मुंबई, 30 मार्च : आज दिनांक ३० मार्च २०२३ गुरूवार. चैत्र शुद्ध नवमी. चंद्र आज मिथुन राशीतून भ्रमण करेल. पुनर्वसु नक्षत्र असून आज श्रीराम नवमी आहे.अत्यंत भाग्यशाली असा हा दिवस असून गुरुपुष्यामृत योग रात्रौ १०.३९ नंतर होईल. मंगलमय अश्या ह्या दिवसाच्या सर्वांना खूप शुभेच्छा. प्रभू श्रीराम चरणी वंदन करून आजचा दिवस कसा जाईल बघुया.
मेष
आज राशीच्या तृतीय स्थानात चंद्र शुभ फळ देईल. भावंड आनंदी राहील.. नोकरीत वरिष्ठ अधिकारी व्यक्तीची भेट होईल. प्रवास योग येतील. सार्वजनिक कार्यात भाग घ्याल. तसेच व्यय स्थानातील गुरू धार्मिक आस्था निर्माण करेल. दिवस शुभ.
वृषभ
घरात महत्वाचे निर्णय घ्याल .दशम स्थानातील बुध घर आणि सामाजिक जीवनात प्रतिष्ठा देईल. प्रकृतीची काळजी घ्या. तसेच प्रवास आणि कौटुंबिक दृष्ट्या त्रासाचा काळ आहे.खर्च होतील.. दिवस शुभ.
मिथुन
आज चंद्र जोडीदार आणि व्यवसायसंबंधी क्षेत्रात यश देईल . सामाजिक आणि संतती साठी चांगला दिवस आहे. दशम स्थानात रवि गुरू आहे. रामजन्म शुभ संकेत देत आहे. दिवस उत्तम.
कर्क
चंद्र भ्रमण व्यय स्थानातून होत आहे. . घरामध्ये नवीन खरेदी होईल. आर्थिक दृष्टया शुभ दिवस .जास्त काळ घरामध्ये घालवाल. मातृ चिंता निर्माण होईल. रवि सामाजिक,आर्थिक लाभ देईल..दिवस मध्यम.
सिंह
आज राशी स्वामी रवि अष्टम स्थानात आहे. नवीन व्यक्तींशी संपर्क होईल. चंद्र सामाजिक क्षेत्रात आणि जीवनात विशेष घटना घडवेल.,आर्थिक लाभ होतील. धार्मिक स्थळांना भेट असा योग आणेल. दिवस उत्तम.
कन्या
लाभ स्थानातील चंद्र व्यावसायिक आणि कौटुंबिक दृष्ट्या अचानक फळ देईल. आर्थिक लाभ होतील. शुक्र लाभ दायक आहे.. वैवाहिक जीवन आनंदी राहील. रामरायाच्या कृपेने सर्व ठीक होईल. काळजी नको . दिवस बरा.
तुला
भाग्यस्थानात चंद्र मंगळ योग आर्थिक , प्रकृती संबंधी लाभ घडवेल. ,कुटुंबाचे सुख मिळेल. सामाजिक घटना घडतील. राशीतील केतू थोडा मानसिक ताण निर्माण करेल. शनी संतती कडे लक्ष द्या असे सांगत आहे. दिवस उत्तम.
वृश्चिक
व्यय केतू आर्थिक चणचण, मानसिक ताण निर्माण करील. पंचम रवि संतती आणि शिक्षण यासाठी उत्तम आहे. प्रवास जपून करा .भवताल परिस्थितीचे भान ठेवा. .घरामध्ये जास्ती काम पडेल. नोकरीमध्ये संधी, वैवाहिक दृष्ट्या दिवस मध्यम.
धनू
आर्थीक बाजू समाधानी असेल तर मन आनंदी राहील. सप्तम चंद्र भ्रमण सुखद अनुभव देईल. जोडीदार आणि मित्र मंडळी सोबत मजेत दिवस जाईल. प्रवास योग येतील. डोळ्यांची काळजी घ्या. दिवस शुभ.
मकर
रवि धर्म आणि संस्कृती बद्दल आस्था देईल. तेजस्वी स्वभाव होईल. पोटाची काळजी घ्या. मातृपितृ चिंता निर्माण होईल. तसेच वरिष्ठांशी मतभेद संभवतात. चंद्र आर्थिक ताण देईल. दिवस सामाजिक कामकाज करण्यात घालवाल.
कुंभ
पंचम स्थानातील चंद्र संतती विषयक शुभ समाचार देईल. . सरकार दरबारी असलेली कामे रेंगाळतील. राशी स्थानातील शनी मानसिक ताण देइल .विरक्त वृत्तीचा अनुभव येईल. राम कृपेने दिवस चांगला जाईल .
मीन
व्यय शनी प्रकृती व जोडीदाराची काळजी घ्या असे सांगत आहे. रवि सरकारी कामे,वरिष्ठ भेट असे संकेत देत आहे. चतुर्थ चंद्र आणि.गुरू मदत करील. उत्पन्नात वाढ होईल. गृहसौख्य मिळेल. दिवस मध्यम.
शुभम भवतू !!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion