मराठी बातम्या /बातम्या /religion /

आजचे राशीभविष्य, 21 जानेवारी: या राशीने मानसिकदृष्ट्या खंबीर रहा !

आजचे राशीभविष्य, 21 जानेवारी: या राशीने मानसिकदृष्ट्या खंबीर रहा !

आज चंद्र मकर राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

आज चंद्र मकर राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

आज चंद्र मकर राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 21 जानेवारी: आज दिनांक २१ जानेवारी २०२३ वार शनिवार. आज पौष अमावस्या . दर्श शनी अमावस्या प्रारंभ सकाळी ६.३१ .वाजता होईल. आज चंद्र मकर राशीत प्रवेश करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

आज चंद्र भ्रमण दशमात होणार असून प्रकृती जपा. स्वतः साठी वेळ काढा. शत्रू डोकं वर काढतील. लक्ष असू द्या.आर्थिक दृष्ट्या दिवस बरा आहे. एकूण हुरहूर लावणारा दिवस आहे. मानसिक दृष्ट्या खंबीर रहा.

वृषभ

राशीतील मंगळ आणि भाग्य चंद्र भ्रमण संतती विषयक समस्या निर्माण करील.अमावस्या आणि दशम शनि आहे सामाजिक भान ठेवा. आर्थिक घडामोडी , शिक्षण यासाठी चांगला दिवस.

मिथुन

राशी स्वामी बुध असून अष्टम चंद्र आहे सर्दीचे विकार त्रास देतील. अमावस्येच्या पार्श्व भूमीवर मानसिक आरोग्य सांभाळा. नैराश्य वाटेल. दिवस घरामध्ये शांतता पूर्ण पद्धतीने घालवा.

कर्क

आज दिवस गडबडीचा आहे.अचानक प्रवासयोग येतील. भाऊ आणि बहिणी भेटतील. मानसिक ताण वाटेल. गुरू उपासना करावी. वैवाहिक जीवन सुखद राहील.

दिवसाचे फळ मध्यम .

सिंह

दुपारनंतर आर्थिक लाभ, मौजमजा ,कुटुंबा समवेत आनंदी वेळ घालवाल.मात्र षष्ठ स्थानातील ग्रह कर्जाचे प्रसंग आणतील. शत्रू पासून सावध राहा. मातुल घराण्या शी संबंध येईल. दिवस बरा.

कन्या

चंद्र पंचम स्थानात जाईल. आर्थिक अडचणी ,असतील तर कमी होतील. वैवाहिक जीवन सुखद राहील. संततीची काळजी घ्या.शनी अमावस्या आहे पूजन आणि जप करा. दिवस चांगला.

तुला

व्ययात प्रवेश करणारा चंद्र नुकसानीचे मार्ग दाखवेल. खर्च, प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.घरामध्ये दुरुस्ती,नवीन खरेदी यावर खर्च होईल. दिवस शुभ आहे.

वृश्चिक

सप्तम स्थानात मंगळ जोडीदार दूर जाण्याचे योग दाखवीत आहे.कलह टाळा. कलेत रुची वाढेल. मन नाराज राहील. दुपारनंतर लाभाचे मार्ग मोकळे होतील. दिवस उत्तम जाईल.

धनू

द्वितीय चंद्र कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे संकेत देत आहे. किंवा जबाबदारी वाढेल.आर्थिक दृष्ट्या सक्षम

दिवस.खर्च कमी करा.

मकर

राशीतील ग्रह अनेक घडामोडी घडवतील. कले मध्ये रुची वाढेल. बुद्धीचा उपयोग करून नाव मिळेल.

राशीस्थानातील चंद्र दिवसात अनेक शुभ फळ देतील.मात्र अमावस्या असल्याने जपून रहा.

कुंभ

तुमच्या चिकित्सक स्वभावाला योग्य असे ग्रहमान आहे. राशीतील शनी आणि व्यय चंद्र सांभाळून रहा असे संकेत देत आहे. मानसिक ताण होईल. जास्त विचार नको. दिवस मध्यम.

मीन

गुरू आणि चंद्राचा होणारा लाभयोग सुखद समाचार आणेल. सकाळी थोडेसे अस्वस्थ वाटले तरी दुपारनंतर आनंदी वातावरण निर्माण होईल.वेळेचा फायदा घ्या.लाभ होतील. दिवस शुभ.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion