मराठी बातम्या /बातम्या /religion /Horoscope Today : आज या राशीच्या जातकांच्या वैवाहिक जीवनात वादळ येऊ शकते !

Horoscope Today : आज या राशीच्या जातकांच्या वैवाहिक जीवनात वादळ येऊ शकते !

 Horoscope Today 18 january Marathi 2023: आज चंद्र दिवसभर वृश्चिक राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

Horoscope Today 18 january Marathi 2023: आज चंद्र दिवसभर वृश्चिक राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

Horoscope Today 18 january Marathi 2023: आज चंद्र दिवसभर वृश्चिक राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 जानेवारी: आज दिनांक १८ जानेवारी २०२३ बुधवार.आज पौष कृष्ण एकादशी . आज चंद्र दिवसभर वृश्चिक राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

मेष

आयुष्यात येणाऱ्या मोठ्या व्यक्तींचा आधार घेऊन आज दिवस शांततेत घालवा . प्रकृती जपा.

घरामध्ये सत्संग घडेल. जास्तीची जबाबदारी पार पाडाल. कुटंब आणि आर्थिक दृष्ट्या मध्यम दिवस.

वृषभ

तोंडातून निघालेले अपशब्द वैवाहिक जीवनात नुकसान करतात हे लक्षात ठेवा. काही कलहाचे प्रसंग येतील .जपून रहा. प्रवासात मौज मजा कराल.नातेवाईक भेट संभवते. भावंडं आनंदी असतील.दिवस सुखद.

मिथुन

बुद्धिवादी स्वभाव असला तरी काहीसे संभ्रम निर्माण करणारे वातावरण आहे. कागदपत्र आणि सह्या जपून करा. चूक होऊ शकते. कोणालाही जमीन राहणे टाळा.आर्थिक दृष्ट्या उत्तम दिवस.

कर्क

पंचम चंद्र मानसिक स्थिती वर परिणाम करेल.कधी ताण तर कधी शांती अनुभव कराल.वैवाहिक जीवन सुख दायक आहे. संततीला वेळ द्या. नवीन व्यक्तींशी भेट संभवते.दिवस उत्तम.

सिंह

राज राशी असूनही सध्या काहीशी त्रस्त आहे.कारण गुरूचे पाठबळ नाही.व्यय चंद्र आर्थिक दृष्ट्या कष्ट देईल . अलर्जी चे विकार होतील. प्रकृती जपून काम करा. कार्य क्षेत्रात अधिकारी व्यक्तीची भेट होईल.दिवस मध्यम.

कन्या

समाज कल्याण आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील.संतती सुख मिळेल .तृतीय चंद्र बंधू भेट घडवून आणेल. तसेच आर्थिक लाभ होतील.प्रवास योग येतील. दिवस शुभ.

तुला

शुक्र घरामध्ये मोठ्या सुधारणा घडवून आणेल.खर्च भरपूर होईल पण सुख सोयी मध्ये वाढ होईल. कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळतील जबाबदारी येईल. प्रवासात जपून रहा. दिवस चांगला.

वृश्चिक

मंगळाच्या दृष्टीने वृश्चिक व्यक्ती काहीशा तापट आणि उत्तेजीत असतील . प्रयत्न पूर्वक शांत रहा.वैवाहिक जीवनात वादळ येऊ शकते. राशीतील चंद्र प्रवास,धार्मिक कार्यक्रम यासाठी उत्तम फळ देईल .

धनू

गुरुकृपा असली तर कुठल्याही संकटातून मार्ग निघतो याचा प्रत्यय येईल. व्यय चंद्र दिवसभर हुरहूर लावेल.प्रकृती नरम राहील. लौकरच बदल होतील.दिवस मध्यम.

मकर

गंभीर व्यक्तिमत्वाला शुक्राच्या उपस्थिती मुळे एक सौम्य आणि आनंदी किनार मिळेल. कला प्रकारात रुची निर्माण करेल. त्वचा विकार होतील.संतती आणि जोडीदारासोबत आनंदाने दिवस घालवाल.

कुंभ

बदलाच्या टोकावर असलेली कुंभ रास रोग ऋण शत्रू पासून त्रस्त आहे.प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल . लिखाण मध्ये यश मिळेल. व्यवसाय नोकरी साठी उत्तम दिवस.

मीन

राशी स्वामी स्वराशित आहे. ओजस व्यक्तिमत्व आणि सामाजिक जीवनात अनेक गोष्टींमुळे प्रसिद्धी असा हा काळ आहे.संतती सुख मिळेल.प्रवास योग येतील.दिवस उत्तम .

शुभ भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Rashichark, Religion