मराठी बातम्या /बातम्या /religion /या लोकांचा वाढेल खर्च तर यांना होईल आर्थिक लाभ, पाहा कसे असेल आजचे राशिभविष्य

या लोकांचा वाढेल खर्च तर यांना होईल आर्थिक लाभ, पाहा कसे असेल आजचे राशिभविष्य

आज दिनांक 31 डिसेंबर 2022 वार शनिवार पौष शुक्ल नवमी. चंद्र रेवती नक्षत्रा तून भ्रमण करेल. चंद्र गुरू योग होईल. बुधाचा मकर राशीत प्रवेश झाला असून पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 31 डिसेंबर 2022 वार शनिवार पौष शुक्ल नवमी. चंद्र रेवती नक्षत्रा तून भ्रमण करेल. चंद्र गुरू योग होईल. बुधाचा मकर राशीत प्रवेश झाला असून पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 31 डिसेंबर 2022 वार शनिवार पौष शुक्ल नवमी. चंद्र रेवती नक्षत्रा तून भ्रमण करेल. चंद्र गुरू योग होईल. बुधाचा मकर राशीत प्रवेश झाला असून पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मेष

लग्नेश मंगळ वक्री विनाकारण चिंता वाढवेल. दशम बुध सूर्य सकारात्मक घटना घडवतील. आर्थिक काळजी घ्या असे संकेत आहे. शारीरिक, मानसिक ताण घेऊ नका. व्यय चंद्र मध्यम फळ देईल .

वृषभ

आज लाभ स्थानात चंद्राचे भ्रमण शुभ फळ देईल. कुटुंबात महत्वाचे निर्णय होतील. आर्थिक लाभ होतील. व्यय राहू काळजी घ्या असा इशारा देत आहे. संतातीसुख उत्तम राहिल. दिवस शुभ आहे .

मिथुन

राशी स्वामी बुध शुक्र सोबत अष्टम स्थानात आहे, सरकारी काम, कार्यालयीन कामकाज वाढेल. व्यवसाय वृद्धी होईल शुक्राचे भ्रमण श्वशुर घराण्या कडून लाभ घडवेल. दशम चंद्र आहे, घरात शुभ कार्य होतील. दिवस चांगला.

कर्क

आज भाग्य स्थानात चंद्र असून काही दैवी संकेत मिळतील. भाग्य स्थानात गुरू धार्मिक आस्था वाढवेल. सप्तम शनि जपून रहा असे सुचवीत आहे. खंबीर रहा. दिवस चांगला आहे.

सिंह

आज चंद्र भ्रमण अष्टम स्थानात असून प्रकृती नाजूक राहील. मन नाराज राहील. गुरूची उपासना करत रहा. लवकरच शुभ संकेत मिळतील. आर्थिक भरभराटीचे योग आहेत. दिवस चांगला.

कन्या

सप्तम स्थानातील चंद्र आर्थिक, घरगुती कामात यश देईल. आज दिवस कार्यालयीन जीवनात काही विशेष घडेल असा आहे. संततीसाठी खरेदी कराल. हाताने शुभ काम होईल. दिवस उत्तम.

तूळ 

चंद्राचे भ्रमण षष्ठ स्थानात आहे. खूप काम येईल असे संकेत आहेत. कुटुंबाशी मतभेद होऊ शकतात.संतती साठी आर्थिक व्यवहार होतील. घराचे सुख लाभेल. शांततेत दिवस घालवा.

वृश्चिक

काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मन आनंदी राहील. घर ही तुमची प्राथमिकता राहील. प्रकृती जपा. वक्री मंगळ सावध राहा असा इशारा देत आहे. दिवस मध्यम आहे.

धनु

आज दिवस घरातल्या विशेष कामांसाठी खर्च होईल. काही जबाबदाऱ्या येतील तरी मध्यम दिवस आहे. वैवाहिक जीवनात कलह टाळा. आर्थिक दृष्ट्या कठीण. प्रवास होतील. पण जपून रहा.

मकर

तृतीय चंद्र तुम्हाला व्यावसायिक प्रगती करून देईल. आर्थिक प्राप्ती होईल. सामाजिक जबाबदारी घेण्याचे योग आणेल. धार्मिक कार्यक्रम होतील. दिवस मध्यम.

कुंभ

आज विशेष घडामोडीचा दिवस आहे. अचानक होणारे लाभ प्रसन्न करतील. कायदा मोडू नका. अन्यथा कारवाईला समोर जावे लागेल.चंद्र द्वितीय स्थानात आहे आर्थिक लाभ होतील . दिवस मध्यम.

मीन

राशी स्थानातील चंद्र भरपूर काम देईल. वैवाहिक जीवनात जास्तीचे खर्च करावे लागतील. भटकंतीचे योग येतील. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. प्रकृती नाजूक राहील. दिवस मध्यम आहे.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Religion