मराठी बातम्या /बातम्या /religion /वैयक्तिक आयुष्यात आज प्रेरित झाल्यासारखं वाटेल, कसा असेल 26 मेचा दिवस?

वैयक्तिक आयुष्यात आज प्रेरित झाल्यासारखं वाटेल, कसा असेल 26 मेचा दिवस?

राशीभविष्य

राशीभविष्य

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 26 मे 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  आजच्या दिवसाला काय सांगायचं आहे, त्याचं रहस्य उलगडा. जेव्हा ज्योतिष आणि गूढता यांचा संगम होतो, तेव्हा तुमच्या राशीच्या युनिक प्रवासाकडे टाकलेला उत्साहवर्धक कटाक्ष

  दिवसासाठीचा सारांश : पूर्वी कल्पना न केलेल्या आर्थिक संधी आणि घनिष्ठ रोमँटिक रिलेशनशिप्स यांच्या माध्यमातून मेष राशीच्या व्यक्ती वैयक्तिक प्रेरणेचा अनुभव घेऊ शकतात. आर्थिक निर्णय घेताना वृषभ राशीच्या व्यक्ती सावध पवित्रा घेतात. त्यांना सुरक्षितता आणि कम्फर्ट मिळावा अशी इच्छा असते. मिथुन राशीच्या व्यक्तींना मिसळणं आवडतं. करिअरमध्ये प्रगतीसाठी नेटवर्क तयार करणं, तसंच बौद्धिकदृष्ट्या इंटरेस्टिंग असलेल्या रोमँटिक रिलेशनशिप्स तयार करायलाही त्यांना आवडतं. रिलेशनशिप्स हेल्दी असाव्यात आणि आर्थिक परिस्थिती उत्तम असावी यावर कर्क राशीच्या व्यक्तींचा भर असतो. सिंह राशीच्या व्यक्तींना धगधगणारं प्रेम, आर्थिक यश आणि क्रिएटिव्ह एक्स्प्रेशन या बाबी आवडतात. कन्या राशीच्या व्यक्ती नियोजन, संवेदनशील आर्थिक निर्णय आणि हेल्दी रोमँटिक नाती यांवर भर देतात. तूळ राशीच्या व्यक्तींना सलोखा, संयुक्त बिझनेस कोलॅबोरेशन्स आणि संतुलित प्रेम या बाबी आवडतात. प्रचंड पॅशन, आर्थिक परिवर्तन आणि मजबूत भावनिक बंध ही वृश्चिक राशीच्या व्यक्तींची वैशिष्ट्यं आहेत. धनू राशीच्या व्यक्तींना प्रेमात स्वातंत्र्य अभिप्रेत असतं, प्रवासातून आर्थिक प्रगती साध्य करतात आणि त्यांना धाडसही आवडतं. मकर राशीच्या व्यक्तींचं स्वतःवर नियंत्रण असतं, आर्थिक सुरक्षितता आणि मजबूत पाया घालण्यावर त्यांचा भर असतो. कुंभ राशीच्या व्यक्ती ओरिजिनल कल्पनांच्या शोधात असतात, अपारंपरिक बिझनेसच्या शक्यता आजमावतात आणि अपारंपरिक रोमँटिक रिलेशनशिप्सचाही शोध घेतात. मीन राशीच्या व्यक्तींचा भर अंतःप्रेरणा, इन्व्हेन्टिव्ह फायनान्सेस आणि केअरिंग रोमँटिक रिलेशनशिप्स यांवर असतो.

  मेष (Aries) 

  तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात प्रेरित झाल्यासारखं, प्रोत्साहन मिळाल्यासारखं वाटेल. आर्थिकदृष्ट्या वृद्धीच्या अनपेक्षित संधी येऊ शकतात. लव्ह लाइफ पॅशनेट असू शकेल. बंध कायम टिकण्यावर भर असेल. विद्यार्थ्यांचं अभ्यासातून लक्ष काहीसं विचलित होईल. बिझनेसमन म्हणून तुम्ही बऱ्याच कालखंडानंतर कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ शकाल. प्रवासाच्या बेतांतून नवे दृष्टिकोन मिळू शकतील आणि नवे मित्र बनवण्याची शक्यता असेल. ग्रुप वेलनेस प्रॅक्टिसेसमध्ये सहभागी होणं उपयुक्त ठरू शकेल. आरोग्यदृष्ट्या संतुलित आहार राखणं माइंडफुल अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये रमणं यांमुळे ऊर्जेची पातळी वाढेल.

