Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /religion /

आजचे राशीभविष्य, 20 जानेवारी: महत्त्वाची कामे करण्यासाठी आजचा दिवस खूपच खास !

आजचे राशीभविष्य, 20 जानेवारी: महत्त्वाची कामे करण्यासाठी आजचा दिवस खूपच खास !

गुरू चंद्र केंद्र योग उत्तम फळ देईल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

गुरू चंद्र केंद्र योग उत्तम फळ देईल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

गुरू चंद्र केंद्र योग उत्तम फळ देईल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 20 जानेवारी: आज २० जानेवारी २०२३ शुक्रवार .आज पौष कृष्ण त्रयोदशी. आज चंद्र धनू राशीतून भ्रमण करेल. गुरू चंद्र केंद्र योग उत्तम फळ देईल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष ः- धार्मिक कार्यक्रम आणि कौटुंबिक जबाबदारी येऊ शकते. खाण्या पिण्याची काळजी घ्या. वस्तू सांभाळा. चंद्र भ्रमण आर्थिक आणि कौटुंबिक दृष्ट्या फळ देईल. दिवस मध्यम.

वृषभ ः- मनाची एकाग्रता वाढेल. ठरविलेले काम अपुरे राहील. आत्मविश्वासाने पुढे जात रहा.

संततीचे सुख मिळेल.चंद्र मंगळ षडाष्टक जपुन राहण्याचे संकेत देत आहे. दिवस मध्यम.

मिथुन ः- धंद्यात जम बसेल. मागील येणे वसूल करा. कला क्षेत्रात झालेली ओळख फायदेशीर ठरेल. घरामध्ये जबाबदारी वाढेल. मातृ चिंता सतावेल. दिवस चांगला.

तृतीयपंथीयांच्या लग्नाची परंपरा, एका रात्रीची वधू बनण्यासाठी 18 दिवस विवाह

कर्क ः- वरिष्ठांना न दुखावता तुमचे मत त्यांना सांगा. कायद्याचे पालन करा. गोड बोलून धंदा मिळवा. तसेच प्रवास आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल.दिवस शुभ.

सिंह ः- दौर्‍यात ताणतणाव होऊ शकतो. खाण्याचे हाल होतील. प्रवासात नवीन ओळख होईल; पण सावध रहा. कौटुंबिक जबाबदारी येईल.संतती सुख मिळेल.आर्थिक लाभ होतील. दिवस शुभ.

कन्या ः- महत्त्वाच्या कामात यश मिळेल. घरातील लोकांना खूश करण्यासाठी प्रयत्न कराल. गोड खाण्यास मिळेल. गुरू चंद्र केंद्रयोग शुभ फळ देईल. दिवस उत्तम.

तूळ ः- ईश्वरी चिंतनात मनाची एकाग्रता होईल. मन द्विधा करणारी बातमी मिळेल. खर्च आणि नुकसान त्रस्त करतील. प्रवास योग येतील. परदेश संबंधी व्यवहारात यश मिळेल.दिवस मध्यम.

वृश्चिक ः- मनावरील ताण हलका होईल. मौज-मजा कराल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. नवीन ओळख होईल. चंद्र गुरू संतती सुख देईल.आर्थिक लाभ . दिवस शुभ.

धनु ः- रागावर ताबा ठेवा. तुमच्यावर आरोप होण्याची शक्यता आहे.राशीतील चंद्र मानसिक शांतता देईल. कार्यालयीन कामकाज सुरु राहील.जास्त दगदग टाळा. दिवस बरा.

बेडरूममध्ये अजिबात लावू नका अशा प्रकारची पेंटिंग, वैवाहिक जीवनात येईल वादळ

मकर ः- कुटुंबात आनंदी रहाल. चांगली बातमी मिळेल. धंदा वाढेल. महत्त्वाचे काम आजच करून घ्या. चंद्र गुरू आनंद मिळवून देतील. खर्च होतील. दिवस भाग्यकरक.

कुंभ ः- तुमच्या विचारांना जास्त प्रतिसाद मिळण्यास वेळ लागेल. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. वाहन जपून चालवा.आज चंद्र मित्र मैत्रिणींची भेट घडवेल. दिवस मध्यम.

मीन ः-  महत्त्वाची भेट आजच घ्या. चर्चा यशस्वी होईल. कला-साहित्यात चांगले यश मिळेल. आनंदी रहाल.वैवाहिक जीवन आनंदी राहील. मिळून खरेदी

कराल.दिवस शुभ.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion