मराठी बातम्या /बातम्या /religion /या राशीच्या सातत्याने वाढणाऱ्या गरजा त्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणू शकतात

या राशीच्या सातत्याने वाढणाऱ्या गरजा त्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणू शकतात

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून आजच्या दिवसाचं (1 फेब्रुवारी 2023) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून आजच्या दिवसाचं (1 फेब्रुवारी 2023) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून आजच्या दिवसाचं (1 फेब्रुवारी 2023) राशिभविष्य

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 1 फेब्रुवारी: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (1 फेब्रुवारी 2023) राशिभविष्य

    मेष (Aries) : कामाच्या ठिकाणी ऑफिसर्सशी संवाद वाढेल. बदल सहजपणे स्वीकारा. संपत्ती आणि नफा मिळेल. बिझनेसमध्ये प्रगती होईल.

    उपाय : श्री गणेशाची उपासना करा.

    वृषभ (Taurus) : कोणत्याही कारणाशिवाय आज ऑफिसमध्ये तुम्हाला चिंता सतावेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुमच्या गरजांवर नियंत्रण ठेवा. अन्यथा खर्च खूप वाढतील. एकाच वेळी दोन प्रोजेक्ट्सवर काम करू नका.

    उपाय : हनुमान मंदिरात जाऊन बजरंग बाण स्तोत्र म्हणा.

    मिथुन (Gemini) : बिझनेसमध्ये अडचणी येऊ शकतात. सूड घेण्याच्या भावनेने ऑफिसमध्ये कोणतंही काम करू नका. प्रिय व्यक्तींशी वाद वाढण्याची शक्यता आहे. दिसण्यावर खर्च केल्यास कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे.

    उपाय : सूर्याची उपासना करा.

    कर्क (Cancer) : दीर्घ काळ रखडलेले प्रकल्प मानसिक ताण देतील. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. भावनेच्या भरात कोणालाही वचन देऊ नका. त्याचा भविष्यात पश्चात्ताप होण्याची शक्यता आहे.

    उपाय : गणपतीला शेंदूर अर्पण करा.

    सिंह (Leo) : आर्थिक समस्या टाळू इच्छित असलात, तर आज कोणतंही डील करू नका. अन्यथा तोट्याची शक्यता आहे. सातत्याने येत असलेल्या अडचणींमुळे तुमचा उत्साह कमी असेल. बिझनेसमन्सना दिवस सर्वसाधारण असेल.

    उपाय : गोशाळेला दान करा.

    कन्या (Virgo) : ऑफिसमध्ये जबाबदारी वाढेल. नव्या व्यक्तींवर विश्वास ठेवण्याआधी बारकाईने तपासणी करा. अन्यथा तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला आहे; मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

    उपाय : बुध ग्रहाशी निगडित वस्तू दान करा.

    तूळ (Libra) : सातत्याने वाढणाऱ्या गरजा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणू शकतात. तुम्हाला कर्जही घ्यावं लागू शकतं. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. बिझनेसमन्सना लाभ मिळेल. तुमचे शब्द योग्य पद्धतीने मांडा.

    उपाय : मुंग्यांना पीठ खाऊ घाला.

    वृश्चिक (Scorpio) : कौटुंबिक समस्या वाढू शकतील. त्यामुळे ऑफिसच्या कामावर विपरीत परिणाम होऊ शकेल. त्यामुळे घर आणि ऑफिस या दोन्ही बाबी वेगवेगळ्या ठेवणं गरजेचं आहे. वेळेवर निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. नोकरीत नवी शक्यता निर्माण होत आहे.

    उपाय : प्राण्यांची सेवा करा.

    धनू (Sagittarius) : आज आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. चांगल्या गुंतवणूक संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यावर अतिरिक्त पैसे खर्च होतील. ट्रेडर्सनी अत्यंत सावधगिरीने निर्णय घ्यावेत.

    उपाय : सरस्वती मातेची उपासना करा.

    मकर (Capricorn) : आर्थिक समस्या कायम राहतील. आर्थिक परिस्थितीबद्दल चिंता कायम राहील. आवश्यक नसलेल्या खर्चांसाठी तुम्हाला कर्ज घ्यावं लागण्याची शक्यता आहे. जमिनीत गुंतवणूक केल्यास नफा मिळेल.

    उपाय : शिवलिंगावर अभिषेक करा.

    कुंभ (Aquarius) :

    आज तुम्हाला ऑफिसच्या कामाबद्दल विनाकारण चिंता वाटेल. आज तुमचं चित्तही थोडं विचलित असेल. कौटुंबिक जीवनात उलथापालथ घडेल. बिझनेसमन्ससाठी आजचा दिवस निराशाजनक असेल.

    उपाय : भैरव मंदिरात ध्वज अर्पण करा.

    मीन (Pisces) : रखडलेल्या कामांबद्दल चिंता वाटेल. आज आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यातून गुंतवणुकीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. नोकरदार व्यक्तींना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

    उपाय : श्रीसूक्ताचं पठण करा.

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion