मराठी बातम्या /बातम्या /religion /

Horoscope Today : वैवाहिक जीवन सुखद राहील.. आजचा दिवस शुभ असेल

Horoscope Today : वैवाहिक जीवन सुखद राहील.. आजचा दिवस शुभ असेल

चंद्र आज मकर राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

चंद्र आज मकर राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

चंद्र आज मकर राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 जानेवारी: आज दिनांक २२ जानेवारी २०२३. वार रविवार.आज माघ मासारम्भ .शुद्ध प्रतिपदा. सायंकाळपर्यंत शुक्र कुंभ राशीत प्रवेश करेल . चंद्र आज मकर राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

स्वभाव काहीसा रागीट असला तरी वाचा शुद्ध आणि संयत असावी हेच या दिवसाचे सांगणे आहे दशम स्थान उदीत असून नवीन संधी चालून येतील.शुक्र अर्थार्जनाचे योग्य मार्ग सुचवेल.प्रकृती जपा. दिवस चांगला.

वृषभ

शुक्र भाग्याचे नवीन दरवाजे उघडेल.भाग्य चंद्र आणि लाभ गुरू संतती प्राप्तीचे योग आणेल. कार्य रत राहून सामाजिक दायित्व निभवा. संततीची योग्य ती काळजी घ्या. दिवस शुभ.

मिथुन

आज दिवस घरगुती जबाबदारी,जास्तीचे काम,तसेच मातृ चिंता असा जाईल.मात्र गुरू सर्व चिंता दूर करेल.घरात कार्य ठरतील. सध्याचा काळ हा प्रकृतीची काळजी घेण्याचा आहे. दिवस संथ जाईल.

कर्क

चंद्र सप्तम स्थानातून नवीन व्यक्तीची भेट घडवून आणेल. किंवा त्यांच्याशी फोनवर संपर्क होईल.जवळपास प्रवासाचे योग बनतील. पत्नीची हौस पुरवाल. शुक्र आनंदी वातावरण ठेवेल.दिवस शुभ.

सिंह

जवळ पैसा असेल तर इतर चिंता दूर होतात.असेच काहीसे आज घडेल.आर्थिक लाभ होतील .कुटुंब आनंदात असेल. कर्ज देऊ नका.किंवा घेऊ नका.प्रकृती जपा. दिवस शुभ.

कन्या

संतती चिंता लागून राहिली आहे.लौकरच दूर होण्याचे संकेत आहेत.शुभ बातमी येईल. नकारात्मक विचार करून त्रास करून घेऊ नका. शैक्षणिक कार्य हातून घडेल. दिवस शुभ.

तुला

आज दिवस घरगुती जबाबदारी,त्यासाठी खर्च,आणि परदेश संबंधी वार्ता असा जाईल. घरामध्ये नवीन खरेदी होईल.भावंडाना शुभ काळ आहे. खर्च जपून करा.दिवस मध्यम.

वृश्चिक

उत्तम लाभदायक दिवस असला तरी प्रकृती कडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शीत विकार होतील. संतती कडून चांगली बातमी मिळेल. प्रवास होतील.दिवस शुभ आहे.

धनू

दिवसाचे ग्रहमान स्वतः बद्दल संभ्रम निर्माण करेल. सामाजिक दृष्ट्या दिवस चांगला जाईल.कार्यालयीन कामकाज नेहमीपेक्षा जास्त करावे लागेल.घरात काही काम निघेल.दिवस मध्यम.

मकर

राशीतील शनी आता पुढील राशीत गेला आहे. राशीतील चंद्र प्रवास,धार्मिक कार्य करण्यासाठी प्रवृत्त करेल. धनस्थानी शुक्र व्यक्तीमत्वात सुधार आणेल. आर्थिक लाभ देईल.दिवस शुभ.

कुंभ

सध्याचे ग्रहमान फारसे अनुकूल नाही .व्ययस्थ ग्रह नुकसान आणि निराशाजनक घटना घडवतील. आज चंद्र देखील अनुकूल नाही.जपून रहावे हे बरे. दिवस मध्यम.

मीन

राशीतील गुरू आणि लाभ चंद्र योगाचे सुंदर परिणाम दिसतील.एक ऊर्जावान दिवस आहे. वैवाहिक जीवन सुखद राहील .लाभ घडतील. मित्र भेट संभवते. अनुकूल दिवस.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion