मराठी बातम्या /बातम्या /religion /आज या राशीने बिझनेसच्या बाबतीत अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे

आज या राशीने बिझनेसच्या बाबतीत अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (18 जानेवारी 2023) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (18 जानेवारी 2023) राशिभविष्य

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (18 जानेवारी 2023) राशिभविष्य

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 18 जानेवारी: आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (18 जानेवारी 2023) राशिभविष्य

    मेष (Aries) : कामासाठी केलेला एखादा जवळपासचा प्रवास तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठीचं दार उघडेल. या वेळी काही नव्या अचीव्हमेंट्स साध्य होण्याचीही शक्यता आहे; मात्र नफ्याचा मार्ग संथ राहील. नोकरदार व्यक्तींनी त्यांच्या कामात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा दाखवू नये.

    उपाय : मुंग्यांना पीठ खाऊ घाला.

    वृषभ (Taurus) : आजचा दिवस व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत पर्फेक्ट आहे. काही वेळा काही समस्या उद्भवतील; मात्र तुम्ही बुद्धिमत्तेने समस्यांवरचं उत्तर शोधून काढाल. नोकरदार व्यक्तींनी त्यांच्या ऑफिसच्या कामावर अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे. कारण भविष्यात त्यांच्या प्रगतीच्या शक्यता खूप आहेत.

    उपाय : पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा.

    मिथुन (Gemini) : सध्या जनसंपर्क बिझनेस वाढवण्याच्या दृष्टीने खूपच फायद्याचा ठरेल. मीडिया आणि फोनच्या माध्यमातून महत्त्वाची काँट्रॅक्ट्स मिळू शकतात. नोकरीत प्रमोशनचीही शक्यता आहे. त्यामुळे कामाप्रति समर्पण भावना असू दे.

    उपाय : श्री गणेशाची आराधना करा.

    कर्क (Cancer) : बिझनेसमध्ये जागेत बदल होण्याची शक्यता आहे. टॅक्स, कर्ज आदी प्रकरणांत गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळे आज या संदर्भातली कामं करू नका. ऑफिसमध्ये बॉस आणि अधिकाऱ्यांशी नातेसंबंध चांगले राहतील.

    उपाय : सूर्यदेवाला अर्घ्य द्या.

    सिंह (Leo) : सध्या तुमच्या बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटीजकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. कारण काही प्रकारचा तोटा होण्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांच्या अ‍ॅक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवा. ऑफिसमध्ये तुमची प्रतिमा आणि रेप्युटेशन यांमध्ये वाढ होईल. तुम्हाला काही महत्त्वाचे अधिकार/जबाबदारीही मिळेल.

    उपाय : सूर्यदेवाला अर्घ्य द्या.

    कन्या (Virgo) : बिझनेसमध्ये खूप जबाबदाऱ्या आणि कामाचा ताण असेल. या वेळी कुटुंब आणि घराकडच्या गुंतागुंतीकडे लक्ष न देता केवळ तुमच्या बिझनेसवरच लक्ष केंद्रित करावं. नोकरदार व्यक्तींना त्यांच्या इच्छेनुसार बदली मिळेल. त्यामुळे तुमच्या उद्दिष्टाप्रति दक्ष आणि जागरूक राहा, प्रयत्न करत राहा.

    उपाय : श्री गणेशाला लाडूंचा नैवेद्य दाखवा.

    तूळ (Libra) : बिझनेसच्या कार्यपद्धतीत सध्या तरी कोणताही बदल होण्याची शक्यता दिसत नाही. पार्टनरशिपमध्ये असलेल्या बिझनेसमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रोजेक्टवर तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त पैसे खर्च करू नका. बजेटची काळजी घ्या. नोकरीत बॉस आणि सहकाऱ्यांसोबतच्या संबंधांमध्ये सुधारणा होईल.

    उपाय : भगवान विष्णूची आराधना करा.

    वृश्चिक (Scorpio) : कामाच्या ठिकाणी समविचारी व्यक्तींसोबत सोशलायझिंग केल्यास फायदेशीर ठरेल. पार्टनरशिपशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होईल. नोकरदार व्यक्तींना आज त्यांची उद्दिष्टं गाठताना काही अडचणींचा सामना करावा लागेल.

    उपाय : पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान करा.

    धनू (Sagittarius) : कामाच्या ठिकाणी आज बरेच बिझी असाल. जोखमीच्या कामांमध्ये वेळ आणि पैसा वाया घालवू नका. तोट्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींनी त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करून अजिबातच चालणार नाही.

    उपाय : मुंग्यांना पीठ खाऊ घाला.

    मकर (Capricorn) : जवळच्या व्यापाऱ्यांकडून सुरू असलेल्या स्पर्धेमुळे रूटीनमध्ये थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल; मात्र तुमचा विजय निश्चित आहे. त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल आणि अधिक कष्टांमुळे तुम्ही तुमच्या कामाकडे अधिक लक्ष देऊ शकाल. नफ्याचे स्रोतही वाढतील.

    उपाय : पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा.

    कुंभ (Aquarius) बिझनेस अ‍ॅक्टिव्हिटीज सुरळीतपणे सुरू राहतील. तुमच्या क्षमतेमुळे तुम्हाला काही खास काँट्रॅक्ट्स मिळतील. समस्या सोडवल्या जातील. काही ऑफिसर्सची मदत घ्या. ऑफिसमध्ये शांततामय वातावरण असेल.

    उपाय : शिवलिंगावर जलाभिषेक करा.

    मीन (Pisces) : बिझनेसच्या बाबतीत अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. झटपट यश मिळवण्याच्या नादात चुकीचा मार्ग निवडू नका. तुमचं काम होईल; मात्र प्रचंड कष्ट करावे लागतील. दिवसाच्या पूर्वार्धात महत्त्वाची कामं पूर्ण केल्यास योग्य ठरेल.

    उपाय : श्रीकृष्णाची आराधना करा.

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion