मराठी बातम्या /बातम्या /religion /दैनंदिन राशी भविष्य: वैवाहिक जीवनात कुरबुरी होतील

दैनंदिन राशी भविष्य: वैवाहिक जीवनात कुरबुरी होतील

पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मुंबई, 25 मे: आज दिनांक २५ मे २०२३. गुरूवार.आज ज्येष्ठ शुक्ल षष्ठी. अरण्यषष्ठी. चंद्र आज कर्क राशीतून भ्रमण करेल. चंद्र मंगळ योग बनेल. आज गुरू पुष्यामृत सकाळी ६ वाजून ४ मिनिट ते सायंकाळी ५ .५२ पर्यंत असेल .अत्यंत शुभ योग असून सुवर्ण, वाहन , वास्तू खरेदी करता उत्तम मुहूर्त आहे. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

आनंदी जीवनाची वाट सापडेल. घरात सुखद वातावरण राहील. नकारात्मक विचारांना दूर ठेवा. जास्तीचे काम काढून घराची सजावट करण्याकडे कल राहील.पूजा,धार्मिक कार्य घडेल वास्तूमध्ये आनंदी स्पंदने राहतील. दिवस शुभ.

वृषभ

आज चंद्र मंगळ तृतीय स्थानातून भ्रमण करीत आहे. धार्मिक बाबीमध्ये, घरात शुभ अनुभव येतील. रवी नोकरीत काळजी घेण्याचे संकेत देत आहे. प्रवास योग येतील. उत्तम फळ देणारा असा हा दिवस आहे.

मिथुन

आज चंद्र धनस्थानातून भ्रमण करीत आहे. आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण कराल. रवि बुध जपून राहण्याचे संकेत देत आहेत. जोडीदाराला काही त्रास होऊ शकतो. काळजी घ्या. दिवस शुभ.

कर्क

आज चंद्र राशी स्थानात असून सकारात्मक विचार देईल . कामात पारदर्शकता येईल. सांसारिक जीवनात ताण राहील . प्रकृती जरा शिथिल राहील. नवीन व्यक्तींशी संपर्क होईल. गृहसौख्य मिळेल. दिवस बरा.

सिंह

आज चंद्र मंगळ व्यय स्थानात असेल. अचानक प्रवास योग. भावंड भेट होईल .स्वतः मध्ये सुधारणा करा. आरोग्य जपा. नुकसान टाळायचा प्रयत्न करा. .प्रवासात जपून रहा. दिवस मध्यम.

Vastu Tips of Kitchen: आर्थिक समस्येतून सुटकेसाठी करा या मसाल्याचा वापर

कन्या

राशीच्या लाभ स्थानातून चंद्र भ्रमण प्रतिष्ठा देणारे असून , सामाजिक घडामोडी दर्शवित आहे. मित्र मैत्रिणीसोबत दिवस व्यतीत करा. नकोसे विचार टाळा. घरात जास्तीचे खर्च होतील. मात्र लाभ देखील होतील. दिवस शुभ.

तुला

आज दिवस पाहुणे मंडळींची भेट, समारंभ , प्रवास अश्या बाबी मध्ये यश देईल.नवीन व्यक्तीची ओळख होईल. प्रवास योग येतील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.कार्यालयात जास्तीचे काम पडेल. दिवस मध्यम.

वृश्चिक

भाग्यस्थानातील चंद्र आरोग्याची काळजी घेण्यास आणि घरासंबंधी काही निर्णय घेण्यास योग्य आहे. आर्थिक व्यय होईल. मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. जोडीदाराची काळजी घ्या. दिवस मध्यम.

घरातील कलह, वास्तुदोष दूर करण्यासाठी नक्की करा मोरपिसांचे हे उपाय

धनु

आज दिवस धार्मिक कामात जाईल. मन रमेल. आरोग्य सांभाळा. नकारात्मक व्यक्ती आणि विचार दूर ठेवा. कार्य करण्यासाठी प्रवृत्त व्हाल. जोडीदाराची चिंता वाटेल. आर्थिक दृष्ट्या दिवस बरा आहे.

मकर

कौटुंबिक जीवन आणि संतती यांची काळजी घेण्याचा आज दिवस आहे. नोकरी साठी प्रवास करताना जपून राहा. आरोग्य चिंता वाटेल. आर्थिक दृष्ट्या एकूण दिवस बरा आहे.

कुंभ

राशी स्थानातील शनी भ्रमण हे नकारात्मक विचारा पासून सावध रहा असे आवाहन करीत आहे. प्रकृती उत्तम राहील. संततिशी कलह टाळा. वैवाहिक जीवनात कुरबुरी होतील. गुरू साथ देईल. दिवस बरा.

मीन

आज दिवस मुलांची भेट, सामाजिक जीवनात प्रतिष्ठा घेऊन येईल .शिक्षण घेत असताना संपूर्ण एकाग्र राहावे. प्रलोभने येतील . प्रवास योग . वडिलांशी कलह किंवा त्यांना प्रकृतीचे त्रास संभवतात. दिवस मध्यम जाईल.

शुभम भवतू!!

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Life18, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion