मराठी बातम्या /बातम्या /religion /या राशी करतील सेलिब्रेशन तर यांना करावे लागेल खुप काम, 6 जानेवारीचे राशिभविष्य

या राशी करतील सेलिब्रेशन तर यांना करावे लागेल खुप काम, 6 जानेवारीचे राशिभविष्य

आजचा दिवस स्वतःला बळ देण्याचा आणि नवीन प्रयोग करून पाहण्याचा दिवस आहे.

आजचा दिवस स्वतःला बळ देण्याचा आणि नवीन प्रयोग करून पाहण्याचा दिवस आहे.

आजचा दिवस स्वतःला बळ देण्याचा आणि नवीन प्रयोग करून पाहण्याचा दिवस आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई 06 डिसेंबर : सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 6 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

    मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

    आजचा दिवस स्वतःला बळ देण्याचा आणि नवीन प्रयोग करून पाहण्याचा दिवस आहे. तातडीने काही गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणंही महत्त्वाचं आहे.

    LUCKY SIGN – A Lamp

    वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

    आज तुम्हाला भूतकाळातला एखादा क्षण पुन्हा जगण्याची संधी मिळू शकेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही निकष पूर्ण करणं गरजेचं आहे. एखाद्या प्रलंबित प्रकरणाची सेटलमेंट झाल्यामुळे कुटुंबीयांना आश्चर्य वाटेल.

    LUCKY SIGN – A feather

    मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

    एखादी गोष्ट होण्यास उशीर होत असेल, तर त्याचा अर्थ असा नाही की ती गोष्ट होणारच नाही. तुम्ही संयम बाळगणं, प्रयत्न करणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी टीकेला सामोरं जावं लागेल. प्रवासाचे बेत पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.

    LUCKY SIGN – A helicopter

    कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

    तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला या गोष्टीची आठवण करून देतील, की किती कमी वेळ हातात आहे. त्यामुळे तुम्हाला कामाची गती वाढवण्याची गरज आहे. एखादी नवीन संधी कामाच्या ठिकाणी उत्साह निर्माण करेल. कामातून किंवा दैनंदिन गोष्टींमधून ब्रेक घेणं गरजेचं आहे.

    LUCKY SIGN – White Rose

    सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

    तुम्ही जी गोष्ट इतके दिवस धरून ठेवली होती, ती सोडून देण्याची वेळ आता आली आहे. तुमचा राग ताब्यात ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हालाच मनस्ताप होईल. एखादी मैत्रीपूर्ण कृती आज तुम्हाला अडचणीतून बाहेर काढू शकते.

    LUCKY SIGN – A Notepad

    कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

    तुम्ही जी गोष्ट मिळवली आहे, तिच्याबद्दल लवकरच सेलिब्रेशन होईल. तुमच्या बऱ्याच योजना आता अंमलात येत आहेत. थोडा वेळ काढून तुम्ही आधीच जे निर्णय घेतले आहेत, त्यांच्याबाबत पुनर्विचार करा.

    LUCKY SIGN – A hologram

    तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

    एखादी गोष्ट तुम्हाला विचलित करत असेल, तर तुम्ही ते होऊ देत आहात हेच कारण आहे. तुमच्या भावंडाकडे असलेली एखादी संकल्पना कमाईचा नवा स्रोत निर्माण करू शकते. एखाद्या ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल, तर तो प्लॅन फसू शकतो.

    LUCKY SIGN – Sunshine

    वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

    आज तुमच्यासाठी भाग्याचा दिवस आहे. तुम्ही स्वतःसाठी ठरवलेली जवळपास सर्व कामं पूर्ण होतील. शेअर मार्केटमध्ये सध्या चांगला फायदा दिसत आहे. एखाद्या गोष्टीबाबत बोलणं अवघड वाटत असलं, तरी ते न टाळता पूर्ण करा.

    LUCKY SIGN – A Candle stand

    धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

    तुम्ही एखादा विचार डोक्यातून जेवढा दूर करण्याचा प्रयत्न कराल, तेवढा तो पुन्हा समोर येईल. एखादी महत्त्वाची गोष्ट करण्याचं धाडस तुमच्यामध्ये नसल्याची जाणीव होईल. आजचा दिवस अगदी तणावाचा असेल आणि कामं लवकर आटोपण्याचे प्रयत्न असफल ठरतील.

    LUCKY SIGN – A Clay Pot

    मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

    वेगवेगळ्या गोष्टींमधून आश्चर्याचे धक्के मिळतील. यातल्या काही गोष्टी तुम्हाला आवडणार नाहीत. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा एखादी व्यक्ती तुमच्यामुळे दुखावली जाऊ शकते. एखादी लहान चोरी होण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहा.

    LUCKY SIGN – A glass jar

    कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

    परीक्षांचे निकाल अपेक्षेप्रमाणे नसू शकतात. एखादं काम करून घेण्यासाठी युक्ती आणि मुत्सद्देगिरीचा वापर करणं फायद्याचं ठरेल. आजचा दिवस अगदी तणावाचा असेल; मात्र दिवसाचा शेवट चांगल्या गोष्टीने होईल. प्रवासात असताना महत्त्वाची माहिती शेअर करणं टाळा.

    LUCKY SIGN – A Candy Jar

    मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

    तुमच्या भोवताली असलेल्या व्यक्तींपैकी एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला प्रेरणा मिळेल. इंट्रोव्हर्ट असणं आज फायद्याचं ठरणार नाही. कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती अचानक तुमच्यावर आरोप करील. नेहमीपेक्षा थोडा जास्त कठीण दिवस असेल.

    LUCKY SIGN – A Clear Sky

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Religion