  LUCKY Sign - Water Chestnut

  LUCKY Color - Silver

  LUCKY Number - 20

  वृषभ (Taurus) 

  तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्ही स्थिरता आणि कम्फर्टच्या शोधात असाल. तुमच्या आर्थिक बाबींचं बजेटिंग काळजीपूर्वक करण्याची, तसंच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. लव्ह लाइफमध्ये सलोखा असेल आणि ते ग्राउंडेड असेल. विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल शिकण्याच्या दृष्टिकोनातून लाभ होईल. बिझनेसमन म्हणून तुम्ही सातत्यपूर्ण प्रगती कराल. सहलीत रिलॅक्स व्हाल, निसर्गाचा देखावा पाहाल. निसर्गाशी जोडलं जाणं, ग्राउंडिंग एक्सरसाइजेस करणं उपयोगी ठरू शकेल. रूटीन सांभाळणं आणि पुरेशी विश्रांती घेणं आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचं ठरेल.

  LUCKY Sign - Animal Print

  LUCKY Color - Pista Green

  LUCKY Number - 12

  मिथुन (Gemini) 

  तुम्हाला सोशलायझिंग आवडेल आणि इतरांशी जोडलं जायला आवडेल. आर्थिकदृष्ट्या नेटवर्किंग आणि कोलॅबोरेशन्ससाठी संधी असू शकतील. लव्ह लाइफ डायनॅमिक आणि बुद्धीला प्रोत्साहन देणारं असू शकेल. विद्यार्थी संवादावर आधारित विषयांत उत्तम कामगिरी करू शकतील. बिझनेसमन म्हणून तुम्ही चांगल्या वाटाघाटी करू शकाल. सहलीत मित्रांच्या भेटीगाठी होतील किंवा काही सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहाल. बौद्धिक गोष्टींत सहभागी होणं लाभदायक ठरेल. मानसिक आणि भावनित संतुलन साधणं महत्त्वाचं ठरेल.

  LUCKY Sign - Glass Bowl

  LUCKY Color - Neon Orange

  LUCKY Number - 4

  कर्क (Cancer) 

  तुमच्या वैयक्तिक आयुष्यात तुम्ही पोषक वातावरणनिर्मितीवर भर द्याल. काळजीपूर्वक केलेलं नियोजन आणि जेन्युइन सजेशन्स या माध्यमातून स्थिरता आणि वृद्धी होईल. लव्ह लाइफ भावनिकदृष्ट्या समाधान देणारं आणि सरप्राइजेसनी भरलेलं असेल. विद्यार्थ्यांना शांत आणि नियोजनबद्ध अशा अभ्यासाच्या वातावरणामुळे फायदा होईल. बिझनेसमध्ये तुम्ही ग्राहकाच्या सर्वोच्च एंगेजमेंटला प्राधान्य द्याल. सहलीमध्ये कौटुंबिक स्नेहमेळावा किंवा जुन्या आठवणी जागवणाऱ्या स्थळांना भेटी आदींचा समावेश असेल. उच्च ऊर्जेच्या दिवसानंतर स्वतःची काळजी घेणं आणि स्वतःला वेळ देणं महत्त्वाचं आहे. आरोग्यदृष्ट्या भावनिक आरोग्य सांभाळणंदेखील महत्त्वाचं आहे.

  LUCKY Sign - Tourmaline Rock

  LUCKY Color - Grey

  LUCKY Number - 22

  सिंह (Leo)

  वैयक्तिक आयुष्यात क्रिएटिव्हिटी आणि पॅशन व्यक्त कराल. कामाच्या ठिकाणी दखल घेतली जाण्यासाठी काही संधी मिळतील, तसंच बक्षिसंही मिळतील. लव्ह लाइफ व्हायब्रंट असेल आणि काही रोमँटिक क्षण अनुभवाल. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार कला किंवा लीडरशिप या विषयांमध्ये चमकतील. बिझनेसमध्ये आत्मविश्वासाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प साध्य कराल. सहलीमध्ये सांस्कृतिक आणि कलाविषयक स्थळांचा समावेश असेल. क्रिएटिव्ह आउटलेट्समध्ये रमाल. स्वतः व्यक्त होणं समाधान देणारं असेल. आनंददायी कृतींमध्ये सहभागी होणं आणि मानसिकता सकारात्मक राखणं आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचं असेल.

  LUCKY Sign - A Rhodonite Crystal

  LUCKY Color - Pale Yellow

  LUCKY Number - 13

  कन्या (Virgo) 

  संघटन आणि स्वयंविकास यांवर तुम्ही लक्ष केंद्रित कराल. तुमच्याभोवतीच्या प्रॅक्टिकल इन्व्हेस्टमेंट्ससाठीच्या संधी तुम्हाला मिळू शकतात. लव्ह लाइफमध्ये थोडी स्थिरता अनुभवू शकाल आणि तुम्हाला ग्राउंडेड राहण्यास मदत होईल. विश्लेषणात्मक विषयांमध्ये विद्यार्थी सकारात्मक रिझल्ट्स मिळवू शकतील. कामाच्या ठिकाणी तुम्ही अधिक तपशील आणि कार्यक्षमतेवर लक्ष द्याल. सहलीमध्ये शैक्षणिक किंवा विकासात्मक अनुभवांचा समावेश असेल. योगासनांची नवी तंत्रं शिकणं, त्यांचा सराव करणं किंवा सेल्फ-रिफ्लेक्शनमध्ये गुंतणं या बाबी उपयुक्त ठरतील. संतुलित रूटीन आणि स्वतःची काळजी घेण्याचे फायदे अनुभवाल.

  LUCKY Sign - 2 Sparrows

  LUCKY Color - Peach

  LUCKY Number - 11

  तूळ (Libra) 

  वैयक्तिक आयुष्यात तुम्ही एकांताचे काही क्षण शोधाल. आर्थिक बाबींचा विचार केल्यास पार्टनरशिप्स आणि कोलॅबोरेशन्सच्या संधी असू शकतील. रिलेशनशिपकडे थोडं दुर्लक्ष झाल्यामुळे लव्ह लाइफ थोडंसं फ्रस्ट्रेटिंग असेल. विद्यार्थी अनुभवातून संवाद आणि टीमवर्कची जादू शिकतील. बिझनेसमन्स वाटाघाटी आणि ग्राहकांशी नातेसंबंधांत तरून जातील. सहलीमध्ये आर्ट गॅलरीजमध्ये जाल किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांना उपस्थित राहाल. संतुलनाचा शोध घेणं, रिलेशनशिप दृढ होण्यासाठीच्या कृती करणं उपयोगाचं ठरेल. काम आणि आराम यांमध्ये संतुलन साधणं आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचं ठरेल.

  LUCKY Sign - Fancy Tabletop

  LUCKY Color - Deep Red

  LUCKY Number - 23

  वृश्चिक (Scorpio) 

  वैयक्तिक आयुष्यात दृढ भावनिक बंधांचा अनुभव घ्याल. कामाच्या ठिकाणी परिवर्तन आणि काही तरी नवं दाखवण्याची संधी मिळेल. लव्ह लाइफमध्ये काही अडथळे येण्याची शक्यता आहे. तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. संशोधनाच्या किंवा तपासाच्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना संधी दिसेल. बिझनेसमन म्हणून तुम्ही स्ट्रॅटेजिक आणि कॅल्क्युलेटेड निर्णय घ्याल. सहलीमध्ये गूढ किंवा ट्रान्सफॉरमेटिव्ह स्थळांचा समावेश असेल. आध्यात्मिकदृष्ट्या आत्मपरीक्षण करणं फायद्याचं ठरेल. आरोग्याच्या बाबतीत ताण व्यवस्थापन तंत्रांचा अवलंब करणं आणि भावनिक आरोग्य राखणं महत्त्वाचं ठरेल.

  LUCKY Sign - A Ceramic Planter

  LUCKY Color - Mustard

  LUCKY Number - 22

  सूर्यदेवाची राहील कुंटुंबावर सदैव कृपा; रविवारी या उपायांनी मिळते सुख-शांती

  धनू (Sagittarius) 

  वैयक्तिक पातळीवर तुम्हाला धाडस आणि विस्तारीकरणाचा धांडोळा घेण्याची संधी मिळेल. प्रवास किंवा आंतरराष्ट्रीय ओळखींच्या माध्यमातून विकासासाठीच्या संधी मिळतील. लव्ह लाइफमध्ये स्वातंत्र्य आणि एक्स्प्लोरेशन यांचा समावेश असेल. तत्त्वज्ञान किंवा अध्यात्म यांच्याशी निगडित विषयांत विद्यार्थी रस घेऊ शकतील. एक्स्प्लोरेशन किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा समावेश असलेल्या व्हेंचर्समध्ये बिझनेसमन्स टिकतील. सहलीमध्ये धाडसी किंवा शैक्षणिक अनुभवांचा समावेश असेल. आध्यात्मिकदृष्ट्या तात्त्विक चर्चांमध्ये सहभागी होणं किंवा उच्च पातळीवरच्या ज्ञानाचा शोध घेणं फायद्याचं ठरू शकेल. घराबाहेरची कामं आणि मानसिकता सकारात्मक राखणं या गोष्टी आरोग्यदृष्ट्या फायद्याच्या ठरतील.

  LUCKY Sign - Salt Lamps

  LUCKY Color - Lavender

  LUCKY Number - 10

  मकर (Capricorn) 

  वैयक्तिक आयुष्यात शिस्त आणि अचीव्हमेंटवर लक्ष केंद्रित कराल. आर्थिकदृष्ट्या दीर्घकालीन गुंतवणुकीत स्थिरता आणि संधी दिसू शकेल. लव्ह लाइफमध्ये मजबूत पाया बांधण्यावर भर असेल. बिझनेस किंवा प्रॅक्टिकल स्किल्सशी निगडित विषयांत विद्यार्थी उत्तम कामगिरी करतील. बिझनेसमन म्हणून तुम्ही दीर्घकालीन उद्दिष्टांच्या दिशेने काम कराल आणि धोरणात्मक निर्णय घ्याल. सहलीमध्ये ऐतिहासिक किंवा प्रोफेशनलदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या स्थळांचा समावेश असेल. तुम्ही व्यवहार्य उद्दिष्टं निश्चित केली पाहिजेत. निश्चित आराखडा असलेल्या आध्यात्मिक कृतींमध्ये सहभागी होणं उपयोगी ठरू शकेल. हेल्दी वर्क-लाइफ बॅलन्स राखणं आणि स्वतःच्या काळजीला प्राधान्य देणं महत्त्वाचं वाटेल.

  LUCKY Sign - Glassware

  LUCKY Color - Indigo

  LUCKY Number - 52

  गजकेसरी योग जुळून आल्यानं या 3 राशींची चांदी! नवीन नोकरी, धनलाभ होईल

  कुंभ (Aquarius) 

  वैयक्तिक आयुष्यात इनोव्हेशन आणि व्यक्तिगतता शोधाल. तंत्रज्ञान किंवा अपारंपरिक माध्यमातून संधी मिळू शकतील. लव्ह लाइफमध्ये युनिक कनेक्शन्स आणि बौद्धिक प्रोत्साहन असू शकतं. विज्ञान किंवा तंत्रज्ञानाशी निगडित विषयांवर विद्यार्थी अधिक लक्ष केंद्रित करतील. बिझनेसमन म्हणून तुम्ही भविष्याचा विचार करणाऱ्या व्हेंचर्समध्ये तराल. सहलींमध्ये सामाजिक किंवा नेटवर्किंग कार्यक्रमांचा समावेश असू शकेल. वेगळ्या विचारांचा धांडोळा घेण्याचा विचार कराल किंवा मानवतेच्या दृष्टीने केलेल्या कामामुळे उपयोग होईल. इनोव्हेटिव्ह एक्सरसाइजेस करणं आणि मानसिक आरोग्य राखणं महत्त्वाचं ठरेल.

  LUCKY Sign - A Solitaire

  LUCKY Color - Golden

  LUCKY Number - 2

  आता उरले फक्त 5 दिवस! या राशींना येणार अच्छे दिन, चमकेल सोन्यासारखे भाग्य

  मीन (Pisces) 

  तुम्हाला अंतःप्रेरणा मिळेल, दुसऱ्याचा विचार कराल. क्रिएटिव्ह बाबी किंवा कलात्मक गोष्टींतून आर्थिक संधी मिळू शकतील. लव्ह लाइफमध्ये काही शंका असू शकतात. त्यांकडे लक्ष देऊन निराकरण करायला हवं. क्रिएटिव्ह किंवा आध्यात्मिक विषयांत विद्यार्थी आश्वासक कामगिरी करतील. बिझनेसमन म्हणून तुम्हाला अंतःप्रेरणेची तीव्र जाणीव होईल. क्लायंटशी नातेसंबंधांत कौशल्य प्राप्त कराल. सहलीतून आध्यात्मिक किंवा निसर्गसौंदर्याच्या स्थळाला भेट द्याल. कलात्मक किंवा हीलिंग प्रॅक्टिसेसमध्ये गुंतल्यासारखं वाटेल. माइंडफुलनेस आणि स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

  LUCKY Sign - A Heritage Site

  LUCKY Color - Violet

  LUCKY Number - 54

  First published:
  top videos

   Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichakra