मराठी बातम्या /बातम्या /religion /

'या' राशीच्या लोकांना मिळणार चांगल्या संधी? तुमच्यासाठी कसा असेल 6 ऑक्टोबरचा दिवस?

'या' राशीच्या लोकांना मिळणार चांगल्या संधी? तुमच्यासाठी कसा असेल 6 ऑक्टोबरचा दिवस?

प्रत्येक राशीचं 6 ऑक्टोबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 6 ऑक्टोबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

प्रत्येक राशीचं 6 ऑक्टोबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 6 ऑक्टोबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

रेंगाळलेली काम पूर्ण करण्यासाठी आणि मागील थकबाकी देण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. सौम्य संसर्ग किंवा डोकेदुखी टाळण्यासाठी काळजी घ्या. वादाच्या परिस्थितीत स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यात मदत होईल.

LUCKY SIGN - A Lush Garden

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

दिवसा मिळणारी ऊर्जा ही प्रभावी असते. नवीन काम सुरू करण्यासाठी या उर्जेची मदत होईल. जर एखाद्याने मोठी मदत मागितली तर तुम्ही नम्रपणे नकार देऊ शकता. आजच्या दिवशी चालण्याला प्राधान्य द्या.

LUCKY SIGN - A Grey Feather

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

तुम्ही मानसिकदृष्ट्या खंबीर असलात तरीही आज इतरांना तुमची भावनिक बाजू अनुभवायला मिळेल. समतोल साधण्यासाठी वाटाघाटी आवश्यक असतील. एखादा चांगला सहकारी आज तुमच्याकडे मदत मागू शकतो.

LUCKY SIGN - A Heap of Pebbles

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

पूर्वीपासून ओळख असलेल्या व्यक्तीची भेट किंवा पुन्हा संपर्क होण्याची शक्यता आहे. जर आज तुम्ही बाहेर जाण्याचं ठरवलं असेल तर त्यासाठी वातावरण अनुकूल नाही. तुम्ही एखाद्या गोष्टीला पाठिंबा देण्याचा विचार करत असाल तर आज त्यासाठी चांगली संधी आहे.

LUCKY SIGN - A Carbon Paper

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

आज अचानक पाहुणे येण्याची शक्यता आहे. आज दिवसभर गोड पदार्थ खायला मिळू शकतील. काही प्रलंबित देयकांना मंजूरी मिळू शकते. तुमचे सहाय्यक कर्मचारी तक्रारी मांडू शकतात. त्या प्राधान्याने सोडवा.

LUCKY SIGN - A String of Pearls

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

कामाच्या ठिकाणचं वातावरण आज अनुकूल असेल. प्रलंबित बोलणी मार्गी लावण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. घरी आणि ऑफिसमध्ये दोन्ही ठिकाणी कागदपत्रं योग्य ठिकाणी ठेवा. तुम्हाला पुरेशी झोप मिळत नाही, त्यामुळे आज रात्री चांगली झोप मिळेल याची दक्षता घ्या.

LUCKY SIGN - Lemon Fragrance

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

स्वत:ची काळजी घेणं म्हणजे तुम्ही कमकुवत आहात असं नाही. तुमचं म्हणणं प्रभावीपणे मांडा. नवीन रेसिपी करून बघण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आपल्या आरोग्याची जादा काळजी घ्या.

LUCKY SIGN - A Red Cord

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

वाईट स्वप्नं ही फक्त आपल्या मनातील सुप्त भीती असते, त्यांना गांभीर्याने घेऊ नका. कामाच्या ठिकाणावरील एखादी व्यक्ती तुमचं लक्ष वेधून घेऊ शकते. एखाद्या जुन्या मित्राला कॉल करून दिवस संस्मरणीय बनवा.

LUCKY SIGN - A Red Brick Wall

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

एखाद्या जवळच्या व्यक्तीला आज तुमची आठवण येऊ शकते. तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ काढा. संध्याकाळी बाहेर जाण्याचा योग आहे. आवश्यक वाटल्यास नियमित वैद्यकीय तपासणी करावी.

LUCKY SIGN - A Neon Highlighter

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

आज दिवसभर जुन्या आठवणी येण्याची शक्यता आहे. एखादा रिअॅलिटी चेक फायद्याचा ठरू शकतो. तुमच्या आईला तुमची गरज आहे, त्यामुळे तिच्याकडे लक्ष द्या. जुन्या योजनेसाठी नव्याने नियोजन करा.

LUCKY SIGN - A Glass Bottle

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

तुमची भीती आता नियंत्रणात आहे. परिस्थिती बदलल्याने तुम्हाला आता आणखी वाईट स्वप्नं पडणार नाहीत. अलीकडच्या काही महिन्यांत तुम्ही जे काही मिळवलं आहे त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात. तुमच्यावर जादा जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - An Old Banyan Tree

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

तुम्ही तुमच्या कुटुंबाचा मुख्य भावनिक आधार आहात. कामाच्या ठिकाणी एखाद्याच्या सहकार्याने नवीन काम सुरू होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक व्यवसायात असलेल्यांचा दिवस नेहमीपेक्षा जास्त व्यस्त असेल.

First published:

Tags: Astrology and horoscope