मराठी बातम्या /बातम्या /religion /आज या राशीसाठी दिवस गडबडीचा आहे, अचानक प्रवासयोग संभावतात

आज या राशीसाठी दिवस गडबडीचा आहे, अचानक प्रवासयोग संभावतात

चंद्र मंगळ महालक्ष्मी योग बनेल. धनदायक अश्या या दिवसाचे पाहूया बारा राशींचे राशी भविष्य.

चंद्र मंगळ महालक्ष्मी योग बनेल. धनदायक अश्या या दिवसाचे पाहूया बारा राशींचे राशी भविष्य.

चंद्र मंगळ महालक्ष्मी योग बनेल. धनदायक अश्या या दिवसाचे पाहूया बारा राशींचे राशी भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 30 जानेवारी: आज दिनांक ३० जानेवारी २०२३ वार सोमवार. आज माघ शुक्ल दशमी. आज चंद्र वृषभ राशीत प्रवेश करेल. चंद्र मंगळ महालक्ष्मी योग बनेल. धनदायक अश्या या दिवसाचे पाहूया बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

आज चंद्र भ्रमण धन स्थानात होणार असून आर्थिक लाभ होतील. स्वतः साठी वेळ काढा. कुटुंबीय नवीन खर्चाचे मार्ग काढतील. लक्ष असू द्या. आरोग्य दृष्ट्या दिवस बरा आहे. एकूण बरा दिवस आहे.

वृषभ

राशीतील मंगळ आणि चंद्र भ्रमण आरोग्य विषयक समस्या निर्माण करील. दशम शनि आहे सामाजिक भान ठेवा. कार्यालयीन कामात जागरूक रहा. आर्थिक घडामोडी , शिक्षण यासाठी चांगला दिवस.

मिथुन

राशी स्वामी बुध सप्तमात असून व्यय चंद्र मंगळ आहे . सर्दीचे विकार त्रास देतील. या ग्रह योगावर मानसिक आरोग्य सांभाळा. हुरहूर वाटेल. दिवस घरामध्ये शांतता पूर्ण पद्धतीने घालवा.

कर्क

आज दिवस गडबडीचा आहे.अचानक प्रवासयोग येतील. भाऊ आणि बहिणी भेटतील. मानसिक ताण वाटेल. गुरू उपासना करावी. वैवाहिक जीवन सुखद राहील.दिवसाचे फळ मध्यम .

सिंह

दुपारनंतर कार्यालयीन काम, आर्थिक लाभ, मौजमजा , कुटुंबा समवेत आनंदी वेळ घालवाल. मात्र षष्ठ स्थानातील ग्रह कर्जाचे प्रसंग आणतील. शत्रू पासून सावध राहा. मातुल घराण्या शी संबंध येईल. दिवस बरा.

कन्या

चंद्र भाग्य स्थानात जाईल. आर्थिक अडचणी असतील तर कमी होतील. वैवाहिक जीवन सुखद राहील. संततीची काळजी घ्या. पूजन आणि जप करा. दिवस चांगला.

स्वप्नात या रंगाचे फूल दिसणे आहेत शुभसंकेत ! घरात येईल पैसा, सुख समृद्धी

तुला

अष्टमात प्रवेश करणारा चंद्र नुकसानीचे मार्ग दाखवेल. खर्च, प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. घरामध्ये दुरुस्ती, नवीन खरेदी यावर खर्च होईल. दिवस मध्यम आहे.

वृश्चिक

सप्तम स्थानात चंद्र मंगळ जोडीदार दूर जाण्याचे योग दाखवीत आहे. कलह टाळा. कलेत रुची वाढेल. मन नाराज राहील. व्यावसायिक जीवनात लाभ होतील. दिवस उत्तम जाईल.

धनू

षष्ठ चंद्र मंगळ कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे संकेत देत आहे. किंवा जबाबदारी वाढेल.प्रकृती जपा.आर्थिक दृष्ट्या सक्षम दिवस.

मकर

राशीतील रवि अनेक घडामोडी घडवील. कामामध्ये मध्ये रुची वाढेल. बुद्धीचा उपयोग करून नाव मिळेल.अधिकारी व्यक्ती भेटतील. पंचम चंद्र मंगळ दिवसात अनेक शुभ फळ देतील. संततीला वेळ द्या.दिवस शुभ.

कुंभ

तुमच्या बुद्धिमान स्वभावाला योग्य असे ग्रहमान आहे. राशीतील शनी आणि चतुर्थ चंद्र मंगळ सांभाळून रहा असे संकेत देत आहे. मानसिक ताण होईल. जास्त विचार नको. दिवस मध्यम.

मीन

मंगळ आणि चंद्राचा होणारा योग सुखद समाचार आणेल. सकाळी थोडेसे अस्वस्थ वाटले तरी दुपारनंतर आनंदी वातावरण निर्माण होईल. प्रवास योग बंधुभेट संभ्वते. वेळेचा फायदा घ्या. लाभ होतील. दिवस शुभ.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion