मराठी बातम्या /बातम्या /religion /आज या राशीला वैवाहिक जीवनात आनंद मिळेल, मात्र गैरसमज टाळा..

आज या राशीला वैवाहिक जीवनात आनंद मिळेल, मात्र गैरसमज टाळा..

बुध चंद्र शुभ योग होईल. पाहुया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

बुध चंद्र शुभ योग होईल. पाहुया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

बुध चंद्र शुभ योग होईल. पाहुया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 19 फेब्रुवारी: आज दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रविवार. आज माघ वद्य चतुर्दशी. आज चंद्र मकर राशीत भ्रमण करेल. बुध चंद्र शुभ योग होईल. पाहुया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

व्यावसायिक अपेक्षा उंचावणारा दिवस आहे. पराक्रम आणि आर्थिक दृष्ट्या वाढ होईल . परदेश प्रवास घडतील. मानसिक ताण जाणवेल .कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण होईल. दिवस शुभ.

वृषभ

भाग्य स्थानातील चंद्राचे भ्रमण फायद्याचे ठरेल . उंची वस्तू खरेदी , प्रवास योग येतील . वैवाहिक जीवनात गैरसमज टाळा.राशीतील मंगळ मार्गी होत आहे. संतती ही तुमची प्राथमिकता राहील. दिवस उत्तम.

मिथुन

चंद्राचे अष्टम स्थानातून भ्रमण कुटुंबाशी संपर्क साधेल. संतती सुख मिळेल .प्रवास योग , भेटीगाठी होतील. प्रकृतीची काळजी घ्या. कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळतील. दिवस गडबडीत पण मजेत जाईल.

Vastu tips : वास्तूचे हे 6 नियम अंगीकारल्याने घरात कायम नांदेल सुख-शांती

कर्क

धनस्थान आणि भाग्य कार्यरत असेल की आर्थिक पाठबळ मिळते. धार्मिक कार्यक्रमात हौसेने भाग घ्याल. गृह सौख्य मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. मात्र गैरसमज टाळा.खर्च होईल. दिवस शुभ.

सिंह

आज मंगल दिन ईश चरणी प्रार्थना करून घालवा. धर्म आणि सामाजिक जीवनात लाभ देणारे ग्रहमान आहे. गुरू बल नसले तरी आज दिवस शांततेत पार पडेल.वैवाहिक सुख मिळेल. प्रवास योग येतील. मध्यम दिवस.

कन्या

अविवाहित व्यक्तींनी लग्नाचे जोरदार प्रयत्न करावे. जोडीदार हवा तसा मिळण्याचे योग येतील.संतती साठी कष्ट पडले तरी लाभ मिळेल नाव आणि प्रतिष्ठा वाढेल.आर्थिक लाभ होतील. प्रकृती जपा.दिवस उत्तम.

या 5 चुका तुम्हाला करतील कर्जबाजारी, म्हणून या वास्तू फॉलो करून मिळवा समाधान

तुला

एक भाग्य दायक दिवस असून केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल .वरिष्ठ कामाची दाखल घेतील.

संतती साठी शुभ योग असून आनंदाचे वातावरण राहील. मित्र भेट होईल.कर्ज मुक्ती होईल. दिवस शुभ .

वृश्चिक

परदेश जण्या संबंधी काही कामे पडून असतील तर आज प्रयत्न करा. होण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात यश देणारा दिवस आहे. वरिष्ठ खुश राहतील.घरात देखील जास्तीचे काम येईल. संततीसाठी शुभ दिवस.

धनू

गृह सौख्य ,वाहन आणि वास्तू लाभ आणि धार्मिक आस्था निर्माण करणारा दिवस आहे. द्वितीय स्थानातील चंद्र भ्रमण सुखद अनुभव देईल. वैवाहिक जीवन सुखाचे राहील. मातृ पितृ सुख लाभेल.आर्थिक लाभ होतील.दिवस शुभ.

मकर

आज राशीतील बुध आणि चंद्र योग करीत आहे . सांभाळून राहण्याचा दिवस आहे. वैवाहिक जीवन सुखद राहील. प्रवास होतील. आर्थिक, व्यावसायिक आणि प्रकृतीच्या बाबत काळजी घ्या .दिवस मध्यम.

Chanakya Niti 2023: धनवान बनण्यासाठी फॉलो करा चाणक्यांचा हा सोपा उपाय

 कुंभ

आज जोडीदाराला वेळ देऊन आपल्या दिवसाची सुखद सुरवात करा. संततीसाठी खर्च होतील.खर्च होईल पण नवीन खरेदी , मौजमजा करण्यात दिवस जाईल. आर्थिक दृष्टया शुभ दिवस. व्यवसायासाठी दिवस चांगला आहे.

मीन

आज दिवस काहीसा संथ ,घरात शांतता पूर्वक जाईल. गुरू चंद्र योग चांगली प्रकृती आणि आर्थिक लाभ दाखवीत आहे. शत्रू पासून सावध राहा. वैवाहिक सुख मिळेल. दिवस शुभ.

शुभम भवतू!!

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion