मराठी बातम्या /बातम्या /religion /दैनंदिन राशी भविष्य: व्यवसाय आणि आर्थिक दृष्ट्या बरा दिवस जाईल

दैनंदिन राशी भविष्य: व्यवसाय आणि आर्थिक दृष्ट्या बरा दिवस जाईल

चंद्र आज मेष राशीत भ्रमण करेल.. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

चंद्र आज मेष राशीत भ्रमण करेल.. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

चंद्र आज मेष राशीत भ्रमण करेल.. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 मार्च: आज दिनांक २4  मार्च २०२३.. शुक्रवार.आज चैत्र शुक्ल तृतीया.गौरी तृतीया.चैत्र गौरी पूजन प्रारंभ. चंद्र आज मेष राशीत भ्रमण करेल.. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करा. आज दिवस राहू चंद्र योगामुळे कष्ट देईल. प्रकृती जपा.

घरामध्ये सत्संग घडेल. जास्तीची जबाबदारी पार पाडाल.मानसिक ताण होईल. कुटंब आणि आर्थिक दृष्ट्या मध्यम दिवस.

वृषभ

आज दिवस जोडीदाराला आनंदी ठेवण्याचा आहे हे लक्षात ठेवा. व्यय चंद्र राहू आहे काही कलहाचे प्रसंग येतील .जपून रहा. कार्यालयीन कामा निमित्त प्रवास ,नातेवाईक भेट संभवते. मुलं आनंदी असतील. दिवस सुखद.

मिथुन

मुत्सद्दी स्वभाव असला तरी काहीसे कष्ट दायक वातावरण आहे. . चूक होऊ शकते. कोणालाही जमीन राहणे टाळा. टीका करताना विचार करा. व्यवसाय आणि आर्थिक दृष्ट्या बरा दिवस.

कर्क

भाग्य गुरू शुभ आहे.राशी स्वामी चंद्र राहू सोबत मानसिक स्थिती वर परिणाम करेल.संततिविषयी ताण अनुभव कराल. वैवाहिक जीवन कष्ट दायक आहे.. गुरूचे पाठबळ व रवि आर्थिक दृष्ट्या फळ देईल . प्रकृती जपून काम करा..दिवस मध्यम.

माँ दुर्गेला ही फुले खूप प्रिय आहेत, रोज फुले अर्पण केल्यास इच्छा पूर्ण होईल

कन्या

समाज आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. संतती सुख मिळेल. चंद्र नातेवाईक भेट घडवून आणेल. तसेच आर्थिक लाभ होतील. प्रवास योग येतील. जोडीदाराच्या आरोग्याचे प्रश्न कमी होतील.

तुला

शुक्र घरामध्ये मोठ्या सुधारणा घडवून आणेल. खर्च भरपूर होईल पण सुख सोयी मध्ये वाढ होईल. कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळतील .जबाबदारी येईल. संतती कडे लक्ष द्या . प्रवासात जपून रहा. दिवस चांगला.

वृश्चिक

अश्टम मंगळाच्या दृष्टीने वृश्चिक व्यक्ती काहीशा तापट आणि उत्तेजीत असतील . प्रयत्न पूर्वक शांत रहा.वैवाहिक जीवनात वादळ येऊ शकते. दशम चंद्र ,गृह सौख्य , नोकरी यासाठी उत्तम फळ देईल .

धनू

गुरुकृपा असली तर कुठल्याही संकटातून मार्ग निघतो याचा प्रत्यय येईल. चतुर्थ गुरू व पंचम चंद्र दिवसभर घरात जास्तीचे काम देईल जवळपासचे प्रवास योग येतील. प्रकृती ठीक राहील. बंधू भेट होईल. दिवस मध्यम.

मकर

चतुर्थ चंद्र आणि षष्ठ मंगळ यांच्या उपस्थिती मुळे एक प्रकारचा आत्मविश्वास मिळेल. कला प्रकारात रुची निर्माण करेल. प्रवास योग येतील .संतती आणि जोडीदारासोबत आनंदाने दिवस घालवाल.

कुंभ

शनी प्रधान असलेली कुंभ रास,आज राहू चंद्र योगामुळे संततीसंबंधी घडामोडी निर्माण करणार आहे. प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल . लिखाण मध्ये यश मिळेल. आर्थिक लाभ होतील .व्यवसाय नोकरी साठी मध्यम दिवस.

मीन

राशी स्वामी स्वराशित आहे.गुरूच्या उपस्थिती मुळे सामाजिक जीवनात अनेक गोष्टींमुळे प्रसिद्धी असा हा काळ आहे. मात्र वैवाहीक जीवनात कष्ट होईल. अध्यात्मिक अनुभव येतील आर्थिक लाभ होतील. दिवस मध्यम.

शुभ भवतू!!

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion