मुंबई, 21 जानेवारी: सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 21 जानेवारी 2023 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
पूर्ण न झालेली कामं तातडीने पूर्ण करण्यासाठी, मागची देणी भागवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. काही सौम्य संसर्ग होण्याची किंवा डोकेदुखीची शक्यता आहे. वादविवादाच्या प्रसंगी स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. संतुलित दृष्टिकोन भविष्यात उपयोगी ठरू शकतो.
LUCKY SIGN - A cardamom
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
आजच्या दिवसाची ऊर्जा अनुकूल आहे. त्यामुळे तुम्ही नव्या कामात पुढाकार घेऊ शकाल. तुमच्याकडे कोणी कर्जाची मागणी केली, तर नम्रपणे नकार देऊ शकता. सेल्फ केअर रूटीन स्वीकारण्याची शिफारस केली जात आहे.
LUCKY SIGN - A grey feather
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
तुम्ही आतून खूप मजबूत, कणखर असल्याचं दाखवत असलात, तरी अन्य व्यक्ती आज तुमची भावनिक बाजू कदाचित अनुभवू शकतील. काम करवून घेण्यासाठी वाटाघाटीच्या काही डावपेचांची गरज भासेल. एखादा सहकारी मदत मागण्याची शक्यता आहे. तो खरा गरजू असू शकेल.
LUCKY SIGN - Riverside
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
जुन्या सहकाऱ्याशी पुनर्भेट होण्याची शक्यता आहे. घराबाहेरची काही कामं असतील, तर वातावरणाची साथ मिळणार नाही. तुम्ही एखाद्या कारणासाठी/कामासाठी मदत करणार असलात, तर तुम्हाला आता संधी दिसू शकेल.
LUCKY SIGN - An old paper
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
अचानक, न सांगता पाहुणे येण्याची शक्यता आहे. आजचा दिवस गोड खाण्याचा आहे. काही प्रलंबित देणी असल्यास ती पूर्ण होतील. तुमच्या सपोर्ट स्टाफमधली व्यक्ती एखादी तक्रार मांडण्याची शक्यता आहे. ती प्राधान्याने सोडवावी.
LUCKY SIGN - Pearls
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
कामाच्या ठिकाणचं वातावरण आता अनुकूल वाटेल आणि तुम्हाला रिलॅक्स वाटेल. घरी आणि ऑफिसमध्येही कागदपत्रं पूर्ण ठेवा आणि योग्य ठिकाणी ठेवा. तुम्हाला झोपेची उणीव भासेल. आज रात्री चांगली झोप घ्या.
LUCKY SIGN - Doorstep
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
भावनिक होणं म्हणजे दुबळं होणं नव्हे. तुमचे सबळ मुद्दे पुढे मांडा. एखादी नवी रेसिपी ट्राय करण्यासाठी आणि काही नवे करार करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या आरोग्याच्या स्थितीची विशेष काळजी घ्या.
LUCKY SIGN - A red stole
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
दुःस्वप्नं म्हणजे वाईट स्वप्नं हा केवळ सबकॉन्शस माइंडचा अर्थात मनाचा खेळ असतो. ती गांभीर्याने घेऊ नका. एखादी विरुद्धलिंगी व्यक्ती रूटीनपासून तुमचं लक्ष विचलित करू शकेल. जुन्या मित्राला भेटून दिवस सार्थकी लावा.
LUCKY SIGN - A brick wall
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून तुम्हाला मिस केलं जात असण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रिय व्यक्तींसाठी आज वेळ काढा. महिनाअखेरीला अचानक एखादी ट्रिप होण्याचे संकेत आहेत. रूटीन मेडिकल चेकअप उपयुक्त ठरतील. ध्यानधारणा करा.
LUCKY SIGN - A neon sign
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
आजच्या दिवसावर जुन्या आठवणींचं राज्य असेल. रिअॅलिटी चेक उपयुक्त ठरेल. तुमच्या भावंडांकडे लक्ष द्या. तुमच्या अधिकाराचं कुठे तरी प्रदर्शन करावं, अशी त्यांची इच्छा असू शकेल. जुन्या दृष्टिकोनासाठी नवा प्लॅन तयार करावा.
LUCKY SIGN - A glass bottle
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
तुमची भीती आता नियंत्रणात आहे. आता काळ बदलला आहे. आता आणखी दुःस्वप्नं पडणार नाहीत. गेल्या काही महिन्यांत तुम्ही जे काही मिळवलं आहे, त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. तुमच्याकडे एखादी अतिरिक्त जबाबदारी येण्याची शक्यता आहे.
LUCKY SIGN - A banyan tree
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
तुम्ही तुमच्या कुटुंबाला भावनिक पाठिंबा देणारी यंत्रणा आहात. त्यांना तुमच्याकडून अधिक वेळ हवा आहे. एखादं नवं काँट्रॅक्ट मिळण्याची, त्यावर सह्या होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय व्यावसायिकांसाठी आजचा दिवस व्यग्र असेल. सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात व्यत्यय येऊ शकेल.
LUCKY SIGN - Birds
Keywords : Horoscope, Pooja Chandra, Zodiac Signs
अनिकेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion