मराठी बातम्या /बातम्या /religion /

Horoscope Today : आज मित्र मैत्रिणीसोबत दिवस मजेत जाईल

Horoscope Today : आज मित्र मैत्रिणीसोबत दिवस मजेत जाईल

चंद्र आज कुंभ राशी तून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

चंद्र आज कुंभ राशी तून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

चंद्र आज कुंभ राशी तून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 23 जानेवारी: आज दिनांक २३ जानेवारी २०२३.वार सोमवार.आज माघ शुक्ल द्वितीया.चंद्र आज कुंभ राशी तून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

आनंदी जीवनाची वाट सापडेल. घरात सुखद वातावरण राहील. नकारात्मक विचारांना दूर ठेवा. जास्तीचे काम काढून घराची सजावट करण्याकडे कल राहील.तसेच उंची वस्तूंची खरेदी होईल. दिवस शुभ.

वृषभ

आज चंद्र दशम स्थानातून भ्रमण करीत आहे. अधिकारी भेट किंवा संपर्क होईल . प्रवासाचे योग येतील. धार्मिक बाबी, घरात शुभ समारंभ घडतील. भाग्यातील रवी नोकरीत बढतीचे संकेत देत आहे. दिवस शुभ.

मिथुन

आज चंद्र भाग्य स्थानातून भ्रमण करीत आहे.आर्थिक आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण कराल. अष्टमातील ग्रह सावध राहण्याचे संकेत देत आहेत. काही त्रास होऊ शकतो. दिवस मध्यम.

कर्क

आज चंद्र अष्टम स्थानात असून नकारात्मक विचार देईल .कामात अडथळे येतील. वैवाहिक जीवनात नाराजी राहील . जमवून घ्या. नवीन व्यक्तींशी संपर्क होईल. दिवस मध्यम.

सिंह

आज चंद्र शनी सप्तम स्थानात असेल.काही कारण नसताना खर्च किंवा मनस्ताप संभवतो.गुरू बल नसल्याने हिम्मत कमी राहील.स्वतः मध्ये सुधारणा करा.आरोग्य जपा.नुकसान टाळायचा प्रयत्न करा. दिवस मध्यम.

कन्या

राशी च्या षष्ठ स्थानातून चंद्रशनी भ्रमण कष्ट दायक असून प्रवास, आर्थिक घडामोडी दर्शवित आहे.मित्र मैत्रिणीसोबत दिवस व्यतीत करा. नकोसे विचार टाळा. वैवाहिक आयुष्य बरे राहील. दिवस शुभ.

तुला

आज दिवस पाहुणे मंडळींची भेट,समारंभ ,प्रवास अश्या बाबी मध्ये यश देईल.नवीन व्यक्तीची ओळख होईल. संतती चिंता सतावेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. दिवस चांगला.

वृश्चिक

चतुर्थ स्थानातील चंद्र धार्मिक कार्यक्रम हाती घेण्यात आणि घरासंबंधी काही निर्णय घेण्यास योग्य आहे. आर्थिक लाभ होईल. मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल.जोडीदाराची काळजी घ्या. दिवस चांगला.

धनु

आज दिवस संथ जाईल.मन रमणार नाही. फिरून या. आरोग्य सांभाळा.नकारात्मक व्यक्ती आणि विचार दूर ठेवा. कार्य करण्यासाठी प्रवृत्त व्हाल.आर्थिक दृष्ट्या दिवस बरा आहे.

मकर

वैवाहिक जीवन आणि जोडीदार यांची काळजी घेण्याचा आज दिवस आहे. मौज मजे साठी प्रवास करताना जपून राहा. संतती चिंता वाटेल. आर्थिक दृष्ट्या एकूण दिवस बरा आहे.

कुंभ

राशी स्थानातील चंद्र शनी भ्रमण हे रोग ऋण शत्रू पासून सावध रहा असे आवाहन करीत आहे. प्रकृती नाजूक राहील.घरात कलह टाळा. वैवाहिक जीवनात कुरबुरी होतील. दिवस बरा.

मीन

आज दिवस संतती आणि सामाजिक जीवनात कष्ट घेऊन येईल .शिक्षण घेत असताना संपूर्ण एकाग्र राहावे. प्रलोभने येतील . भावंडांशी कलह किंवा त्यांना प्रकृतीचे त्रास संभवतात. दिवस मध्यम जाईल.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion