मुंबई,27 डिसेंबर: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (27 डिसेंबर 2022) राशिभविष्य
मेष (Aries) : बिझनेसच्या अनुषंगाने काही महत्त्वाची पावलं उचलाल. ती अचूक ठरतील. अंतर्गत यंत्रणेमध्ये केलेले बदल सकारात्मक ठरतील. ऑफिसच्या कामांमध्ये काही राजकारण घडेल. तुम्ही काळजी घ्यायला हवी.
उपाय : गायीला हिरवा चारा किंवा पालक खाऊ घाला.
वृषभ (Taurus) : बिझनेसमध्ये काम शांततापूर्ण मार्गाने पूर्ण होईल. तुमचे बिझनेस प्लॅन्स लीक झाले, तर कोणी तरी त्याचा गैरफायदा घेऊ शकेल. जवळच्या व्यक्तीने केलेल्या ढवळाढवळीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद निर्माण होतील.
उपाय : सुंदरकांडाचं पठण करा.
मिथुन (Gemini) : अनेक अडचणी येऊनही बिझनेसमधलं बहुतांश काम वेळेवर पूर्ण होईल. कुठे तरी अडकण्यापासून दिलासा मिळेल किंवा अडकलेले पैसे मिळाल्यामुळे दिलासा मिळेल. नोकरदार व्यक्तींना ऑफिशियल ट्रिपची ऑर्डर मिळेल.
उपाय : हनुमानाची आरती करा.
कर्क (Cancer) : ग्रहस्थिती बिझनेसच्या अनुषंगाने अनुकूल नाही. त्यामुळे कोणतंही नवं काम सुरू करू नका. प्रॉपर्टीशी संबंधित कोणतंही डील करायचं असेल, तर अतिरिक्त नफा मिळण्याची अपेक्षा करणं योग्य नाही. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या उच्चपदस्थांकडून सहकार्य मिळेल.
उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळ दान करा.
सिंह (Leo) : बिझनेसमध्ये काही आव्हानं आणि समस्या असतील; मात्र लवकरच या समस्या समजुतीमुळे सुटतील. इम्पोर्ट-एक्स्पोर्टच्या बिझनेसमध्ये फायद्याची काँट्रॅक्ट्स मिळतील. नोकरदार व्यक्तींचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे.
उपाय : हनुमान चालिसा पठण करा.
कन्या (Virgo) : बिझनेसमध्ये पेपरवर्क करताना चूक किंवा घोटाळा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. जवळच्या व्यक्तींपेक्षा तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून मदत मिळाल्याने आश्चर्य वाटेल.
उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळ दान करा.
तूळ (Libra) : फिल्डवर तुमची उपस्थिती राखा. कारण अतिरिक्त कामाचा ताण असेल. तुमच्या हार्ड वर्कचे परिणामही चांगले मिळतील. दिवसाच्या उत्तरार्धात बिझनेसशी संबंधित काही समस्याही उद्भवू शकतील; मात्र तुमच्या समजून घेण्याच्या क्षमतेमुळे तुम्ही ती समस्या सोडवू शकाल.
उपाय : गरीब व्यक्तीला अन्नदान करा.
वृश्चिक (Scorpio) : आज कोणताही बिझनेस प्लॅन यशस्वी होण्याची अपेक्षा आहे; मात्र अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन घ्या. कारण एका चुकीच्या निर्णयामुळे तुमचा नफा तोट्यात रूपांतरित होऊ शकतो. शेअर्स, लॉटरीसारख्या ठिकाणी तुमचे पैसे गुंतवू नका.
उपाय : गायीला ब्रेड खाऊ घाला.
धनू (Sagittarius) : काळ अनुकूल आहे. त्यामुळे कामाच्या प्रति समर्पित राहा आणि लक्ष केंद्रित ठेवा. तुमची बौद्धिक क्षमता आणि पद्धत यांमुळे तुम्हाला निश्चित यश मिळेल. नवं काम सुरू करण्यासाठी वेळ उत्तम आहे. नोकरदार व्यक्तींसाठी ऑफिसचं वातावरण पर्फेक्ट असेल.
उपाय : हनुमान चालिसा पठण करा.
मकर (Capricorn) : बिझनेसच्या कामांमध्ये कष्टाची कामं अधिक असतील. तुमच्या महत्त्वाच्या प्लॅन्सकडे लक्ष देणं आणि त्यावर काम करणं यांमुळे तुम्ही तुमच्या उद्दिष्टाच्या जवळ जाल. ऑफिसमधल्या सहकाऱ्याच्या मदतीने तुम्ही उद्दिष्टपूर्ती करू शकाल.
उपाय : रामरक्षा स्तोत्राचं पठण करा.
कुंभ (Aquarius) : बिझनेसची कामं मध्यम असतील. तरुणांनी करिअरशी संबंधित प्लॅन्सच्या दृष्टीने कृती करण्याची वेळ आली आहे. तुमच्या कष्टांमुळे तुमच्या बिझनेसची कामं मजबूत होतील. नोकरदार व्यक्तींची प्रगती त्यांच्या पद्धतीवर अवलंबून आहे.
उपाय : भगवान शिवशंकरांना जल अर्पण करा.
मीन (Pisces) : बिझनेसचं काम पद्धतशीर चालेल. कामाप्रति असलेल्या तुमच्या पॅशनमुळे महत्त्वाच्या गोष्टी अचीव्ह कराल. इन्शुरन्स आणि कमिशनशी संबंधित बिझनेस करणाऱ्या व्यक्ती अधिक यशस्वी होतील. आर्थिक परिस्थिती सुधारेल.
उपाय : गरीब व्यक्तीला अन्नदान करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.