius) : बिझनेसमध्ये प्रगती कराल. धोरणात्मक नियम पाळाल. आधुनिक प्रयत्न वेग घेतील. सगळीकडे नफा असेल. आर्थिक बाबतींमध्ये संयम दाखवाल. घाई-गडबडीत निर्णय घेणं टाळा. प्रयत्नांना वेग येईल. करिअर चांगलं राहील.
उपाय : गरीब व्यक्तीला अन्नदान करा.
मकर (Capricorn) : धोरणात्मक नियमांबद्दल जागरूकता बाळगाल. व्यावसायिक उद्देश जपाल. वर्क बिझनेसमध्ये विश्वास राहील. सिस्टीमवर भर द्याल. प्रोफेशनल्ससाठी वातावरण नॉर्मल असेल. स्पर्धा टाळाल. रूटीनची काळजी घ्याल. ऑफर्स येतील. व्यवहारामध्ये उधार घेणं टाळा. लेखनात काही चुका होऊ देऊ नका. काँट्रॅक्ट्समध्ये स्पष्टता असू द्या.
उपाय : भगवान शिवशंकराला जल अर्पण करा.
कुंभ (Aquarius) : बिझनेसमध्ये करिअर चांगलं होईल. प्रलंबित प्रकरणांमध्ये काही ना काही सक्रियता येईल. सकारात्मकता राहील. प्रत्येकाचं सहकार्य मिळेल. इंडस्ट्रीज आणि ट्रेडमध्ये सुधारणा होईल. उद्दिष्टाच्या दिशेने समर्पित वृत्तीने काम करा. निकोप स्पर्धा ठेवा.
उपाय : श्रीरामाची आरती करा.
मीन (Pisces) : आज कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रभावशाली व्यक्ती असाल. वर्क बिझनेसमध्ये संयम राखाल. रिलेशनशिपचा फायदा करून घ्या. नफ्याच्या संधी वाढतील. परिस्थिती सकारात्मक राहील. प्रोफेशनल संतुलन साधाल. प्लॅन्स पुढे घेऊन जाल. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्याल.
उपाय : हनुमान चालिसा स्तोत्राचं पठण करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion