मराठी बातम्या /बातम्या /religion /

आजचे राशीभविष्य, 24 जानेवारी: या राशीचे वरिष्ठांशी मतभेद संभवतात

आजचे राशीभविष्य, 24 जानेवारी: या राशीचे वरिष्ठांशी मतभेद संभवतात

चंद्र शनी शुक्र असा त्रिग्रही योग बनेल. सूर्य मकर राशीत असून आजचा दिवस कसा जाईल

चंद्र शनी शुक्र असा त्रिग्रही योग बनेल. सूर्य मकर राशीत असून आजचा दिवस कसा जाईल

चंद्र शनी शुक्र असा त्रिग्रही योग बनेल. सूर्य मकर राशीत असून आजचा दिवस कसा जाईल

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 24 जानेवारी: आज दिनांक २४ जानेवारी २०२३ मंगळवार.आज माघ शुक्ल तृतीया/चतुर्थी .आज तीलकुंद चतुर्थी असून आज चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करेल. cबघुया.

मेष

आज राशीच्या कर्म स्थानात सूर्य शुभ फळ देईल. पितृ धर्म निभवाल. नोकरीत वरिष्ठ अधिकारी व्यक्तीची भेट होईल. तसेच लाभ स्थानातील तीन ग्रह नवीन संधी देतील..वैवाहिक जीवन सुखी राहील. दिवस उत्तम.

वृषभ

कार्य क्षेत्रात महत्वाचे निर्णय घ्याल .भाग्य स्थानातील रवि धर्म आणि सामाजिक जीवनात प्रतिष्ठा देईल. प्रकृतीची काळजी घ्या. तसेच प्रवास आणि कौटुंबिक दृष्ट्या चांगला काळ आहे. दिवस शुभ.

मिथुन

आज भाग्य चंद्र शुक्र नवीन विषयात रुची निर्माण करतील. शैक्षणिक क्षेत्रात यश येईल .सामाजिक आणि संतती साठी चांगला दिवस आहे. अष्टम स्थानात रवियोग जपून रहा असे संकेत देत आहे.

कर्क

चंद्र भ्रमण अष्टम स्थानातून होत आहे.घरामध्ये नवीन खरेदी होईल. जास्त काळ घरामध्ये घालवाल. मातृ चिंता निर्माण होईल. सप्तम रवि जोडीदाराला घातक सिद्ध होईल .दिवस मध्यम.

सिंह

आज राशी स्वामी रवि षष्ठ स्थानात आहे. मातुल घराण्याचा संपर्क होईल. सप्तम चंद्र जोडीदार आणि वैवाहिक जीवनात विशेष घटना घडवेल., धार्मिक स्थळांना भेट असा योग आणेल. आर्थिक लाभ होईल. दिवस उत्तम.

कन्या

षष्ठ स्थानातील चंद्र प्रकृती आणि कौटुंबिक दृष्ट्या अचानक फळ देईल. शनी संततीसाठी त्रास दायक आहे.. पण गणरायाच्या कृपेने सर्व ठीक होईल. काळजी नको . दिवस बरा.

तुला

पंचम स्थानात चंद्र शनी योग संतती संबंधी चर्चा घडवेल. ,कुटुंबाचे सुख मिळेल.सामाजिक घटना घडतील. राशीतील केतू मानसिक ताण निर्माण करेल. दिवस चांगला.

वृश्चिक

व्यय केतू आर्थिक चणचण, मानसिक ताण निर्माण करतील. तृतीय रवि बंधू साठी अनुकूल आहे. प्रवास जपून करा .भवताल परिस्थितीचे भान ठेवा. घरामध्ये जास्ती काम पडेल.दिवस मध्यम.

धनू

आर्थीक दृष्टया समाधान असले तर दिवस आनंदात जातो. तृतीय चंद्र भ्रमण सुखद अनुभव देईल.संतती आणि मित्र मंडळी सोबत मजेत दिवस जाईल. डोळ्यांची काळजी घ्या. दिवस मध्यम.

मकर

राशीतील रवि धर्म आणि संस्कृती बद्दल आस्था देईल.तेजस्वी स्वभाव होईल. पितृ चिंता निर्माण होईल.तसेच वरिष्ठांशी मतभेद संभवतात. द्वितीय चंद्र आर्थिक लाभ देईल.दिवस कार्यालयीन कामकाज करण्यात घालवाल.

कुंभ

व्ययस्थ रवि कायदे विषयक समस्या निर्माण करेल सरकार दरबारी असलेली कामे रेंगाळतील.राशी स्थानातील चंद्र शनी शुक्र मानसिक ताण देतील .विरक्त वृत्तीचा अनुभव येईल दिवस चांगला.

मीन

व्यय चंद्र शनी प्रकृतीची काळजी घ्या असे सांगत आहे. लाभ स्थानातील रवि शनि पित्या कडून लाभ,वरिष्ठ भेट असे संकेत देत आहे. गुरू मदत करील.दिवस मध्यम.

शुभम भवतू !!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion