मुंबई, 21 मार्च: आज दिनांक २१ मार्च २०२३ वार मंगळवार . आज फाल्गुन अमावास्या.. दर्ष अमावास्या समाप्ती रात्री १०.५७ .आज चंद्र दुपारी ११.५३ नंतर मीन राशीत भ्रमण करेल. गणेशाचे स्मरण करून पाहूया बारा राशींचे राशी भविष्य.
मेष
आज चंद्र भ्रमण व्यय स्थानात होणार असून व्यावसायिक ,कौटुंबिक कष्ट होतील. दुखणे त्रस्त करतील. लक्ष असू द्या. आरोग्य दृष्ट्या दिवस मध्यम .मानसिक त्रास संभवतात. धार्मिक कार्य घडेल. दिवस मध्यम आहे.
वृषभ
धन स्थानातील मंगळ आणि लाभ चंद्र भ्रमण आर्थिक घडामोडी दर्शवित आहे.. दशम शनि आहे नोकरीमध्ये काळजी घ्या. कार्यालयीन कामात जागरूक रहा . भावंडं भेट, किंवा संपर्क होईल.. चांगला दिवस.
मिथुन
राशी स्वामी बुध दशम स्थानात असून अमावास्या कार्यालयीन कटकटीचे योग आहेत. आरोग्य मध्यम राहील. .मातृ पितृ चिंता संभवते.. संततीला वेळ द्या. दिवस शांतता पूर्ण पद्धतीने घालवा.
कर्क
आज दिवस संथ आहे. मातृ पितृ चिंता राहील. मानसिक ताण जाणवेल. गुरू उपासना करावी. आर्थिक घडामोडी होतील. घरा मध्ये जास्तीची जबाबदारी येईल. वैवाहिक जीवन मध्यम राहील. दिवसाचे फळ मध्यम.
सिंह
दुपारनंतर कार्यालयीन काम, आर्थिक व्यय मौजमजा ,कुटुंबा समवेत वेळ घालवाल. अष्टम चंद्र मानसिक त्रास घडतील.प्रवास योग येतील. शत्रू पासून सावध राहा. मनस्ताप होईल.. दिवस मध्यम.
कन्या
चंद्र आज सप्तम स्थानात असेल. आर्थिक भरभराट येईल .मित्र मंडळ भेटेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. संततीची काळजी घ्या. आरोग्य सांभाळा. पूजन आणि जप करा. दिवस उत्तम .
तुला
षष्ठ स्थानात प्रवेश करणारा चंद्र प्रवासाचे मार्ग दाखवेल. खर्च, प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. घरामध्ये दुरुस्ती, नवीन खरेदी यावर खर्च होईल. जोडीदार निवडताना जपून असा. दिवस मध्यम आहे.
वृश्चिक
पंचम स्थानात चंद्र आर्थिक दृष्ट्या बरा असून वास्तू योग दाखवीत आहे. कलह टाळा. कलेत रुची वाढेल. मन अस्वस्थ राहील. व्यावसायिक जीवनात लाभ होतील. दिवस उत्तम जाईल.
धनू
चतुर्थ चंद्र गुरूशी योग करीत आहे. कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे संकेत देत आहे. किंवा जबाबदारी वाढेल.मनस्ताप होईल. धार्मिक कामात सहभागी व्हाल. संततीला जपा.अमावास्या गृह चिंता देईल. मध्यम दिवस.
मकर
रवि आता मीन राशीत गुरू सोबत असून अनेक घटना घडवील. कामामध्ये रुची वाढेल. बुद्धीचा उपयोग करून नाव मिळेल. अधिकारी व्यक्ती भेटतील. नोकरीत घडामोडी होतील. संतती कडे लक्ष द्या. दिवस मध्यम .
कुंभ
तुमच्या बुद्धिमान स्वभावाला योग्य असे ग्रहमान आहे. राशीतील शनी आणि द्वितीय चंद्र सांभाळून रहा असे संकेत देत आहे. मानसिक ताण कमी होईल. जोडीदाराशी जपून रहा. मित्र मैत्रिणी भेटतील. दिवस मध्यम.
मीन
गुरू आणि चंद्राचा होणारा योग विशेष समाचार आणेल. सकाळी थोडेसे अस्वस्थ वाटले तरी दुपारनंतर आनंदी वातावरण निर्माण होईल.आर्थिक लाभ, प्रवास योग येतील. वेळेचा फायदा घ्या.संतती सुख मिळेल. अमावास्या मध्यम स्वरूपाची .
शुभम भवतू!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichakra, Religion